Mumbai Upnagar : मुंबई उपनगर

Mumbai Upnagar मुंबई उपनगर जिल्हा कोकण प्रशासकीय विभागात येतो. 1990 पर्यंत मुंबई उपनगर जिल्हा हा मुंबई जिल्ह्यात होता. 1990 मध्ये Mumbai Upnagar मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई उपनगर हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला.

मुख्यालय – वांद्रे

तालुके(3) – अंधेरी, कुर्ला, बोरीवली.

स्थान व विस्तार – मुंबई उपनगरच्या पूर्वेस ठाण्याची खाडी, पश्चिमेस अरबी  समुद्र, नैऋत्येस माहीमची खाडी, दक्षिणेस मुंबई शहर हा जिल्हा, उत्तरेस ठाणे जिल्हा आहे.

क्षेत्रफळ – 446 चौकिमी.

नद्या – दहिसर(तुळसी तलावात उगम पावते), ओशिवरा, पोईसर, मिठी (सर्वाधिक प्रदूषित नदी).

महत्वाची ठिकाणे – पवई तलाव, विहार तलाव, जुहू चौपाटी, जोगेश्वरी लेणी, कान्हेरी लेणी, कान्हेरी गुफा, माउंट मेरी चर्च, भाभा अनु संशोधन केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ  .

समुद्र किनारे – जुहू चौपाटी, मढ बीच, मानोरी बीच, अक्सा बीच, गोराई बीच, वर्सोवा बीच.

तलाव – तुलसी तलाव ,विहार तलाव, पवई तलाव.

लेणी – कान्हेरी लेणी ,जोगेश्वरी लेणी.

  • मुंबई उपनगर मध्ये बोरिवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे.
  • मुंबई उपनगर हा जिल्हा साष्टी बेटाच्या दक्षिण भागात वसलेला आहे. हा जिल्हा राज्यातील प्रगत जिल्ह्यांपैकी एक आहे.
  • कान्हेरी येथे 112 गुफांमध्ये कोरलेली लेणी आहे.
  • मुंबई उपनगर मध्ये गोरेगाव येथे चित्रनगरी हे चित्रपट निर्मिती केंद्र आहे.
  • चेंबूर या ठिकाणी भारत सरकारच्या मालकीच्या राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर हा खता निर्मितीचा कारखाना आहे.
  • मुंबई उपनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसरा सर्वात लहान जिल्हा आहे.

Leave a comment