Types of Soil in Maharashtra:मुलतः मृदा अपक्षय झालेली खडक, खनिज पोषकद्रव्ये, पाणी हवा, जैविक पदार्थ व वेगवेगळ्या जीवांचे मिश्रण असते. मृदांना परिपुर्ण परिसंस्था मानले जाते.
Types of Soil in Maharashtra:वनस्पती मृदांचा एक परिसंस्था म्हणून वापर करतात पदार्थ म्हणून नव्हे मृदा हया जमीनीवरील जीवसृष्टीचा आधार आहेत. वनस्पतींना पोषकद्रव्ये मृदेपासून मिळतात. मृदांची निर्मीती अतिशय सावकाश होत असते म्हणूनच मृदा अपुनर्नवीकरणीय संसाधने आहेत. जमीनीवरील सर्वजीवमात्रांचा आधार असल्याने व मूलगामी संसाधन असल्याने मृदांची धूप होऊ नये तसेच अयोग्य वापराने त्यांची अवनती होऊ नये यासाठी मृदांचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करणे गरजेचे असते.
मातीच्या निर्मिती मध्ये तीन घटक योगदान देतात.Types of Soil in Maharashtra
1) वारा
2) पाणी
3) वातावरण
मातीचे स्वरूप हे ज्या खडका पासून बनवले जाते आणि त्या मध्ये कोणत्या प्रकारची वनस्पती वाढतात या वर अवलंबून असते.
माती चार घटकांनी बनलेली असते.
1) खनिज (45%)
2) सेंद्रीय पदार्थ (5%)
3) पाणी (25%)
4) हवा (25%)
महाराष्ट्रातील मृदा प्रकार संपूर्ण माहिती (Types of Soil in Maharashtra)
महाराष्ट्रा मध्ये विविध प्रकारच्या माती आहेत. महाराष्ट्राचा एकूण 80 % पेक्षा जास्त भाग बेसाल्ट खडकाने बनलेला आहे. परिणामी, बेसाल्ट खडका पासून तयार झालेली काळी माती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रामध्ये साधारणपणे खालील प्रकारच्या मृदा आढळतात.
१ काळी मृदा (Black soil )-
या मृदेला ‘लावा मृदा ’ किंवा ‘रेगुर मृदा ’ असेही म्हणतात.
ही मृदा बेसाल्ट नावाच्या आग्नेय खडकाचे अपक्षय होऊन तयार होते.
या मृदेला काळा रंग टायटॅनिफेरस मॅग्नेटाईटमुळे येतो.
या मृदे मध्ये चुनखडी , लोह , पोट्याशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम या घटक द्रव्याचे प्रमाण जास्त असते. तर नायट्रोजन फॉस्परस आणि सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते .
या मृदेत ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे या जमिनीत सिंचनाच्या सहाय्याने अनेक पिके घेता येतात.
काळी मृदा लवकर निचरा होत नाही. त्यामुळे जास्त सिंचनामुळे या जमिनी दलदलीच्या बनतात.
या मृदेस उन्हाळ्यात मोठ्या भेगा पडतात तसेच अतिरिक्त जलसिंचन झाल्यास पाणी साचुन ती दलदलयुक्त बनते.रेगुर मृदा ही परीपक्व मृदा म्हणून ओळखली जाते या मृदेला मंडलीय मृदा असे म्हणतात.
काळया मृदेचा प्रदेश:
महाराष्ट्र राज्यात ही मृदा विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम या जिल्हयात तसेच खानदेशात धुळे, जळगाव, नंदुरबार तर मराठवाडयात परभणी, हिंगोली, उस्मानाबाद या जिल्हयात काळी मृदा आढळते.ही काळी माती महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 3/ 4 पेक्षा जास्त भागात आढळते.
महाराष्ट्रात, ही माती गोदावरी आणि भीमा-कृष्णा नद्यांच्या खोऱ्यात आढळते.
या मृदे ची सर्वाधिक जाडी तापी नदीच्या पात्रात आढळते.
ही मृदा मराठवाड्या तील सर्व जिल्ह्यांत तसेच यवतमाळ, अकोला, वाशीम, अमरावती येथे आढळते.
2 लॅटराईट मृदा (Laterite soil)
लॅटराईट मृदा कापसासाठी अतिशय उपयुक्त आहे. कापूस व्यतिरिक्त ज्वारी, तूर, बाजरी, गहू, ऊस इ.
लॅटराइट हा शब्द लॅटिन शब्दा पासून आला आहे ज्याचा अर्थ वीट असा होतो.
