Washim Jilha : वाशिम जिल्हा

Washim Jilha वाशिम जिल्हा अमरावती प्रशासकीय विभागातील जिल्हा आहे. तिसऱ्या ते सहाव्या शतकात वाकाटक  साम्राज्याची ही राजधानी होती व Washim Jilha वाशिम हि वत्स्यऋषींची तपोभूमी आहे. जैन व बंजारा बांधवांची काशी आहे.

मुख्यालय – वाशिम

महानगरपालिका – नाही

क्षेत्रफळ – 5150 चौकीमी

स्थान व विस्तार – पूर्वेस यवतमाळ, दक्षिणेस हिंगोली, पश्चिमेस बुलढाणा, उत्तरेस अकोला, ईशान्येस अमरावती.

तालुके(6) – वाशिम, रिसोड, कारंजा, मालेगाव, मंगळूरपीर, मनोरा.

नद्या – पैनगंगा ही प्रमुख नदी. कास ही पैनगंगेची उपनदी. काटेपूर्णा, मानोरा, अरुणावती, अडाण या इतर नद्या.

धरण – आडाण

अभयारण्य – कारंजा-सोहोळ, काटेपूर्णा

तलाव – डव्हा, कोल्ही, म्हसळा, कार्ली, उमरी, झुमका, पंचाळा, सोमठाणा, गावठाणा, रिसोड, धानोरा, रामगाव, शहा, नांदखेड, एकबुर्जी, सावरगाव, पिंपरी, गणेशपूर, मोहगव्हाण, मांडव, काजलांबा, सोनखास.

वने – वाशिम जिल्ह्यातील वनामध्ये साखर येण मंजन इत्यादी वृक्ष आढळतात अंजन

मृदा – काही ठिकाणी काळी सुपीक मृदा आढळते. डोंगराळ व पठारी भागात मध्यम प्रतीची मृदा आढळते.

पिके – खरीप व रब्बी हंगामातील पिके घेतली जातात. काही भागात संत्र्याचे पीक घेतले जाते.

उद्योगधंदे – कारंजा येथे अल्युमिनियमची भांडी तयार करण्याचा कारखाना व जिनिंग प्रेसचे कारखाने आहेत.

  • 1 जुलै 1998 रोजी अकोला जिल्ह्याच्या विभाजनातून वाशिम जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
  • वाशिमचे पूर्वीचे नाव वत्सगुल्म होते.
  • वाशिम येथे दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र आहे.
  • वाशिम येथे  पद्मावती तलाव, बालाजी मंदिर, मधमेश्वर मंदिर आहे.
  • कारंजा येथे नृसिंह-सरस्वती मंदिर, जैन मंदिर, दत्त मंदिर आहे.
  • कारंजा या ठिकाणाला “जैनाची काशी” असे म्हणतात.
  • पोहरा (ता.मनोरा) येथे बंजारा बांधवांचे श्रद्धास्थान पोहरादेवी मंदिर आहे.
  • पोहारा या ठिकाणाला “बंजारा समाजाची काशी” असे म्हणतात.
  • मंगळूरपीर येथे बिरबलनाथाचे मंदिर, सय्यद मौलाना हजर कलंदर दर्गा आहे.
  • शिरपूर येथे पार्श्वनाथ मंदिर आहे.
  • रिसोड येथे अमरनाथ बाबाचे मंदिर आहे.
  • प्राचीन काळी कल्पना केलेली पृथ्वीची मध्यरेषा ही वाशिम शहरातून जात होती.

Leave a comment