Vighnhar Mandir विघ्नहर हे गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओझर येथे आहे. हे मंदिर अष्टविनायकापैकी एक मंदिर असून हे मंदिर अष्टविनायकातील सातवा गणपती म्हणून ओळखले जाते. या गणपतीला विघ्नेश्वर म्हणून ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा.
प्रसन्न व मंगलमूर्ती असलेला श्री गणेश भक्तांवर आलेल्या विघ्नांचे हरण करतो म्हणून याला विघ्नहर असे म्हणतात. ओझर मधील श्री Vighnhar Mandir विघ्नहर हा अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे. ओझर येथील हे गणपती मंदिर कुकडी नदीच्या काठावर आहे. जे या तीर्थक्षेत्राच्या अध्यात्मिक वातावरणाला अधिक पावन बनवते.
Vighnhar Mandir विघ्नहर मंदिराच्या पुढे वीस फूट लांब सभागृह आहे. मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे. विघ्नेश्वर मंदिराच्या प्रमुख प्रवेश प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत. आणि पहिल्या आणि चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे. तसेच हे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्व दिशेला आहे. विघ्नेश्वर गणेशाची मूर्ती स्वयंभू आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर व नाभीवर हिरे आहेत. तसेच गणपतीची सोंड डावीकडे वळलेली आहे. नेहमीप्रमाणे गणपतीच्या आजूबाजूला रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. गणपतीच्या मूर्तीच्या वर शेषनाग आणि वास्तुपुरुष यांच्या प्रतिमा आहेत. मंदिराचे शिखर आणि कळस सोनेरी आहेत. मंदिराच्या आतील परिसर मोठा असून स्वच्छ आणि सुंदर आहे. मंदिराच्या अंगणात दोन सुंदर दीपमाळा आहेत. मंदिराच्या चारही बाजूंनी दगडी भिंतीची तटबंदी आहे. मंदिरात लहान आकाराच्या खोल्या आहेत. यांना ओव्या असे म्हणतात. या ओव्यामध्ये बसून भक्त ध्यान करू शकतात.
पौराणिक कथेनुसार अभिनंदन राजाने इंद्रपद मिळवण्यासाठी यज्ञ सुरू केला. आपले इंद्रपद जाईल या भीतीने इंद्रदेवाने विघ्नासुर नावाच्या दानवाची उत्पत्ती करून त्याला यज्ञात विघ्न आणण्यास पाठवले. विघ्नासुराने यज्ञ स्थळी जाऊन यज्ञामध्ये विघ्न आणले आणि सृष्टीमध्ये खूप विध्वंस निर्माण केला. त्याने सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. त्यामुळे पृथ्वीतलावरील ऋषीमुनी आणि लोक ब्रह्मदेव व शंकर यांच्याकडे जाऊन विघ्नस्वराने केलेला विध्वंस सांगितला. दोन्ही देवांनी ऋषीमुनींना गणपतीला शरण जाण्यास सांगितले. सर्वांनी गणपतीची आराधना करून त्यांना प्रसन्न केले. नंतर पराशर ऋषींचा पुत्र म्हणून गणपतीने जन्म घेतला व विघ्नासुराचा पराभव केला. विघ्नसुर गणरायाला शरण गेला आणि त्याने गणपतीला विनंती करून तुमच्या नावा आधी माझे नाव भक्तांनी घ्यावे तसेच, तुम्ही या स्थळी कायम वास्तव्य करावे अशी विनंती केली. गणपतीने ही विनंती मान्य करून त्या ठिकाणी वास्तव्य करू लागला. त्यामुळे सर्वजण आनंदीत झाले आणि त्यांनी इथे विघ्नेश्वराची स्थापना केली व म्हणून या गणपतीला विघ्नहर या नावाने ओळखतात.
पुढे वाचा –
Bharatatil khanij sampatti : भारतातील खणिज संपत्ती | https://mpsc.pro/bharatatil-khanij-sampatti/ |
Forest Wealth in India : भारतातील वनसंपत्ती | https://mpsc.pro/forest-wealth-in-india/ |
विघ्नेश्वर मंदिरामध्ये भाद्रपद महिन्यात गणेश जयंतीला चार दिवस उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. गणेशोत्सव आणि संकट चतुर्थीला भक्तांची येथे दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी असते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी केलेली सजावट आणि दीपमाळांची रोषणाई नेत्रदीपक असते. उत्सवाच्या दरम्यान हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.