Solapur Jilha : सोलापूर जिल्हा

दक्षिण पूर्व महाराष्ट्रातील Solapur Jilha सोलापूर हा जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात आहे.

मुख्यालय – सोलापूर

क्षेत्रफळ – 14895 चौकीमी

महानगरपालिका(1) – सोलापूर

स्थान व विस्तार – सोलापूरच्या पूर्वेस व उत्तरेस उस्मानाबाद, आग्नेयेस व पूर्वेस कर्नाटक राज्य, दक्षिणेस सांगली जिल्हा व कर्नाटक राज्य, पश्चिमेस सातारा व पुणे, उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद.

तालुके(11) – दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा.

नद्या – भीमा ही प्रमुख नदी. पंढरपूरजवळ भीमेस “चंद्रभागा” म्हणतात. सीना, बोरी, मान, भोगावती या इतर नद्या.

संगमस्थळ – माळशिरस तालुक्य नीरा नरसिंहपूर येथे नीरा व भीमा नद्यांचा संगम आहे. कुडल (ता.द.सोलापूर) (भीमा व सीना ), मोहोळ (सीना व भोगावती), उचेठाण ता. मंगळवेढा (मान व भीमा)

धरणे – माढा तालुक्यात भीमा नदीवरील उजनी प्रकल्प(जलाशय याशवंतसागर),  

अभयारण्य – नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्य(ता. करमाळा)

पिके – सोलापूर हे ज्वारीचे कोठार आहे.

तलाव – एकरूप(द.सोलापूर) , पाथरी(बार्शी), हिंगणी(उ.सोलापूर), आष्टी(मोहोळ) ,बुद्धीहाळ(सांगोला), तिसंगी, वाडशिवनी

वने – शुष्क व काटेरी वने, वनांचे प्रमाण कमी आहे.

फळे – बोर डाळिंब सांगोला तालुका ही डाळिंब पंढरी मानली जाते

औद्योगिक – यंत्रमाग, हातमाग, सुतीवस्त्रोद्योग, चादर कारखाने.

शैक्षणिक – सोलापूर विद्यापीठ स्थापना 1 ऑगस्ट 2004.

प्रमुख ठिकाणे – सोलापूर वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र, भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर व तेथील “गड्डाची यात्रा”.

  • पंढरपूर हे ठिकाण भिमा नदीच्या काठावर आहे.
  • उजनी येथे भीमा नदीवर जलविद्युत केंद्र आहे.
  • पंढरपूर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे.
  • करमाळा येथे भुईकोट किल्ला व अष्टकोनी विहीर आहे.
  • मंगळवेढा हि  संतांची भूमी आहे व  संत दामाजी पंताचे जन्मगाव आहे.
  • बार्शी येथे  भगवंत मंदिर ( बार्शीला “भगवंताची बार्शी” म्हणतात ), वेळापूर येथील नटेश्वर मंदिर प्रसिध्द आहे.
  • अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ मंदिर व दत्त मंदिर आहे.
  • ब्रिटिश कालीन हिप्परगा तलाव सोलापूरचे “पक्षीतीर्थ” म्हणून प्रसिद्ध आहे.
  • कुरुडवाडी व होटगी या ठिकाणी रेल्वे जंक्शन आहे.
  • सोलापूर येथे बोरामणी (महात्मा बसवेश्वर) विमानतळ आहे.
  • राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव येथे आहे.
  • सोलापूरला हुतातम्यांचे शहर असे म्हणतात.
  • सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार असे म्हणतात.
  • दैनिक संचार, दैनिक भारत, तरुण भारत यांचे प्रकाशन स्थळ सोलापूर आहे.  

Leave a comment