Bharatatil mruda sampatti : भारतातील मृदासंपत्ती

Bharatatil mruda sampatti-शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा व सर्वात जुना व्यवसाय आहे.

वनस्पतीच्या वाढीसाठी मृदा ही महत्त्वाचा घटक आहे. शेत जमिनीचे मूल्यमध्येच्या सुपीकतेनुसार ठरते शेती हा व्यवसाय भारतीय लोकांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे.

भारतात विविध प्रकारच्या मृदा आढळतात. मृदा निर्मितीच्या प्रक्रियेवर प्रामुख्याने त्या प्रदेशातील मूळ खडक, हवामान, वनस्पती व प्राणी जीवन यांचा परिणाम होतो.

अपक्षरण क्रियेने प्रदेशातील खडकांचा भुगा होतो. त्या खडकातील खनिजे तयार झालेल्या मृदेत आढळतात. या मृदेस असेंद्रिय मृदा असे म्हणतात.

वनस्पती व प्राण्यांची अवशेष मदेत मिसळल्यावर कुजतात व मृदेचा भाग बनतात, या कुजलेल्या द्रव्याला सेंद्रिय द्रव्य असे म्हणतात. सेंद्रिय द्रव्यांमुळे मृदेला काळा रंग येतो व तिची सुपीकता वाढते.

भारतीय कृषी संशोधन परिषदेने भारतातील मृदेचे प्रकार

१)पर्वतीय मृदा

२)गाळाची मृदा

३)वालुकामय मृदा

४)रेगुर मृदा

५)तांबडी मृदा

६)जांभी मृदा

७)दलदलयुक्त मृदा

८)क्षारयुक्त व अल्कली मृदा

१)पर्वतीय मृदा

तापमानातील भिन्नता, हिम, पाऊस इत्यादीच्या अपक्षयामुळे पर्वतीय मृदेची निर्मिती होते.

या प्रदेशातील तीव्र उतार व जलद वाहणाऱ्या जलौघामुळे भूपृष्ठावर खंडकाचा झालेला भुगा किंवा तुकडे फार काळ त्या ठिकाणी टिकून राहत नाहीत. ते उतारा कडे वाहून जातात. त्यामुळे मृदेची निर्मिती पूर्ण होत नाही. ती जाडीभरडी व खडकांचे तुकडे असलेली असते तिला अपरिपक्व मृदा असे म्हणतात.

या मृदेत पाणी टिकून राहत नाही कारण ते धरून ठेवण्यासाठी कणांचा आकार सूक्ष्म व चिकन मातीयुक्त असायला हवा. तसेच ज्या पिकांना पाण्याचा निचरा होणारी मृदा लागते त्यासाठी व निरनिराळ्या वृक्ष व पिकांसाठी पर्वतीय मृदा उपयोगी पडते.

पिके– डोंगर उतारावरील चहाची मळे पर्वतीय मृदेत चांगली वाढतात.

मृदेचा प्रदेश– जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश इत्यादी.

२)गाळाची मृदा

भारताचे फार मोठे क्षेत्र हे गाळाच्या मृदेने व्यापलेले आहे.

प्रामुख्याने नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या निक्षेपण कार्यामुळे ही मृदा तयार होते. म्हणून ही मृदा नद्यांच्या खोऱ्यात व किनाऱ्यावरील मैदानी प्रदेशात आढळते.

या मृदेचा रंग पिवळा असून त्यामध्ये वाळू, चिकन माती व सेंद्रिय पदार्थाचे मिश्रण असते. ही मृदा बारीक सूक्ष्म कणांनी बनलेली असल्यामुळे ती पाणी धरून ठेवते.

या मृदेत पालाशप व चुना यांचे प्रमाण जास्त असते.

गंगेच्या खोऱ्यात जुन्या गाळाची भांगर मृदा पूर मैदानापासून पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशात आढळते.

या मृदेत खड्याचे प्रमाण अधिक असते.

नवीन गाळाची खादन मृदा नदीकाठी आढळते.

पिके– गहू, हरभरा, भात, ऊस, तंबाखू इत्यादी पिके या मृदेत घेतली जातात.

मृदेचा प्रदेश उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर झारखंड इत्यादी राज्यात गाळाची मृदा आधी आढळते.

३) वालुकामय मृदा (वाळवंटी)

वाळवंटी प्रदेशात उष्ण व कोरडे हवामान तसेच तापमानातील विषमता यामुळे खडकांचे कायिक अपक्ष होऊन वाळूची निर्मिती होते.

