Skip to content
Marathi mahni
अंधारात केले तरी उजेडात आले – गुप्तपणे केलेली गोष्ट कधीही सर्वांना कळू शकते.
अग अग म्हशी मला कुठे नेशी – एकाच्या चुकीसाठी इतर लोकांना दोष लावणे.
अठरा विश्व दारिद्र्य असणे – अति दुर्बल असणे.
अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मुर्खाची मन धरणी करावी लागते.
अडाण्याची गोळी भल्यास गेली – अडाणी माणूस कोणालाही अडचणीत आणू शकतो.
अति झाला अन हसू आलं – एखाद्या गोष्टीचा उहापोह केला तर ती गोष्ट हास्यास्पद ठरते.
अति तेथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.
अति राग भीक माग – क्रोधामुळे कोणतीही गोष्ट साध्य करता येत नाही.
अती शहाणा त्याचा बैल रिकामा – जो व्यक्ती अति शहाणपणा करतो त्या व्यक्तीचे कधीही कोणते काम नीट होत नाही.
अपयशी यशाची पहिली पायरी आहे – कोणतेही यश मिळवताना सुरुवातीला अपयश येऊ शकते.
असतील शिते तर जमतील भुते – आपल्या जवळ पैसे असेपर्यंत सर्वजण येतात.
असू ना मासू, कुत्र्याची सासू – सर्व इच्छेप्रमाणे झाले असते तर सर्व लोक धनवान झाले असते.
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन- अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे.
आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते – एकाने मेहनत करायची व दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यायचा.
आंधळ्याची बहिऱ्याची गाठ – एकमेकांना मदत न करता व्यक्ती जवळ येणे.
आगीतून निघून फुफाट्यात पडणे – एका संकटातून दुसऱ्या संकटात सापडणे.
आचार तेथे विचार – चांगली संस्कृती चांगल्या विचारांना जन्म देते.
आज अंबारी तर उद्या झोळी – कधी थाटामाटात तर कधी दरिद्री राहणे.
आजा मेला नातू झाला – नुकसान झाल्यावेळी फायद्याची गोष्ट घडणे.
आठ हात काकडी नऊ हात बी – एखाद्या गोष्टीची फारच स्तुती करून सादर करने.
आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? – स्वतःजवळ नाही तर ते दुसऱ्याच काय देणार.
आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी – आधी वर्तन बिघडते, मग मनुष्य कंगाल होतो.
आधी पोटोबा मग विठोबा – प्रथम पोटाची सोय पहावी नंतर देवधर्म करावा.
आधीच तारे त्यात गेले वारे – विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडण्याची घटना घडणे.
आपला तो बाब्या दुसऱ्यांचे ते कार्टे – आपले विचार हे दुसऱ्या पेक्षा श्रेष्ठ कसे ही वृत्ती अंगी असणे.
आपला हात जगन्नाथ – आपल्याला घेण्याची संधी मिळताच मुबलक घेणे.
आयत्या बिळात नागोबा – दुसऱ्याच्या कष्टाचा फायदा स्वतःसाठी करून घेणे.
आलिया भोगासी असावे सादर – आलेल्या संकटात कुरकुर न करता तोंड देणे भाग असते.
आवळा देऊन कोहळा काढणे – स्वार्थ साधण्यासाठी लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे.
इकडे आड तिकडे विहीर – कोंडी होणे.
इच्छा तसे फळ – मनात चांगले विचार ठेवून केलेले कार्य यशस्वी होते.
इच्छा तेथे मार्ग – जर एखादी गोष्ट मनापासून करायची असेल तेथे मार्ग निघतो.
इज्जतीचा फालुदा होणे – अपमान होणे.
उंच वाढला एरंड तरी होईना इक्षुदंड – छोट्या गोष्टी मोठ्यांशी बरोबरी करू शकत नाही.
उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा.
उंटावरून शेळ्या हाकणे – आळस ,हलगर्जीपणा करणे.
उंदराला मांजर साक्ष – एकमेकांना साथ देणे.
उखळात हात घातल्यावर मुसळा ची भीती कशाला – एखाद्या मोठ्या कठीण काम हातात घेतल्यानंतर श्रमाचा विचार करायचा नसतो.
