Chintamni Mandir : चिंतामणी मंदिर, थेऊर

थेऊरचे Chintamni Mandir चिंतामणी मंदिर हे श्री गणेशाला समर्पित हिंदू मंदिर आहे. Chintamni Mandir चिंतामणी मंदिर हे अष्टविनायकापैकी एक असून ते मोठे आणि अधिक प्रसिद्ध आहे. थेऊरचा चिंतामणी हे अष्टविनायकापैकी पाचव्या क्रमांकाचे मंदिर आहे. चिंतामणी मंदिर हे पुणे शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे.

थेऊरचे Chintamni Mandir चिंतामणी मंदिर हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात येते. हे मंदिर भीमा, मुळा आणि मुठा या तीन प्रमुख नद्यांच्या संगमावर थेऊर हे एक महत्त्वाचे पौराणिक ठिकाण आहे.

या मंदिराच्या संदर्भात काही कथा आहेत. त्यापैकी एक कथा अशी आहे की, ब्रह्मदेवाचे मन स्थिर राहत नव्हते. तर मन स्थिर करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी श्री गणेशाची आराधना केली म्हणून, या ठिकाणाला थेऊर असे नाव पडले.

चिंतामणी गणपती मंदिरात ध्यानासाठी खास विभाग आहेत. मंदिराचा समृद्ध इतिहास प्रभावी वास्तुकला आणि धार्मिक महत्त्व यासाठी हे मंदिर ओळखले जाते. चिंतामणी गणपती मंदिराचे महत्त्व असे आहे की, चिंतामणी हा मनाला शांत देणारा देव आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी असे म्हणतात.

चिंतामणी मंदिर हे प्राचीन हिंदू मंदिर स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण आहे. मंदिर पूर्ण लाकडी आहे. श्री गणेशाचे हे मंदिर कंदम वृक्षाखाली आहे. मुख्य मंडप लाकडाचा असून त्याच्या मध्यभागी दगडी कारंजे आहेत. या मंदिराला एक सुंदर लाकडी दरवाजा आहे. ज्यामध्ये भगवान गणेश आणि इतर देवतांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. मंदिरात एक प्रशस्त सभा मंडप आणि गर्भ ग्रह आहे जिथे गणपतीची मूर्ती ठेवली जाते. मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे. गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख व डाव्या सोंडेची आहे. श्री गणेशाच्या दोन्ही डोळ्यात हिरे आणि लाल मणी आहेत. महाद्वार किंवा मंदिराचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असून, एक रस्ता त्याला मुळा नदीला जोडतो. हे मंदिर पेशव्यांच्या राजवटीत 18 व्या शतकात बांधले गेले होते. मंदिरात एक लाकडी सभामंडप आहे. जो माधवरावांनी बांधला होता. मंदिरात अनेक छोटी मोठी पवित्र तीर्थे आहेत. मंदिराच्या मागे पेशवे वाडा आहे. त्याला पेशवे पॅलेस असेही म्हणतात.

मंदिर परिसरात महादेवाच्या मंदिरासारखी असंख्य छोटी मंदिरे आहेत. तसेच येथे विष्णू, लक्ष्मी मंदिर आणि हनुमान मंदिर देखील आहे. मंदिर परिक्रमा करताना ही मंदिरे देखील पाहता येतात. भगवान चिंतामणी हे श्री माधवराव पेशवे यांचे कुलदैवत आहे. श्री माधवरावांनी आपले शेवटचे दिवस मंदिरात घालवले आणि प्रभूंचे नामस्मरण करत अखेरचा श्वास घेतला.

पुढे वाचा –

Rivers in Maharashtra:महाराष्ट्रातील नद्याhttps://mpsc.pro/rivers-in-maharashtra/
Types of Soil in Maharashtra:महाराष्ट्रातील मृदाhttps://mpsc.pro/types-of-soil-in-maharashtra/

चिंतामणी मंदिरात गणेश चतुर्थी सारखे सण मोठ्या उत्साहाने साजरा केले जातात. उत्सवाच्या दरम्यान मंदिराला फुले, दिव्याने, तर सजावटीने सुशोभित केले जाते. या उत्सवा दरम्यान महाराष्ट्र आणि भारतातील इतर भागातील लोक भगवान गणेशाची पूजा करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी येथे येतात. चिंतामणी मंदिर वर्षभर पर्यटकांसाठी खुले असते.

Leave a comment