Nanded Jilha : नांदेड जिल्हा

Nanded Jilha नांदेड जिल्हा छ. संभाजीनगर या प्रशासकीय विभागात येतो . मध्य महाराष्ट्रातील मराठवाड्यात Nanded Jilha नांदेड हा जिल्हा आहे.

क्षेत्रफळ – 10528 चौकिमी

मुख्यालय – नांदेड

महानगरपालिका – नांदेड

स्थान व विस्तार – नांदेडच्या पश्चिमेस व नैऋत्येस लातूर जिल्हा, पश्चिमेस परभणी, उत्तरेस व ईशान्येस यवतमाळ, उत्तरेस व वायव्यस हिंगोली, पूर्वेस व आग्नेयेस तेलंगणा, दक्षिणेस कर्नाटक राज्य.

तालुके(16) – नांदेड, भोकर, उमरी, लोहा, कंधार, किनवट, बिलोली, हदगाव, मुखेड, मुदखेड, देगलूर, माहूर, हिमायतनगर, धर्माबाद, अर्धापूर, नायगाव(खैरगाव)

नद्या – गोदावरी ही मुख्य नदी. मांजरा, मनार(मन्यार), लेंडी, आसना, सिता, पैनगंगा या इतर नद्या.

धरणे – मनार नदीवरील मनार धरण (बारूळ ता.कंधार), विष्णुपुरी (गोदावरी), बाभळी (गोदावरी), इसापूर(पैनगंगा).

संगमस्थळ – कुंडलवाडी (मांजरा-गोदावरी)

नदीकाठावरील ठिकाण – नांदेड (गोदावरी), धर्माबाद (गोदावरी).

महाराष्ट्रातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प विष्णुपुरी आहे याच्या जलाशयास “शंकरसागर” असे म्हणतात.

अभयारण्य – पैनगंगा अभयारण्य.

गरम पाण्याचा झरा – उणकेश्वर (ता.किनवट)

धबधबा – सहस्त्रकुंड धबधबा पैनगंगा नदीवर (ता.किनवट)

तलाव – कुंडलवाडी, नीलोली, वारूळ.

लेणी माहूर, शिवूर.

टेकड्या – निर्मल, सातमाळा, मुदखेड, बालाघाट, भीमटेक, शिवनीगप्पा.

वने – जिल्ह्यात विविध प्रकारची वने आढळतात. यात साग, बांबू, तेंदू, मोह इत्यादी वृक्षांचा समावेश होतो.

मृदा – नद्यांच्या खोऱ्यात सुपीक मृदा आढळते.

पिके – जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, कापूस, सोयाबीन, मूग इत्यादी पिके घेतली जातात.

राज्यात खरीप ज्वारीचे सर्वाधिक क्षेत्र असणारा जिल्हा नांदेड आहे.

उद्योगधंदे – कुशनूर येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. नांदेड येथे MIDC केमिकल पार्क आहे.

शैक्षणिक – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड (स्थापना 17 सप्टेंबर 1994).

  • नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे याचे पहिले कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे होते.
  • नांदेडचे पूर्वीचे नाव नंदिग्राम, नंदीतट होते.
  • नांदेड हे गाव भगवान शंकराचे वाहन “नंदी” यांच्या नावावरून पडले. नंदिने गोदातटावर नृत्य केलेले हे ठिकाण म्हणून “नंदी-तट” या नावावरून नांदेड हे नाव पडले.
  • कवी वामन पंडित व शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंगजी यांची नांदेड ही कर्मभूमी आहे.
  • गुरुगोविंदसिंगजी यांची समाधी नांदेड येथे आहे.
  • नांदेड येथे शिखांचे तीर्थस्थान व नरसिंह मंदिर आहे.
  • नांदेड येथील गुरुद्वारा प्रसिद्ध आहे. हे जगभरातील शिखांचे पवित्र तीर्थस्थान आहे. जवळच नेरळी येथे कुष्ठरोग्यांसाठी वसवण्यात आलेले “नंदनवन” हे कुष्ठधाम आहे.
  • हदगाव येथे प्रसिद्ध दत्त मंदिर आहे.
  • नांदेड जिल्ह्यात कंधार किल्ला आहे.
  • नांदेड गोदावरी नदीकाठी आहे. 
  • माहूर हे श्री दत्तात्रेयांचे जन्मस्थान आहे.
  • नांदेड जिल्ह्यात मुदखेड येथे रेल्वे जंक्शन आहे.
  • “गुरु-ता-गद्दी” हा त्रिशताब्दी महोत्सव नांदेड येथे असतो.
  • राज्यातील देवीच्या साडेतीन पिठांपैकी एक असलेल्या रेणुका मातेचे मंदिर माहूर येथे आहे.
  • किनवट येथे पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड (बाणगंगा) धबधबा आहे.
  • बिलोली येथे कोरीव कामासाठी प्रसिद्ध असलेली मशिद आहे. मुखेड येथे दशरथेश्वर मंदिर व महादेव मंदिर आहे.
  • नांदेड येथे कापूस संशोधन केंद्र आहे.
  • मराठवाड्याचे भागीरथ शंकरराव चव्हाण(मुख्यमंत्री) हे नांदेडचे आहेत. यावरून विष्णुपुरी प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव “शंकरसागर” असे ठेवले.
  • नांदेड जिल्ह्याची सीमा तेलंगणा व कर्नाटक या दोन राज्यांना लागते.
  • कंधार या ठिकाणी “लाल कंधारी विकास” केंद्र आहे.
  • नांदेड हा “संस्कृत कवींचा जिल्हा” आहे.
  • दैनिक प्रजावाणी हे वृत्तपत्र नांदेड मधून प्रकाशित केले जाते.
  • पूर्वी चालुक्य घराण्याची राजधानी नांदेड होती.
  • “पवित्र जिल्हा” म्हणून नांदेडला ओळखले जाते
  • किनवट येथे किनवट अभयारण्य आहे.
  • “कोलाम” ही नांदेड जिल्ह्यातील अतिमागास जमात आहे.

Leave a comment