वारा या वाळूला वाहून नेतो. या मृदेत क्षाराचे प्रमाण जास्त असते.

पिके कापूस, ज्वारी, हरभरा, मका, बाजरी ही पिके पाण्याच्या उपलब्धतेनुसार या मातीत घेतली जातात.

मृदेचा प्रदेश पश्चिम व मध्य राजस्थान मध्ये ही मृदा आढळते

४)रेगूर मृदा (काळी मृदा)

रेगुर मृदेत  चिकन मातीचे प्रमाण जास्त असते. ही मृदा ओली असते तेव्हा ती खूप चिकट असते व ती वाळली की तिला मोठमोठ्या भेगा पडतात. टीटानोफेरस  मॅग्नेटाइट या रासायनिक द्रव्यामुळे मृदेला काळा रंग प्राप्त होतो.

या मृदेत कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम पालाश द्रव्याचे प्रमाण अधिक असते. व फॉस्फरस व नत्राचे प्रमाण कमी असते.

पिके कापूस, ज्वारी, विविध कडधान्य, गहू, ऊस इत्यादी. पिके घेतली जातात. रेगुर मृदेत कापसाचे पीक चांगले येते म्हणून या मृदेला कापसाची काळी मृदा असेही म्हणतात.

मृदेचा प्रदेश महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशचा उत्तर भाग, दख्खनच्या पठारावर बेसाल्ट खडकाच्या प्रदेशात ही मृदा आढळते.

देशातील गाळाच्या मध्ये नंतर दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र रेगूर मदेने व्यापलेले आहे.

५)तांबडी मृदा

तांबडी मृदेची निर्मिती अति प्राचीन रूपांतरित खडकापासून झालेली असून जास्त पावसाच्या प्रदेशात तिचा विकास झालेला आहे. यामृदेत लोह संयोगाचे प्रमाण अधिक असल्याने तिला तांबडा रंग प्राप्त झालेला आहे. तांबडी मृदा ही कमी सुपीक असते.

पिके भात, ऊस, कापूस, भुईमूग इत्यादी पिके तांबडी मृदेत घेतली जातात. मृदेचा प्रदेश तामिळनाडू, कर्नाटक, पूर्व आंध्र प्रदेश, ओरिसा व छोटा नागपूरच्या पठार या भागात तांबडी मृदा आढळते.

६)जांभी मृदा

आलटून पालटून सतत ओला व कोरडा ऋतू असणाऱ्या जास्त पावसाच्या उष्ण प्रदेशात जांभी मृदा तयार होते.

या मृदेत पाण्याचा निचरा होताना चुना व सिलिका चे प्रमाण कमी होत जाते लोह व ॲल्युमिनियम संयुगाचे प्रमाण अधिक उरते, म्हणून या मृदेला लाल रंगप्राप्त होतो.

पिके- काजू, रबर, कॉफी इत्यादी.

मृदेचा प्रदेश दक्षिण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, आसाम, ओडिशा या राज्यात जांभी मृदा आढळते.

७) दलदलयुक्त मृदा

या मृदेची निर्मिती सतत पाण्याच्या संपर्कामुळे समुद्रकिनाऱ्याजवळील प्रदेशात होते.

या मृदेत लोहाचे व सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण जास्त असते.

पिके ताग

मृदेचा प्रदेश– पश्चिम बंगालमधील सुंदरबन प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडीसा, तामिळनाडूची किनारपट्टी व उत्तर प्रदेश राज्यात तराईचा प्रदेश.

८)क्षारयुक्त व अल्कलीयुक्त मृदा

ज्या मृदेत क्षाराचे व अल्कलीचे प्रमाण अधिक प्रमाणात असते त्यास क्षारयुक्त व अल्कलीयुक्त मृदा असे म्हणतात.

पाण्याचा निचरा न झाल्यामुळे जमिनी पाणथळ म्हणतात.

हि मृदा त्यातील क्षार व अल्कलीच्या अधिक प्रमाणामुळे नापीक आहे.

पिके ही मृदा पिकासाठी उपलब्ध नसते. पिके घ्यायची असल्यास सेंद्रिय खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो.

मृदेचा प्रदेश पश्चिमराजस्थानचे वाळवंट,पंजाब, हरियाणा व पश्चिम उत्तर प्रदेशात ही मृदा अधिक प्रमाणात आढळते.

Leave a comment