उचलली जीभ लावली टाळ्याला – कोणताही विचार न करता बोलणे.
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग – उतावळेपणाने मूर्ख सारखे वर्तन करणे.
उथळ पाण्याला खळखळाट फार – अंगात थोडीशी कुवत असून देखील जास्त दिमाग दाखवणे.
उसाच्या पोटी कापूस सद्गुनी – माणसाच्या पोटी दुर्घिनी लेकरू.
एक ना धड भारावर चिंध्या – एकाच वेळी अनेक गोष्टी केल्याने सर्वच गोष्टी अर्धवट राहतात
एका पिसाने मोर होत नाही – थोड्याशा यशाने जास्त आनंदित होऊ नका.
एका माळ्याचे मणी – सर्व लोक सारख्या स्वभावाची असणे.
एका हाताने टाळी वाजत नाही – कोणत्याही भांडणात दोष एकाचाच नसतो.
एकादशीच्या घरी शिवरात्र येणे – संकटात आणखीन संकट येणे.
एकावे जनाचे करावे मनाचे – अनेकांचा सल्ला घ्यावा पण स्वतःला पटेल तेच करावे.
कधी तुपाशी तर कधी उपाशी – परिस्थिती नेहमी सारखी नसते कधी चांगले दिवस तर कधी वाईट दिवस येणे.
करावे तसे भरावे – वाईट प्रत्येक करणाऱ्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.
काखेत कळसा नि गावाला वळसा – हरवलेली वस्तू जवळ असताना सर्वत्र शोधणे.
काप गेले नी भोके राहिली – संपत्ती गेली आणि फक्त आठवणी उरल्या.
कामापुरता मामा – काम असताना गोड बोलणे.
कावळा बसायला आणि फांदी तुटायला – परस्परांशी काही संबंध नसताना दोन गोष्टी योगायोगाने एकाच वेळी घडणे.
कुठे राजाभोज कुठे गंगूतेली – बलाढ्य माणूस आणि दुर्बल याची तुलना होऊ शकत नाही.
कुठेही जा पळसाला पाने तीनच – सर्वत्र परिस्थिती सारखीच असते.
कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच – वाईट सवय कधीही जात नाही.
केळीला नारळी आणि घर चंद्रमौळी – खूप दारिद्र्याची बिकट अवस्था येणे.
कोंड्याचा मांडा करून खाणे – मिळेल ते गोड मानून खाणे.
कोळसा उघळावा तितका काळाच – वाईट गोष्ट कितीही तपासली तरीही त्यातून वाईटच निघणार.
खऱ्याला मरण नाही – खरे एक दिवस सर्वांच्या समोर येते.
खाई त्याला खवखवते – वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते.
खाऊन माजा पण टाकून माजू नये – दान करावे पण संपत्तीचा गैरवापर करू नये.
खायला काळ भुईला भार – काम न करणारा व्यक्ती सर्वांना भारदार वाटतं.
खाल्ल्या घराचे वासे मोजणे – ज्या घरात राहतो त्याच घराशी बेईमानी करणे.
खोट्याच्या कपाळी गोटा – वाईट काम करणाऱ्याचे नुकसान होते.
ग ची बाधा झाली – आत्मविश्वास बळावणे.
गंगा वाहते तोवर हात धुऊन घेणे – जोपर्यंत लाभ घेता येतो तोपर्यंत स्वार्थ साधून घेणे.
गड आला पण सिंह गेला – एक महत्त्वाची गोष्ट मिळवताना दुसरी गोष्ट दूर जाणे.
गरज सरो वैद्य मरो – गरज संपल्यावर उपकार कर्त्याला विसरणे.
गरजवंताला अक्कल नसते – गरजू व्यक्तीला दुसऱ्याचे बोलणे व वागणे हवे तसे न काही बोलता सहन करावे लागते.
गर्वाचे घर खाली – माणसावर नाचक्की ची वेळ येते.
गळ्यातले तुटले ओटीत पडले – नुकसान होता होता वाचले.
गाड्या बरोबर नळ्याची यात्रा – मोठ्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे.
गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता – मुर्खाला कितीही समज दिली, तरी त्याचा काही उपयोग नसतो.
गाढवाला गुळाची चव काय? – मूर्ख व्यक्तीला चांगल्या गोष्टीची किंमत नसणे
गावात घर नाही आणि रानात शेत नाही – कफल्लक असणे किंवा दरिद्री असणे.
गोगलगायनी पोटात पाय – एखाद्याचे खरे रूप न दिसणे.
गोरा गोमटा कपाळ करंटा – नुसते देखणेपण पण काही कामाचे नसते.
घर ना दार देवळी बिऱ्हाड – बायको पोरे नसणारा एकटा मनुष्य.
घरोघरी मातीच्या चुली – सर्वत्र सारखी परिस्थिती असणे.
घोंगडे भिजत पडणे – एखादी गोष्ट खूप दिवसापासून प्रलंबित असणे.
घोडा मैदाना जवळ असणे – परीक्षा लवकरच होणे.
चकाकते ते सोने नसते – बडेजाव करणारे सर्वजण श्रीमंत नसतात.
चढेल तो पडेल – उत्कर्षासाठी धडपडणाऱ्याला अपयश आले तर त्यात कमीपणा येत नाही.
चांभाराची नजर जोड्यावर – आपापल्या व्यवसायास संबंधित गोष्टीकडे मनुष्य अधिक रस घेऊन अवलोकन करतो.
चार जणांची आई बाजेवर जीव जाई – जबाबदारी प्रत्येकाची असली तरी मात्र काळजी कोणीच घेत नाही.
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाचा दिवस असतो.
चालत्या गाडीला खेळ घालने – एखाद्याच्या चांगल्या कामात व्यत्य आणणे.
चुकणे हा मानवाचा धर्म आहे – मनुष्यप्राणी हा चुकू शकतो.
चोर नाही तर चोराची लंगोटी – भरपूर अपेक्षा असताना अल्पलाभावर समाधान मानणे.
चोर सोडून सन्यासालाच फाशी – खरा अपराधी सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे.
चोराची पावलं चोराला ठाऊक – वाईट माणसांनाच वाईट माणसाच्या युक्त्या कळतात.
चोराच्या उलट्या बोंबा – स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे.
चोराच्या मनात चांदणे – वाईट प्रत्येक करणाऱ्याला आपले कृत्य उघडकिला येईल की काय अशी सतत भीती वाटणे.
छत्तीसचा चा आकडा – विरुद्ध मत असणे.
जळतं घर भाड्याने कोण घेणार – नुकसान करणाऱ्या गोष्टींचा स्वीकार न करणे.
जशी देणावळ तशी धुणावळ – कामाच्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे.
जशी नियत तशी बरकत – आपले यश आपल्या चांगल्या विचारावर अवलंबून असते.
जसा गुरु तसा चेला – एक प्रमुख व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली त्या व्यक्तीच्या स्वभावाचे लोक निर्माण होतात.
जात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत – एक गोष्ट असली तरी तिच्या जोडीला पाहिजे ती गोष्ट नसणे.
जावे त्याचा वंशा ,तेव्हा कळे – एखाद्या व्यक्तीचे दुःख त्याच्याजवळ गेल्यावर कळते.
जिथे पिकत तिथे विकत नाही – एखादी गोष्ट भरपूर प्रमाणात असलेल्या भागात त्या गोष्टीचे महत्त्व राहत नाही.
जो खाईल आंबा तो सोसल ओळंबा – एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना त्याचे दोष स्वीकारावे.
जो गुळाने मारतो त्याला विष कशास? – जिथे गोड बोलून काम होते तिथे कठोर उपयांची गरज नसते.
ज्याचं जळतं त्यालाच कळतं – आपले दुःख आपल्याला सोसावे लागते.
ज्याचा कंटाळा त्याचा वानोळा – जी कंटाळवाणी बाबा असते ती स्वीकारावी लागते.
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी – आपल्यावर जे उपकार करतो त्याचे गुण गावे.
ज्याच्या हाती ससा तो पारधी – ज्याला यश आले तो कर्तबगार.
ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नकल – मूर्ख माणसाची सर्वत्र उपेक्षा व टिंगल होते.
