Jalagaon Jilha : जळगाव जिल्हा

उत्तर महाराष्ट्रात खानदेशातील तापी खोऱ्यात वसलेला हा जिल्हा आहे. Jalagaon Jilha जळगाव जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागात येतो. जळगाव जिल्हा 3 राष्ट्रीय महामार्गावर वसलेला आहे.

मुख्यालय – जळगाव

महानगरपालिका – जळगाव

क्षेत्रफळ – 11765 चौकिमी.

स्थान व विस्तार – जळगावच्या पूर्वेस बुलढाणा जिल्हा व मध्य प्रदेशची सीमा (पूर्व नेमाड जिल्हा), पश्चिमेस धुळे, नैऋत्येस नाशिक, दक्षिणेस  संभाजीनगर(औरंगाबाद), उत्तरेस मध्य प्रदेश सीमा.

तालुके(15) –जळगाव, चाळीसगाव, चोपडा, जामनेर, अमळनेर, मुक्ताईनगर, यावल, रावेर, भुसावळ, भडगाव, पाचोरा, पारोळे, एरंडोल, धरणगाव, बोदवड.

नद्या – तापी ही येथील प्रमुख नदी आहे. इतर नद्या पूर्णा, पांझरा, अनेर, भोकर.

संगमस्थळ –  रामेश्वर (तापी-गिरणा), मांजरोढ (तापी-अनेर), चांगदेव (तापी-पूर्णा).

अभयारण्य – यावल अभयारण्य  

नदी काठावरील ठिकाणे – जळगाव (गिरणा), भुसावळ (तापी), चाळीसगाव (तितुर), भडगाव (गिरणा), अमळनेर (बोरी)

धरणे – हातनूर (जलाशय मुक्ताईसागर) येथे तापी नदीवर अप्पर तापी प्रकल्प आहे. वाघूर प्रकल्प(वाघुर नदी), दहिगाव  जमदे(गिरणा नदी).

पिके – तेलबिया, कापूस उत्पादनात जिल्हा आघाडीवर आहे.

फळपिके – बोर, डाळिंब. जळगावची केळी जगप्रसिद्ध आहे. रावेर व यावल या तालुक्यातील केळी विशेष प्रसिद्ध आहे.

डोंगर/टेकड्या – सातमाळा, सातपुडा, अजिंठा, शिरसोळी, हस्ती, चांदोर.

लेणी –  उपनदेव,चांगदेव, कानळदा, वरणगाव, पाटणादेवी, घटोत्कच.

तलाव – हरताळे, मेहरुना, पद्मालय, म्हसवे.

किल्ले – लासुर, पारोळा.

मृदा – जिल्ह्यात काळी मृदा मोठ्या प्रमाणात आढळते.

पिके – बाजरी, कापूस, ऊस, गहू, ज्वारी.

शैक्षणिक – उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (स्थापना 15 ऑगस्ट 1990).

  • पूर्वी खानदेश या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाचे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे दोन भाग करण्यात आले होते त्यापैकी पूर्व खानदेश भागाला आज जळगाव जिल्हा असे नाव दिले
  • तापी-पूर्णा संगमावर चांगदेव हे तीर्थक्षेत्र आहे व पाटणादेवी मंदिर आहे.
  • वरणगाव (भुसावळ) येथे संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना आहे. याची “सुवर्णनगरी” अशी ओळख आहे.
  • पोकरी (फेकरी) येथे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे.
  • जळगाव येथे दूधभुकटी निर्मिती प्रकल्प आहे.
  • यावल तालुक्यातील आडगाव येथील “मनुदेवी” हे जिल्ह्यातील 70% जनतेचे कुलदैवत आहे.
  • पाटणादेवी हे जेष्ठ गणित तज्ञ भास्कराचार्य यांचे जन्मगाव आहे.
  • फैजपूर (ता. यावल) हे 1936 मधील काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशनाचे ठिकाण आहे.
  • उनपदेव, सुनपदेव, नाझरदेव (ता.चोपडा) येथे गरम पाण्याचे झरे आहेत.
  • फरकांडे(ता.एरंडोल) येथे अंजनी-उतावळी नद्यांच्या संगमाजवळ झुलते मनोरे (स्विंगिंग टॉवर्स)आहे.  चांद मोमीन यांनी हे मनोरे बांधले असे म्हणतात.
  • मुक्ताई भवानी अभयारण्य जळगाव येथे आहे.
  • वढोदा व्याघ्र संवर्धन प्रकल्प जळगाव येथे आहे.
  • श्री पद्मालय (प्रभा क्षेत्र) – एरंडोल तालुक्यातील हे स्थळ देशातील अडीच गणपती पिठांपैकी अर्ध पीठ मानले जाते.
  • जळगाव जिल्ह्याला केळीचे कोठार व अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते.
  • अमळनेर येथे साने गुरुजींनी शिक्षण प्रसार व समाजसेवेचे कार्य केले आहे.
  • भुसावळ येथे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आणि जवळच पोखरी येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे.
  • जामनेर येथे वनस्पती तुपाचा व खताचा कारखाना आहे.
  • मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्र हे जैव संवर्धन क्षेत्र आहे.
  • रावेर तालुक्यातील पाल हे थंड हवेचे ठिकाण आहे
  • पारोळा हा जळगाव मधील एकमेव भुईकट किल्ला आहे. हा किल्ला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे निवासस्थान होते.
  • जळगाव जिल्ह्यात “रोशा” जातीचे गवत प्रसिद्ध आहे.
  • जळगाव जिल्ह्याला कापसाचे शेत असे म्हणतात.
  • गिरणा नदी जळगाव शहराला पाणीपुरवठा करते.
  • जळगाव येथे तेलबिया संशोधन केंद्र आहे.
  • जळगाव जिल्ह्यामध्ये केळी संशोधन केंद्र यावल येथे आहे.

Leave a comment