28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताच्या नवीन संसद भवनाचे Central Vista Project उद्घाटन संपन्न झाले.
भारतीय संसद हे संविधानाचे सर्वोच्च मंदिर आहे.
शंभर वर्षांपूर्वी तयार झालेल्या जुन्या संसद भवनाचे आवश्यक ते आधुनिकरण आणि बैठक क्षमता वाढवणे शक्य नसल्यामुळे नवीन संसद भावनांची उभारणी करण्यात आली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीदिनी नवीन संसद भवनाचे लोकार्पण करण्यात आले.
नवीन संसद भवन या प्रकल्पासाठी टाटा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीस 862 कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते,
नवीन संसदभावनाच्या उद्घाटन कार्यक्रमात रालोआतील घटक पक्ष तसेच अन्य 25 पक्ष सहभागी होते.
उद्घाटन कार्यक्रमावर काँग्रेससह 20 विरोधी पक्षांचा बहिष्कार होता.
संसदेच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पारंपारिक भारतीय कलांचे दर्शन होते तसेच भिंतीवर श्लोक नजरेस पडतात.
नवीन संसद भावनात संविधान हॉल उभारण्यात आला असून त्यात भारतीय संविधानाची मूळ प्रत ठेवण्यात आली आहे.
नव्या संसद भावनाची वैशिष्ट्ये :
नवीन संसद भवन त्रिकोणी आकाराची एकूण चार मजली इमारत आहे.
एकूण बांधीव क्षेत्र 64,500 चौरस मीटर आहे.
60 हजार कारागिरी या कामावर होते.
या इमारतीस मुख्य तीन दरवाजे आहेत. ज्ञानद्वार, शक्ती द्वार आणि कर्मद्वार.
लोकसभागृहाची रचना भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर या संकल्पनेवर आधारित आहे.
राज्यसभागृहाची रचना भारताचे राष्ट्रीय फूल कमळ या संकल्पनेवर आधारित आहे.
आसनक्षमता – लोकसभा 888 सदस्य व राज्यसभा 300 सदस्य.
दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक झाल्यास लोकसभेच्या सभागृहात 1280 सदस्य बसू शकतात.
नवीन संसद भवन इमारतीसाठी देशाच्या विविध भागातून वापरलेले साहित्य –
सागवान – नागपूर (महाराष्ट्र)
लाल व पांढरा वालुकाश्म – सर्मथुरा (राजस्थान)
केशरी-हिरवा दगड – उदयपूर (राजस्थान)
लाल ग्रॅनाईट – लाखा (अजमेर, राजस्थान)
पांढरा संगमरवर – अंबाजी (राजस्थान)
सेंगोल (राजदंड)चे हस्तांतरण :
ब्रिटिशांकडून सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वीकारलेला सेंगोल हा तामिळनाडूतील ऐतिहासिक राजदंड लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ बसवण्यात आला.
नव्या संसद भवनाचे (सेंट्रल व्हीस्टा प्रकल्पाचे) रचनाकार – बिमल हसमुख पटेल, HCP Design (अहमदाबाद)
बिमल पटेल यांनी सेंट्रल व्हिस्टा, साबरमती फ्रंट, काशी विश्वनाथ कॉरिडोर या प्रकल्पाचे डिझाईन केले आहे.
75 रुपयाच्या नाण्याचे अनावरण नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त हे नाणे प्रकाशित झाले. नाण्याचे वजन 34.65 ते 35.35 ग्रॅम.
नव्या संसद भवनात राष्ट्रीय मानचीन्हाचे अनावरण – 11 जुलै 2022 रोजी नव्या संसद भवनावर राष्ट्रीय मानचीन्ह असलेल्या ‘अशोक स्तंभाचे’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झाले.
स्वरूप – ब्रांझ धातूचा अशोक स्तंभ. उंची – 21 फूट (6.5 मीटर) रुंदी – 4.4 मीटर वजन – 9.5 टन
जुने संसद भवन (कौन्सिल हॉल) 1921 ते 1927 या काळात बांधण्यात येऊन 1927 साली खुले झाले.
जुन्या संसद भवनाचे रचनाकार सर एडविन ल्युटेन्स व हर्बर्ट बेकर हे होते.