विदर्भातील अमरावती प्रशासकीय विभागातील हा जिल्हा आहे. Yawatamal Jilha यवतमाळ जिल्हा तेलंगणाच्या सीमेलगत वसलेला आहे. यवतमाळची जुनी नावे यवत, यवती हि आहेत.
मुख्यालय – यवतमाळ
महानगेपालिका – नाही
क्षेत्रफळ – 13584 चौकिमी
स्थान व विस्तार – यवतमाळच्या पूर्वेस चंद्रपूर, पश्चिमेस वाशिम, दक्षिण व नैऋत्येस नांदेड, दक्षिणेस तेलंगणा राज्य, उत्तरेस अमरावती व वर्धा जिल्हा.
तालुके(16) – यवतमाळ, वणी, पुसद, उमरखेड, कळंब, केळापूर, बाभुळगाव, घाटंजी, राळेगाव, मारेगाव, महागाव, दारव्हा, नेर, दिग्रस, आर्णी, झरी-जामडी.
नद्या – वर्धा, पैनगंगा या मुख्य नद्या. इतर नद्या बेंबळा, निरगुडा, रामगंगा या वार्धेच्या उपनद्या व अरुणावती, पूस, अडाणा, खुनी, विदर्भा या पैनगंगेच्या जिल्ह्यातील उपनद्या.
संगम स्थळ – रामतीर्थ (वर्धा-रामगंगा), नांदेसांगवी (वर्धा-बेंबळा)
नदीकाठावरील ठिकाण – पुसद (पुस), घाटंजी(वाघाडी), वणी (निरगुडा), आर्णी (अरुणावती)
धरणे – ईसापुर धरण (पैनगंगा नदीवर), अरुणावती (अरुणावती नदीवर), बेंबळा धरण (बेंबळा नदीवर)
अभयारण्य – टिपेश्वर, इसापूर
खनिजे दगडीकोळसा वणी, मालेगाव, दिग्रस येथे आढळतो. वणी तालुक्यात चुनखडक हे मुख्य खनिज आढळते. डोलोमाईटचे सर्वाधिक साठे यवतमाळ जिल्ह्यात आहेत.
गरम पाण्याचा झरा – कापेश्वर
तलाव – निळोणा
डोंगररांगा – अजिंठा, पुसद टेकड्या.
लेणी – दारव्हा लेणी
वने – वनात आढळणारी वृक्ष साग, तेंदू, हिरडा, बाभूळ, मोह ई.
मृदा – नद्यांच्या खोऱ्यात सुपीक व काळी मैदा आढळते.
पिके – ज्वारी, तांदूळ, कापूस, ऊस. कापसाचे उत्पादन सर्वाधिक प्रमाणात होते.
- यवतमाळ हा जिल्हा “पांढरे सोने” (कापूस) पिकवणारा जिल्हा व सर्वाधिक तालुक्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
- भारतीय इतिहास संशोधनाशी संबंधित “शारदाश्रम” ही संस्था यवतमाळ येथे आहे.
- यवतमाळ येथे केदारेश्वर मंदिर आहे.
- वणी येथे चुन्याच्या व्यापाऱ्याचे केंद्र व रंगनाथ स्वामी मंदिर आहे.
- टिपेश्वर, पैनगंगा येथे अभयारण्य आहे.
- यवतमाळ-नांदेड सीमेवर उमरखेड जवळ जेवली येथे पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आहे. याला विदर्भाचा नायगारा म्हणतात.
- कापेश्वर येथे गंधकमिश्रित औषधी पाण्याचा झरा आहे.
- कळंबचा श्री चिंतामणी विदर्भातील भाविकांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे.
- केळापूर येथे प्रसिद्ध देवी श्री जगदंबा मंदिर आहे.
- अर्णी येथे बाबा कंबलपोश दर्गा आहे.
- ब्रिटिशांनी उच्च प्रतीचा कापूस मँचेस्टरला नेण्यासाठी यवतमाळहुन मुर्तीजापुरपर्यंत नॅरोगेज रेल्वे मार्ग टाकला होता. या मार्गावर “शकुंतला” रेल्वे धावत होती.
- दिग्रस येथे घंटी बाबाची यात्रा भरते.
- घाटंजी येथे मोरोली महाराजांची समाधी आहे.
- “कोलाम” ही यवतमाळ मधील अतिमागास जमात आहे.
- यवतमाळ येथे कृषी संशोधन व कुक्कुट पैदास केंद्र आहे.
- दिग्रस, उमरखेड, दारव्हा या परिसरात खाण्याच्या विड्याचे मळे आहेत.
- वर्धा नदी यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याची सीमा बनवते