झाकली मूठ सव्वा लाखाची – अब्रू राखणे.
टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण येत नाही – कष्ट सोसल्याशिवाय फळ मिळत नाही.
डोंगर पोखरून उंदीर काढणे – जास्त श्रम करून कमी फायदा होणे.
ढवळ्या जातो आणि पवळ्या येतो पण सावळा गोंधळ तसाच राहतो – कारभारी व्यक्ती बदलली तरी फारसे बदल होत नाहीत आणि तोच तो गोंधळ उडतो.
ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या वाण नाही पण गुण लागला – दोन व्यक्तींना सोबत राहताना एकमेकांच्या सवयी लागने.
तरण्याचे कोळसे म्हातार्याला बाळसे – विरुद्ध गोष्टी होणे.
ताकापूरते रामायण – एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे.
ताकास तूर लागू न देणे – कोणत्याही गोष्टीचा थांगपत्ता लागू न देणे.
तू दळ माझे आणि मी दळते गावच्या पाटलाचे – आपले काम दुसऱ्याने करावे आपण मात्र गावचे कामे करावे.
तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले – एकही गोष्ट पूर्ण न होणे.
तोंड दाबून बुक्क्यांचा मारा – एखाद्याला विनाकारण शिक्षा देणे.
थेंबे थेंबे तळे साचे – छोट्या साठवणीतून मोठा संग्रह होतो.
दगडापेक्षा वीट मऊ -मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसान करते.
दहा गेले पाच उरले – जीवन कमी उरणे.
दही खाऊ का मही खाऊ – हे करावे का ते करावे हे न कळणे.
दात कोरून पोट भरत नाही – मोठ्या व्यवहारात काटकसर करून चालत नाही.
दाम करी काम ,बीबी करी सलाम – पैसे टाकले की कोणतेही काम सहजरीत्या होते.
दिवस बुडाला मजूर उडाला – रोजाने काम करणारा स्वतःच समजून कधीच काम करणार नाही कामाची वेळ संपते तोच तो निघून जाणार.
दिव्याखाली अंधार – मोठ्या माणसात देखील दोष असतात.
दुभत्या गायीच्या लाथा गोड – पुढे जाऊन ज्याच्यापासून काही फायदा होणार आहे त्याचा त्रास देखील मनुष्य आज सहन करतो.
दुरून डोंगर साजरे – दुरून चांगल्या दिसणाऱ्या गोष्टीचे खरे रूप जवळून समजते.
दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर.
देव देते कर्म नेते – देवाने लाभलेली गोष्ट वाईट वागणुकीमुळे टिकत नाही.
दैव आले द्यायला पण पदर नाही घ्यायला – नशिबाने मिळणे परंतु घेता न येणे.
दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई – नशिबावर अवलंबून असणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोटभर खातात.
दोन मांडवांचा वराडी उपाशी – दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्या चे काम होत नाही.
धर्म करता कर्म उभे राहते – एखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते.
न कर्त्याचा वार शनिवार – ज्याला एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्यातरी सबबीवर ते टाळतो.
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न – काम करणाऱ्यांच्या मार्गात एक सारख्या अनेक अडचणी येतात.
नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ पाहणे – नदीचे उगम स्थान व ऋषीचे कुळ पाहू नये कारण त्यात काहीतरी दोष असतोच.
नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे – केलेला उपदेश निष्फळ ठरणे.
नव्याचे नऊ दिवस – कोणत्याही गोष्टीचा नवीन पणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्त्व नाहीसे होणे.
नाकापेक्षा मोती जड होणे – डोईजड होणे.
नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वाट – एकाचे लुटून दुसऱ्याला दान करणे.
पालथ्या घड्यावर पाणी – सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे.
बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोन पैकी एक पर्याय निवडणे.
बापाला बाप म्हणे ना चुलत्याला काका कसा म्हणेल – जवळच्यांचा मान न ठेवणारा दुसऱ्याचा मान का ठेवील.
भुकेला कोंडा निजेला धोंडा – अगदी साधेपणाने राहणे.
मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही.
या बोटावरची थुंकी त्या बोटावर घेणे – बनवाबनवी करणे.
रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर वेळ कमी.
लहान तोंडी मोठा घास घेणे – स्वतःच्या योग्यतेच न शोभेल असे वर्तन करणे.
साखरेचे खाणार त्याला देव देणार – चांगले इच्छा करणाऱ्याला चांगलेच मिळत राहणार.
हात ओला तर मित्र झाला – फायदा असेपर्यंत सारे भोवती गोळा होतात.
हाताच्या काकणाला आरसा कशाला – प्रत्यक्ष स्पष्ट असणाऱ्या गोष्टीस पुरावा नको असतो.
अडली गाय अन फटके खाय – अडचणीत सापडलेल्या व्यक्तीस जास्त त्रास देणे
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे – कोणतेही यश मिळवताना सुरुवातीला अपयश येऊ शकते
आमचे गहू आम्हालाच देऊ – आपल्याच वस्तूचा चतुराईने दुसऱ्यांना लाभ न मिळू देता तो स्वतःच लाभ घेणे
अशा ची माय निराशा – निराशा येईल म्हणून आशा कधीही सोडू नका
आज अंबारी उद्या झोळी धरी – कधी थाटामाटात तर कधी दारिद्र्य राहणे
आचार भ्रष्ट आणि सदा कष्ट – अनाचाराने वागणारा माणूस सादा दुःखी असतो
असेल तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगा – भरपूर पैसा असल्यावर चैन करायची नाही तर गप्प बसायचे.
आपली पाठ आपणास दिसून येत नाही – आपले दोष आपल्याला दिसत नाहीत.
आपण हसे लोकांना अनं घाण आपल्या नाकाला – ज्या देशाबद्दल लोकास हसायचे तोच दोष आपल्यात असताना दुर्लक्ष करणे.
आत्या बाईला मिशा असत्या तर तिला काकाच म्हटले असते – अशक्य गोष्टींची चर्चा करण्यात काही अर्थ नसतो. इज्जतीचा फालुदा होणे – अपमान होणे.
अक्कल खाते जमा – नुकसान होणे.
धीच तारे त्यात गेले वारे – विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारे घटना घडणे.
इच्छापरा ते येई घरा – दुसऱ्यांच्या बाबतीत वाईट चिंतन करणे आणि तेच आपल्याला वाटायला येणे.
उकराल माती तर पिकतील मोती – शेती चांगली मशागत केल्यास चांगले पीक येते.
उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक – गोष्टीची परीक्षा घेण्यासाठी वाट पाहणे.
एका माळेचे मणी – सर्व लोक सारख्या स्वभावाचे असणे.
एका पिसाने मोर होत नाही – थोड्याशा यशाने जास्त आनंदित होऊ नका.
कर नाही त्याला डर कशाला – ज्याने काही केलं नाही त्याला भीती कशाची?
करीन ते पूर्व – मी करेल तेच योग्य अशा विचाराने वागणे.
करून करून भागला देव ध्यानी लागला – वाईट कृत्य करून शेवटी देव धर्माला लागणे.
काल महिना आणि आज पितर झाला – अतिशय लगबगीचे लक्षण.
काखेत कळसा आणि गावाला वळसा – जवळची वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे.
कोल्हा काकडीला राजी – लहान लहान गोष्टींना गोष्टींनी खुश होणे.
खायला काळ भुईला भार – काम न करता व्यक्ती सर्वाला भारदार वाटतो.
गर्वाचे घर खाली – गर्विष्ठ माणसाचे नेहमी शेवटी नेहमी अपमान होतो.
घेता दिवाळी देता शिमगा – घेताना आनंद वाटतो पण देताना मात्र नको वाटते.
घोडे कमावते आणि गाढव खाते – एकाने कष्ट करावे व दुसऱ्यांनी त्याचा गैरफायदा घ्यावा.
चालत्या गाडीला खेळ – सुरळीत चालणाऱ्या कामात अडचण आणणे.
नाम करी काम बीबी करी सलाम – पैसे टाकले की कोणतेही काम सहजरीत्या होते.
नव्याचे नऊ दिवस – कोणत्याही गोष्टीचा नवेपणा काही काळ असतो कालांतराने तो नाहीसा होतो.