ही लॅटराईट मृदा जांभा खडका वर दीर्घ काळ प्रक्रिया करून तयार होते.
या लॅटराईट मृदेत भरपूर लोह असते त्यामुळे त्यांना ‘लाल’ किंवा ‘पिवळा’ रंग येतो.
या लॅटराईट मृदेत नायट्रोजन, पोटॅशियम आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण खूप कमी आहे. त्या मुळे शेतीसाठी हि मृदा कमी सुपीक आहे.
पण ही लॅटराईट मृदा फळबागांसाठी अतिशय उपयुक्त आहे.
ही लॅटराईट मृदा ओलावा टिकवून ठेवू शकत नाही, त्यामुळे ती सिंचनासाठी अयोग्य आहे.
या लॅटराईट मृदे त लोह, अल्युमिनियम आणि टायटॅनियम भरपूर आहेत. त्यामुळे या मातीत अल्युमिनियमचे साठे जास्त आहेत.
लॅटराईट मृदेचाप्रदेश:
ही सह्याद्री पर्वताच्या दक्षिणेकडील भागात तसेच पूर्वेकडील डोंगराळ प्रदेशात तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या पूर्व भागात आढळते.
ही मृदा सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातही आढळते
पिके:
या जमिनीत काजू आणि आंबा ही महत्त्वाची पिके आहेत.
3) लाल मृदा (Red soil )
लाल मृदा ही मृदा प्राचीन आर्चियन, विंध्ययन आणि कडप्पा प्रकारच्या खडकां पासून तयार झाली आहे.
ही लाल मृदा जास्त पावसाच्या प्रदेशात आढळते.
लाल मृदा वेग वेगळ्या भागात वेग वेगळ्या खडकां पासून तयार होते:
1) आर्चियन – पूर्व विदर्भ, उत्तर आणि दक्षिण कोकण
२) शिस्ट आणि ग्नीस – पूर्व महाराष्ट्र
3) बसॉल्ट – पश्चिम महाराष्ट्र
लोह (आयर्न पेरोक्साइड) जास्त असल्यामुळे या मृदेला लाल रंग आला आहे.
या मातीत पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी आहे.
हे ड्रेनेज सुधारते आणि रासायनिक खतांना त्वरीत प्रतिसाद देते.
ही मृदा शेतीसाठी कमी उपयुक्त आहे.
लाल मृदेचा प्रदेश :
ही मृदा महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात तसेच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आढळते.
पिके : सागाची जंगले या जमिनीत प्रामुख्याने आढळतात.
4) गाळाची मृदा (Alluvial soil )
गाळाची ही मृदा नदी पात्रा तील गाळा मुळे तयार होत असते. म्हणून या मृदे ला “गाळाची मृदा” असे म्हटले जाते.
नदीच्या काठा वर आणि किनारी भागात गाळाची मृदा आढळते.
वालुकामय चिकण मृदा सेंद्रिय पदार्थ आणि बुरशीने समृद्ध असते.
या गाळाच्या मृदा मध्ये ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त आहे, त्या मुळे ती सुपीक आहे.
या गाळाच्या मृदे मध्ये पोटॅशिअम चे प्रमाण कमी असते.
या मृदे चा रंग फिकट पिवळा असतो.
गाळाच्या मृदेचा प्रदेश:
• ही मृदा गोदावरी, कृष्णा, भीमा, पंचगंगा, तापी नद्यांच्या खोऱ्यात आढळते.
• वालुकामय चिकणमाती देखील कोकण किनारपट्टीवर आढळते.
पिके : या जमिनी मध्ये भात, नाचणी, पोफळी तसेच ऊस, गहू, भाजीपाला पिकवला जातो.
5) चिकण मृदा (Clay soil )
चिकण मृदा हि जमिनी मध्ये गाळाचे प्रमाण जास्त असल्याने पाणी सहज झिरपत नाही.
ही मृदा जास्त काळ पाणी टिकवून ठेवते; म्हणून तिला ‘क्ले माती’ (Clay soil) असे म्हणतात.
चिकन मृदेचे वैशिष्ट्ये:
ही मृदा सुपीक आहे कारण तिचा निचरा लवकर होत नाही.
प्रदेश : ही माती नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात आढळते.
पिके : ही माती भात पिकासाठी चांगली आहे. तर, गहू, ज्वारी, ऊस अशी इतर पिके ही घेतली जातात.
