उत्तर महाराष्ट्रातील Nashik Jilha नाशिक हा एकूण पाच जिल्ह्यांचा प्रशासकीय विभाग आहे. Nashik Jilha नाशिक जिल्ह्याला मुंबईची परसबाग, धरणांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. मुंबई-पुणे-नाशिक सुवर्ण त्रिकोणातील एक कोण आहे. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने तिसरा तर लोकसंख्येच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्याचा चौथा क्रमांक आहे.
प्रशासकीय विभागाचे व जिल्ह्याचे मुख्यालय – नाशिक
महानगरपालिका(2) – नाशिक, मालेगाव.
क्षेत्रफळ – 15582 चौकिमी
स्थान व विस्तार – नाशिकच्या पूर्वेस जळगाव, आग्नेयस औरंगाबाद, दक्षिणेस अहमदनगर, पश्चिमेस पालघर, नैऋत्येस ठाणे, उत्तरेस धुळे, वायव्येस गुजरात मधील डांग व सुरत जिल्हे
तालुके(15) – नाशिक, इगतपुरी, कळवण, पेठ, दिंडोरी, चांदवड, मालेगाव, सुरगाणा, बागलाण (सटाणा), येवले, नांदगाव, निफाड, सिन्नर, त्रंबकेश्वर, देवळा.
नद्या – गोदावरी, गिरणा या मुख्य नद्या. दारणा, गिरणा, बाणगंगा, कादवा या अन्य नद्या. या सर्व नद्या जिल्ह्यातच उगम पावतात.
धरणे – गोदावरी नदीवर गंगापूर येथे मातीचे पहिले धरण आहे. दारणा, भावली, वालदेवी, आळंदी, भोजापुर, हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या, माणिकपूज, कडवा, चणकापुर, पुणद, नांदगाव येथे दारणा नदीवर लेक बीले जलाशय.
काठावरील ठिकाणे – नाशिक व कोपरगाव गोदावरी नदीकाठी, निफाड कादवा नदीकाठी.
फळ व पिके – नाशिकचे द्राक्ष प्रसिद्ध आहेत.
प्रमुख पिके – बाजरी, ज्वारी, तांदूळ, ऊस, निफाड व लासलगाव येथे कांदा व लसूण.
अभयारण्य – निफाड तालुक्यात नांदूर-मध्मेश्वर (महाराष्ट्राचे भरतपूर) ,भोरगड, ममदापूर (काळवीट अभयारण्य)
धबधबे – सुरगाणा येथे भिवतास धबधबा, दुगारवाडी धबधबा, गोदावरीवर सोमेश्वर (दूधसागर/दूधस्थळे) धबधबा येथे गोदावरी व आनंदी नद्यांचा संगम होतो.
जलसिंचन प्रकल्प – चणकापूर (गिरणा नदीवर) , गंगापूर (गोदावरी), दारणा (दारणा), गिरणा (गिरणा), करंजवन (कादवा), पालखेड (कादवा),अळवंडी (वैतरणा).
तलाव – चणकापूर, परसूल, दारणा, वाघद.
पठार – मालेगावचे पठार.
लेणी – त्रिरश्मी लेणी, चामर (चांभार) लेणी, म्हसरूळ लेणी, अंकाई लेणी.
औद्योगिक – नापा व्हॅली(Wine Capital Of India), सिन्नर, अंबड, सातपूर, मालेगाव येथे औद्योगिक वसाहती. नाशिक रोड येथे चलनी नोटा, पोस्ट कार्ड व तिकिटे छापण्याचा कारखाना (सिक्युरिटी प्रेस), ओझर येथे “मिग” विमानांचा कारखाना.
- सिन्नर (सिंदिनगर) हि यादवांची राजधानी व येथील गोंदेश्वर शिवालय प्रसिद्ध आहे.
- नाशिक – गोदावरी नदी काठावरील हिंदूचे तीर्थक्षेत्र, दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो.
- महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी). देवळाली आर्टिलरी, राज्य पोलीस अकॅडमी, पंचवटी, सीताकुंड, तपोवन, काळाराम मंदिर, सीतागुफा, धर्मचक्र जैन मंदिर नाशिक येथे आहे.
- नाशिक शहराची “मिनी महाराष्ट्र” अशी ओळख आहे.
- इगतपुरी येथे विपश्यना संशोधन केंद्र आहे.
- नाशिक शहराची प्राचीन नावे गुलाशानाबाद (गुलाबाच्या उत्पादनामुळे), जनस्थान, त्रिकंटक, नासिक.
- मनमाड (ता.नांदगाव) येथे रेल्वे जंक्शन आहे.
- हातमाग व यंत्रमागाचे प्रमुख केंद्र मालेगाव आहे.
- त्र्यंबकेश्वर देशातील बारा व राज्यातील पाच ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. ब्रह्मगिरी येथे गोदावरीचा उगम आहे.
- रावळगाव (ता.मालेगाव) येथे चॉकलेट उद्योग आहे.
- वणी (ता.कळवण) येथे माता सप्तशृंगी चे मंदिर आहे.
- येवला येथील पैठण्या व पितांबर जगप्रसिद्ध आहे.
- येवले हे तात्या टोपे यांचे जन्मगाव आहे व येथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली.
- मनमाड येथील शेंडीचा डोंगर (हडबीची शेंडी किंवा थम्सअप डोंगर) हे गिर्यारोहकाचे आकर्षण आहे.
- नाशिक हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
- भगूर (ता.नाशिक) हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मगाव आहे.
- नाशिक शहर हे तापी व गोदावरी या नद्यांच्या खोऱ्यात वसलेल्या दख्खन पठाराचा भूभाग आहे.
- नाशिक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.
- महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी ही संस्था नाशिक येथे आहे
- सातपुरा हे निसर्गरम्य स्थळ व थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण आहे.
- देवळाली हे सैन्याचे प्रशिक्षण केंद्र व थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
- भोजापुर येथे खडकात कोरलेले खंडोबाचे मंदिर आहे.
- नाशिक जिल्ह्यात इगतपुरी येथे निलगिरीपासून कागद निर्मिती कारखाना आहे.
- नाशिक प्रशासकीय विभागास उत्तर महाराष्ट्र असे म्हटले जाते