Talathi : तलाठी

Talathi महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 7(3) नुसार प्रत्येक सजा करिता एक किंवा अधिक तलाठी नेमले जातात.

Talathi महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 7(3) नुसार प्रत्येक सजा करिता एक किंवा अधिक तलाठी नेमले जातात.

तलाठ्यांची नेमणूक करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यास आहेत. तलाठी पदाची निवड स्पर्धा परीक्षा द्वारे केली जाते.

तलाठ्यांच्या कार्यालयास “सजा” असे म्हणतात.

तलाठी हा ग्रामीण मुलकी प्रशासनातील ग्रामस्थरावरील महसूल खात्याचा वर्ग -3 चा कर्मचारी असतो.

1958 मध्ये राज्यात महसूल गोळा करण्यासाठी  सरकारी नोकर नेमण्यास सुरुवात झाली.

तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण सर्कल ऑफिसर्सचे (मंडल अधिकारी) व त्यानंतर तहसीलदाराचे असते.

महसूल खात्याचे गाव पातळीवरील दप्तर तलाठी सांभाळतो.

गावाचा नमुना क्र. 7/12, 8अ इत्यादीशी तलाठी संबंधित आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी गाव पातळीवर निश्चित केलेली नोंदणी पुस्तके, अभिलेख ठेवण्याचे कार्य तलाठी करतो.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार गाव पातळीवरील महसूल विषयक कामांची जबाबदारी तलाठी पार पाडतो.

गाव पातळीवर महसूल, तगाई वसुली, दुष्काळ इत्यादी संबंधित कार्य तलाठी करतात.

गाव पातळीवर जमीन महसूल थकबाकीदार व जमिनीच्या अधिकार पत्राची नोंद ठेवण्याची जबाबदारी तलाठ्याची असते.

गाव पातळीवर पिकपाण्याची नोंद तलाठी करतो.

गावातील महसूल गोळा करण्याचे अधिकार तलाठ्यास आहेत.

गाव पातळीवर शेतजमिनीचा आकार ठरविण्याचा अधिकार तलाठ्यास आहे.

तहसीलदाराने निश्चित केलेली पिकांची आणेवारी तलाठी राबवतो.

गाव पातळीवर कौटुंबिक शिधापत्रिका (रेशन कार्ड) वितरित करण्याचे कार्य देखील तलाठी पार पाडतो.

गाव पातळीवर निवडणूक यंत्रणेतील एक घटक या नात्याने निवडणुकीसंदर्भात सोपवलेली कामे पार पाडण्याची जबाबदारी तलाठ्यावर असते.

तहसीलदार, जिल्ह्याचा महसूल अधिकारी किंवा पोलीस अधिकारी यांच्या आदेशानुसार गाव पातळीवरील

मरणोत्तर चौकशीचे प्रतिव्रत्त फौजदारी प्रकरणातील जबानी व तपासणी इत्यादी कामकाज तलाठी पाहतो.

तलाठ्यास गैरवर्तवणुकीबद्दल शासन करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकाऱ्यास असतात.

गावात येणाऱ्या साथीच्या रोगासंबंधी आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे काम तलाठी करतात.

Visheshan-विशेषण: मराठी भाषेतील महत्त्वपूर्ण वचनांचा अंगhttps://mpsc.pro/visheshan/
Kriyapad-क्रियापद: मराठी भाषेतील आदर्श वाचन आणि लिहिण्याचा सर्वोत्तम उपायhttps://mpsc.pro/kriyapad/
Ubhyanwayee Avyay -उभयन्वयी अव्यय भाषाशास्त्रातील महत्वपूर्ण अंश!https://mpsc.pro/ubhyanwayee-avyay/
Kevalproyogi avyay-केवलप्रयोगी अव्यय:https://mpsc.pro/kevalproyogi-avyay/
Kriyavisheshan avyay-क्रियाविशेषण अव्यय:https://mpsc.pro/kriyavisheshan-avyay/

Leave a comment