6 जांभी मृदा-
महाराष्ट्रात २०० सेमी पेक्षा अधि क पावसाच्या प्रदेशात तसेच निश्चित कोरडा कालखंड असलेल्या प्रदेशात जांभी मृदा आढळते. मृदेची वैशिष्टे जांभी मृदेत सतत पाणी झिरपण्याने खडकातील क्षार व सिलिकाचे कण वाहुन नेले जातात परिणामी लोह व अॅल्युमिनियम यांचे मृदेतील प्रमाण वाढते. या मृदेमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, सेंद्रिस पदार्थ या द्रव्यांचे प्रमाण कमी असते. जांभी मृदा ही कमी सुपीक असते.
जांभ्या मृदेचा प्रदेश :
महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापुर, सातारा तसेच चंद्रपुर व गडचिरोली जिल्हयात ही मृदा आढळते.
पिके- या मृदेमध्ये तांदुळ हे प्रमुख पिक घेतले जाते तर डोंगर उतारावर फळांचे उत्पादन घेतले जाते. कोकणामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. रत्नागिरीतील हापूस आंबा जगप्रसिध्द आहे. याशिवाय काजू, चिकू वगैरे फळझाडांचे उत्पादन मिळते.
7 तांबडी / पिवळसर मृदा (red soil):
तांबडी मृदा ही महाराष्ट्रातील अती प्राचीन काळातील ग्रेनाइट आणि नीस प्रकारच्या खडकावर अपक्ष क्रिया होऊन तांबडी मृदा तयार झाली आहे. ही मृदा वाळु मिश्रीत मृदा असुन तिच्यात लोहाचे (अॅल्युमिनिअम ऑक्साईड ) प्रमाण जास्त असल्याने तिला तांबडा रंग प्राप्त होते. तिचा रंग पिवळा, तपकिरी किंवा राखाडी असु शकतो.
तांबडया मृदेचा प्रदेश :
तांबडी मृदा नागपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुर या जिल्हयात आढळते..
सह्याद्रीच्या पर्वतमय भागात विशेषतः उत्तर कोकणालगत विदर्भाच्या पूर्व भागात वर्धा व वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यात ही मृदा आढळते.
पिके: या मृदेत भुईमुग, बटाटे, बाजरी व भात पीकाचे उत्पादन घेते जाते..
उंचावरच्या प्रदेशातील तांबड्या मृदेत भरड धान्य प्रामुख्याने बाजरीसारख्या पिकांचे उत्पादन घेतले जाते.
विदर्भामध्ये – भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत तांदळाची लागवड केली जाते
8.खारफुटीची मृदा (Mangrove soil)
भारताच्या एकूण जमीनीपैकी १ टक्के पेक्षा कमी जमीनीचे क्षेत्र खारफुटी जमीनीखाली आहे..
खारफुटीच्या मृदेचा प्रदेश :
भारतात सर्वाधिक खारफुटीची मृदा पश्चिम भारतात आहे. भारताच्या सर्व १२ समुद्र किनारी राज्यात व केंद्रशासित प्रदेशात खारफुटीची मृदा नमुद आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किना-यालगत खारफुटीची मृदा आढळते.
मृदेची अवनती :
मृदांची सुपीकता कमी होणे, त्यांची गुणात्मक पातळीचा -हास होणे या प्रक्रियेला मृदेची
अवनती असे म्हणतात.
मृदेची अवनती होण्यासाठी मृदेचा अतिवापर, अतिजलसिंचन, रासायनिक खतांचा अतिवापर इत्यादिमुळे मृदेची अवनती होते. मृदेची अवनती थांबविण्यासाठी चक्रिय पिक पध्दती, जमीन काही काळ पडीक ठेवणे, सेंद्रीय खताचा अधिक वापर इ. उपयाद्वारे मृदेची अवनती कमी करता येते..
मृदेची धूप(Soil Erosion) :
जमीनीवरचा मृदेचा सर्वात वरचा थर, अंशतः किंवा पुर्णपणे वाहून जाणे म्हणजे मृदेची धुप होय. या वरच्या थरात सेंद्रीय पदार्थ व पोषकद्रव्य असतात. हा थर वनस्पतीच्या वाढीस करणीभुत असतो. हा थर वाहुन जाण्याने जमीन नापीक बनते…
मृदा धुपीची कारणे-
मृदेचे स्वरूप पाण्याचा संतुलीत वापर, अति गुरे धराई, मोठया प्रमाणात होणारी जंगलतोड, पाऊस, स्थलांतरीत शेती व शेती करण्याची अयोग्य पध्दती यामुळे जमीनीची मोठया प्रमाणात धूप होते .