Pune Jilha : पुणे जिल्हा विद्येचे माहेरघर

पश्चिम महाराष्ट्रातील Pune Jilha पुणे हा एक विकसित जिल्हा व प्रशासकीय विभाग आहे. Pune Jilha पुणे जिल्ह्याला विद्येचे माहेरघर असे म्हणतात.

क्षेत्रफळ – 15643 चौकीमी.

जिल्हा व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय – पुणे

महानगरपालिका(2) – पुणे, पिंपरी-चिंचवड.

स्थान व विस्तार – उत्तर व पूर्वेस अहमदनगर, आग्नेयस सोलापूर, दक्षिणेस सातारा, पश्चिमेस रायगड, वायव्येस ठाणे जिल्हा.

तालुके(14) –  पुणे शहर, पुरंदर, आंबेगाव, इंदापूर, बारामती, भोर, हवेली, खेड, जुन्नर, शिरूर, दौंड, वेल्हे, मुळशी, मावळ.

नद्या – भीमा ही पुण्यातील मुख्य नदी आहे. इंद्रायणी, घोड, मुळा, मुठा, नीरा, कुकडी.

धरणे

  • वेळवंडीवरील भाटघर धरण(येसाजीकंक जलाशय),
  • अंबीनदीवर पानशेत धरण (तानाजीसागर जलाशय),
  • मोसी नदीवर वरसगाव धरण( वीर बाजी पासलकर जलाशय),
  • पवना नदीवर पवना धरण,
  • मुठा नदीवर टेमघर धरण,
  • खेड तालुक्यात भीमा नदीवर चासकमान धरण,
  • मातोबा धरण भीमा नदीवर,
  • जुन्नर तालुक्यात कुकडी नदीवर येळगाव धरण,
  • भुसी धरण इंद्रायणी नदीवर,
  • जुन्नर तालुक्यात कुकडी नदीवर पिंपळगाव धरण,
  • जुन्नर तालुक्यात कुकडी नदीवर माणिकडोह धरण (जलाशय शहाजी सागर),
  • खडकवासला धरण मुठा नदीवर(पासलकर जलाशय),
  • वीर धरण निरा नदीवर.
  • आंबेगाव तालुक्यात घोड नदीवर डिंभे धरण,

संगमस्थळे – रांजणगाव (भीमा, मुठा, मुळा), पिंपळगाव(भीमा, भामा), तुळापूर (भीमा,इंद्रायणी), निरा-नरसिंहपुर (निरा, भीमा), भोर (निरा, वेळवंडी), सोनगाव (निरा, कऱ्हा), शिरूर(घोड, कुकडी).

पिके – ऊस, बाजरी, गहू, जुन्नर येथील कांदा.

औद्योगिक – औद्योगिकदृष्टा विकसित असलेल्या पुणे जिल्ह्यात अनेक वसाहती आहेत. बजाज, टेल्को, टेम्पो, किर्लोस्कर इत्यादी नामांकित कंपन्यांचे कारखाने आहेत.

शैक्षणिक – पुणे विद्यापीठ(सावित्रीबाई फुले) (स्थापना 1949), पुणे विद्यापीठास “पूर्वेकडील ऑक्सफर्ड” असे म्हणतात. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे, (स्थापना 1921), श्री छत्रपती क्रीडा विद्यापीठ पुणे.

ठिकाणे – शनिवार वाडा, लालमहाल या  ऐतिहासिक वास्तु, सारसबाग, पर्वती टेकडी, पाताळेश्वर लेणी, डेव्हिग सिनेगोग, राजीव गांधी प्राणी संग्रहालय(कात्रज).

पर्यटनस्थळे – मुळशी तालुक्यात धामणी घाट, सिंहगड किल्ला, माळशेज घाट (ता.जुन्नर), खडकवासला धरण, भुशी धरण(लोणावळा), लायन्स पॉइंट(लोणावळा).

  • तळेगाव (दाभाडे) येथे काच उद्योग आहे.
  • खडकी-देहूरोड येथे संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना आहे.
  • मुंढवा येथे कागद गिरणी कारखाना आहे.
  • बारामती येथे कऱ्हा नदीकाठी द्राक्षापासून मद्यनिर्मिती प्रकल्प आहे.
  • आर्वी (ता. जुन्नर) येथे “विक्रम” हे दळणवळण केंद्र आहे.
  • पुणे हे मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर विद्येचे माहेरघर आहे.
  • पुण्याला पेशव्यांची राजधानी म्हणतात.
  • लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 एप्रिल 1663 रोजी शाहिस्तेखानाची बोटे छाटली.
  • आळंदी येथे इंद्रायणी तिरी खेड तालुक्यात संत ज्ञानोबा महाराजांनी संजीवन समाधी घेतली. प्रसिद्ध आषाढी यात्रा आळंदीहून पंढरपूरला निघते.
  • हवेली तालुक्यात देहू येथे जगद्गुरु संत तुकोबारायांची जन्मभूमी आहे.
  • आंबेगाव तालुक्यात भीमा नदीचे उगमस्थान आहे. भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून ते थंड हवेचे ठिकाण आहे.
  • पुरंदर तालुक्यात जेजुरी येथे खंडोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.
  • मावळ तालुक्यात कार्ला येथे एकविरा मातेचे मंदिर आहे.
  • शिरूर तालुक्यात वढू-तुळापुर येथे  छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे.
  • सासवड येथे सोपान देवांची समाधी आहे.
  • राज्यातील अष्टविनायकांपैकी पाच गणपती पुणे जिल्ह्यात आहेत.
  • भीमाशंकर येथे अभयारण्य आहे.
  • धबधबा मावळ-खेड तालुका सेमेवर “परिटेवाडी” धबधबा आहे.
  • राजमाची (लोणावळा) येथे कातळधार धबधबा आहे.
  • दुधीवरे (तालुका मावळ) येथे जोडधबधबा आहे.
  • लोणावळा-खंडाळा जवळ  कुणे धबधबा आहे.
  • भीमाशंकर येथे कोंढवळ धबधबा आहे.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे आहे.
  • कुकडी जलसिंचन प्रकल्प यात 5 धरणे येतात. (येळगाव,डिंभे,पिंपळगाव,माणिकडोह,वडज).

Leave a comment