Indian States Union Territories and their capitals : भारतातील घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश व त्यांची राजधानी

Indian States Union Territories and their capitals

भारत देशामध्ये 2८  राज्य व ८  केंद्रशासित प्रदेश आहेत.

२६  जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानानुसार देशात 28 राज्य होते यांचे चार वर्ग पाडण्यात आले होते. या राज्यातून पुढे १९५६ साली सातव्या घटनादुरुस्तीद्वारे १४ घटक राज्य व ६ केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली.

केंद्रशासित प्रदेश हे कोणत्याही राज्याचा भाग नसून त्यांचे प्रशासन थेट केंद्र सरकार द्वारे केले जाते. भारताचे राष्ट्रपती प्रत्येक केंद्रशासित प्रदेशासाठी प्रचालकाची नेमणूक करतात.

प्रशासनिक सोयीसाठी भारतात आधी २९ घटक राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात होते.

५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू काश्मीर राज्यास विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करून ‘जम्मू काश्मीर’ व ‘लडाख’ हे दोन नवे केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले.

३१ ऑक्टोबर २०१९ पासून याची अंमलबजावणी करण्यात आली.

२६ जानेवारी २०२० रोजी ‘दादरा आणि नगरहवेली’ आणि ‘दीव आणि दमण’ या दोन केंद्रशासित प्रदेशांचे एकत्रिकरण करण्यात आले.

यामुळे भारतात आता २८ घटक राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेश (संघराज्य) अस्तित्वात आहेत.

भारतातील घटकराज्य व त्यांची राजधानी:

अ.क्र.घटकराज्यराजधानी
१अरुणाचल प्रदेशइटानगर
२आसामदिसपुर
३आंध्र प्रदेशअमरावती
४ओडिसाभुवनेश्वर
५उत्तर प्रदेशलखनऊ
६उत्तराखंडडेहराडून
७कर्नाटकबेंगळूरू
८केरळतिरुअनंतपुरम
९गुजरातगांधीनगर
१०गोवापणजी
११छत्तीसगडरायपूर
१२झारखंडरांची
१३तामिळनाडूचेन्नई
१४तेलंगणाहैदराबाद
१५त्रिपुराअगरतळा
१६नागालँडकोहिमा
१७पश्चिम बंगालकोलकाता
१८पंजाबचंदिगढ
१९बिहारपाटणा
20महाराष्ट्रमुंबई
२१मध्य प्रदेशभोपाळ
२२मनिपुरइफाळ
२३मिझोरमऐजवाल
२४मेघालयशिलॉंग
२५राजस्थानजयपुर
२६सिक्कीमगंगटोक
२७हरियाणाचंदीगड
२८हिमाचल प्रदेशशिमला

केंद्रशासित प्रदेश व राजधानी:

अ.क्र.केंद्रशासित प्रदेशराजधानी
१अंदमान व निकोबारपोर्ट ब्लेअर
२चंदीगढचंदीगढ
३दिल्लीदिल्ली
४दादरा व नगर हवेली आणि व दीव  दमण
५जम्मू आणि काश्मीरश्रीनगर, जम्मू
६लडाखलेह कारगिल
७लक्षद्वीपकवरत्ती
८पुडूचेरीपुडूचेरी

Post Comment

You May Have Missed