Skip to content
सर्वोच्च न्यायालयामध्ये नवीन ५ न्यायाधीशांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतींनी केली
फेब्रुवारी २०२३ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी पाच नवीन न्यायाधीशांची नियुक्ती केली.
यासह सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३२ वर पोहोचली आहे.
भारतीय संविधानानुसार सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसह जास्तीत जास्त ३४ न्यायाधीश असू शकतात.
नवनियुक्त न्यायाधीशांमध्ये
१.न्या. पंकज मिथल (राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश)
२.न्या. मनोज मिश्रा (अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश)
३.न्या. अहसानुद्दीन अमानुल्ला (पटना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश)
४.न्या. पीव्ही संजय कुमार (मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश)
५.न्या. संजय करोल (पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश) यांचा समावेश आहे.
सर्व नवनियुक्त न्यायाधीश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.