Visheshan-विशेषण: मराठी भाषेतील महत्त्वपूर्ण वचनांचा अंग

नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण Visheshan असे म्हणतात.

उदाहरण-

लखन हुशार मुलगा आहे.

वरील उदाहरणांमध्ये लखन या नामाबद्दल हुशार हा शब्द विशेष माहिती सांगतो म्हणून हुशार हे विशेषण आहे ..

विशेषणाचे एकूण सहा प्रकार पडतात.

  • १)गुणवाचक विशेषण-Visheshan
  • २)संख्यावाचक विशेषण
  • ३)सार्वनामिक विशेषण
  • ४)नामसाधित विशेषण
  • ५)धातुसाधित विशेषण
  • ६)अव्यय साधित विशेषण

गुणवाचक विशेषण

जी विशेषणे नामांचे रंग, रूप, आकार, चव सांगणारी असतात त्यांना गुणवाचक विशेषण असे म्हणतात.  जी विशेषणे नामाची कोणत्याही प्रकारचे गुण किंवा विशेष दाखवतात त्यांना गुणवाचक विशेष असे म्हणतात.

उदाहरण-

हुशार कावळा,

आंबट बोर.

वरील उदाहरणांमध्ये हुशार, आंबट  हे गुणवाचक विशेषणे आहेत.

संख्यावाचक विशेषण

ज्या विशेषणांच्या रूपाने नामांची संख्या दर्शवली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात.

उदाहरण-

बागेत पुष्कळ झाडे आहेत.

आम्ही अर्धा तास खेळत होतो.

वरील उदाहरणांमध्ये पुष्कळ, अर्धा हे संख्यावाचक विशेषण आहेत.

संख्याविशेषणाचे प्रकार:

  • गणना वाचक संख्याविशेषण
  • क्रमवाचक संख्याविशेषण
  • आवृत्तीवाचक संख्याविशेषण
  • प्रथकत्ववाचक संख्याविशेषण
  • अनिश्चित संख्याविशेषण
  • गणनावाचक संख्याविशेषण

ज्या विशेषणाचा उपयोग केवळ गणना करण्यासाठी होतो, त्या विशेषणाला गणनावाचक संख्या विशेषण असे म्हणतात.

उदाहरण-

चार बदके

दहा पेन

वरील उदाहरणांमध्ये चार व दहा हे गणनावाचक संख्या विशेषण आहेत.

क्रमवाचक संख्याविशेषण

ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूंचा क्रम दाखवण्यासाठी केला जातो, त्या विशेषणाला क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात.

उदाहरणार्थ-

  • पाचवे घर
  • चौथा नंबर

वरील उदाहरणामध्ये पाचवे व चौथा हि क्रमवाचक संख्याविशेषण आहेत.

आवृत्तीवाचक संख्याविशेषण

ज्या विशेषणाचा उपयोग किती वेळा हा बोध करण्यासाठी केला जातो, त्या विशेषणाला आवृत्तीवाचक संख्याविशेषण असे म्हणतात .

उदाहरणार्थ-

दुप्पट भाडे

पाचपट रक्कम

वरील उदाहरणांमध्ये दुप्पट व पाचपट ही आवृत्तीवाचक संख्याविशेषण आहेत.

प्रथकत्ववाचक संख्याविशेषण

ज्या संख्या विशेषणाचा उपयोग वेग वेगळेपणाचा बोध करण्यासाठी केला जातो, त्या विशेषणाला प्रथकत्ववाचक संख्याविशेषण असे म्हणतात.

उदाहरणार्थ-

 पाच पाचचा गट

दहा दहाची जुडी

अनिश्चित संख्याविशेषण

जी संख्या विशेषणे निश्चित अशी संख्या दाखवत नाही ,त्या विशेषणाला अनिश्चित संख्याविशेषण असे म्हणतात.

उदाहरणार्थ-

पुष्कळ झाडे

काही पक्षी

थोडे पाणी

वरील उदाहरणांमध्ये पुष्कळ, काही, थोडे या संख्या विशेषणावरून निश्चित अशा संख्येचा बोध होत नाही ,म्हणून त्यांना अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात.

सर्वनामिक विशेषण

जी सर्वनामे त्यांच्यापुढे आलेल्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणजेच ती विशेषणाची कार्य करतात, म्हणून त्यांना सर्वनामिक विशेषण असे म्हणतात .

उदाहरणार्थ-

मी-माझा माझी

तू- तुझा तुझी

नामसाधित विशेषण

वाक्यामध्ये नामांचा उपयोग विशेषणासारखा होतो, त्यास नामसाधित विशेषण असे म्हणतात.

उदाहरणार्थ-

तो फळ विक्रेता आहे.

त्या ठिकाणी फळ हे मूळ नाव आहे परंतु विक्रेता हे नाम साधित विशेषण आहे.

धातुसाधित विशेषण

एखाद्या वाक्यामध्ये नामाची विशेषणे ही क्रियापदाच्या मूळ रूपापासून बनलेली असतात, अशा विशेषणाला धातुसाधित विशेषण असे म्हणतात.

उदाहरणार्थ-

तो पेरू खाणारा मुलगा पहा.

वरील उदाहरणांमध्ये खा या धातूपासून खाणारा हे धातुसाधित विशेषण तयार झाले आहे.

अव्ययसाधित विशेषण

वाक्यामध्ये काही अव्यय लागून जी विशेषणे तयार झालेली असतात, त्या विशेषणाला अव्ययसाधित विशेषण असे म्हणतात.

उदाहरणार्थ-

बाहेरचा रस्ता अरुंद आहे.

वरील उदाहरणांमध्ये बाहेरचा हे अव्यय साधित विशेषण आहे.

  • गुणवचन विशेषण (Qualitative Adjectives)
  • पर्यायी विशेषण (Comparative Adjectives)
  • संख्याक विशेषण (Numerical Adjectives)
  • सापेक्ष विशेषण (Demonstrative Adjectives)
  • विशेषणत्मक संज्ञा (Attributive Nouns)
  • परिपूर्ण विशेषण (Perfect Adjectives)
  • अनिश्चित विशेषण (Indefinite Adjectives)
  • भाषांतर (Translation)
  • वर्णन (Description)
  • गुणवत्ता (Quality)
  • विशेषता (Characteristic)
  • संख्या (Number)
  • प्रकृती (Nature)
  • स्वरूप (Form)
  • व्यक्ती (Person)
  • विविध (Various)
  • मराठी व्याकरण (Marathi Grammar)

पुढे हे पण वाचा

Leave a comment