Thane Jilha : ठाणे जिल्हा  कोकण

उत्तर कोकणात पश्चिम किनाऱ्यावरील कोकण प्रशासकीय विभागातील ठाणे जिल्हा Thane Jilha आहे. ठाण्याचे प्राचीन नाव श्रीस्थानक होते. ठाणे जिल्हा हा सर्वाधिक स्थलांतरितांचा आणि विकसित जिल्हा आहे. Thane Jilha ठाणे जिल्हा मुंबईचे प्रवेशद्वार आहे. ठाणे जिल्ह्याचा राज्यात क्षेत्रफळाने 33वा तर लोकसंख्येने तिसरा क्रमांक आहे. ठाणे जिल्ह्याला राज्याची संस्कृतिक उपराजधानी म्हणतात.

मुख्यालय – ठाणे

क्षेत्रफळ – 4214 चौकिमी.

स्थान व विस्तार – ठाणे जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस रायगड जिल्हा.नैऋत्येस मुंबई उपनगर व मुंबई शहर हे जिल्हे, पूर्वेस सह्याद्री रांगा व त्या पलीकडे ईशान्यस नाशिक, उत्तरेस पालघर जिल्हा आहे.

तालुके(7) – ठाणे, भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, उल्हासनगर(सर्वात लहान ), अंबरनाथ.

महानगरपालिका(6) – ठाणे हा जिल्ह्यातील ठाणे हा राज्यातील सर्वाधिक 6 महानगरपालिकांचा जिल्हा आहे. ठाणे(1982), नवी मुंबई(1992), कल्याण-डोंबिवली(1982), उल्हासनगर(1998), भिवंडी-निझामपूर(2002), मीरा-भाईंदर(2002).

नद्या – वैतरणा व उल्हास या प्रमुख नद्या आहेत. बारावी, भातसा, तानसा, पिंजळ अन्य नद्या आहेत.

धरणे – वैतरणा नदीवरील मोडकसागर(ता.शहापूर), तानसा नदीवरील तानसा धरण(ता.शहापूर), भातसावरील भातसा धरण, बारावी धरण(मुरबाडी ता.शहापूर), सूर्या नदीवरील सूर्या (धामणी) धरण.

शहापूर हा धरणांचा तालुका आहे.

पिके – तांदूळ, वरी, नाचणी.

धबधबा – पांडवगड, उसरवर्धीने, माळशेज.

तलाव – तानसा( ता.भिवंडी ),भातसा (ता.शहापूर ).

लेणी – अशेरी, अंबरनाथ, लोनाद, नाणेघाट,सोपारा.

  • ठाणे जिल्ह्याला “तलावांचे शहर” म्हणतात.
  • ठाणे हा “पाणी पिकवणारा जिल्हा” आहे.
  • तत्वज्ञान विद्यापीठ ठाणे येथे आहे.
  • ठाणे हा महाराष्ट्राचा गावातळ जिल्हा आहे. येथील “मुशी” नावाचे गवत प्रसिद्ध आहे.
  • माहुली किल्ला भिवंडी तालुक्यात आहे.
  • तालुका भिवंडी येथे गरम पाण्याचे झरे आहेत.
  • टिटवाळा येथे सिद्धिविनायक महागणपती मंदिर आहे.
  • वैतरणा नदीवर मोडकसागर जलसिंचन प्रकल्प आहे(1954).
  • वज्रेश्वरी मंदिर तानसा नदीकाठी आहे.
  • टिटवाळा या  ठिकाणी काळू व उल्हास या नद्यांचा संगम आहे.
  • भिवंडी हे ठाणे जिल्ह्यातील कापड उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे.
  • महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त महानगरपालिका ठाणे जिल्ह्यात आहेत.
  • अंबरनाथ येथे संरक्षण मंत्रालयाचा दारुगोळा व शस्त्रनिर्मिती कारखाना आहे व प्राचीन शिवमंदिर आहे.
  • ठाणेची खाडी किंवा वसईची खाडी उल्हास नदीच्या मुखाशी आहे.
  • महाराष्ट्राची “सांस्कृतिक उपराजधानी” ठाणे आहे.
  • बोंबील माशाचे सर्वाधिक उत्पादन ठाणे येथे होते.
  • “उत्तन” हे बंदर मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे.
  • म्हसा ता.मुरबाड येथे गुरांचा मोठा बाजार भरतो.
  • शहापूर व मुरबाड या तालुक्यात आदिवासींची संख्या सर्वाधिक आहे.

Leave a comment