Yogeshwari Devi योगेश्वरी देवीचे हे मंदिर महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगराजवळ जयवंती नदीच्या काठावर अंबाजोगाई या गावात आहे. Yogeshwari Devi योगेश्वरी ही सर्वांचीच देवता असली तरी विशेषतः कोकणातील लोकांची ती कुलस्वामिनी आहे व अंबाजोगाई वासीयांचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे.

हे क्षेत्र देवीचे मूळ स्थान म्हणून ओळखले जाते. योगेश्वरी देवीचा अवतार स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. श्री योगेश्वरी देवी कुमारीका असून दंतासुर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी मार्गशीष पौर्णिमेला देवीने अवतार घेतला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देवीच्या दर्शनासाठी यात्रेकरू येतात.

महाराष्ट्रात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, सप्तशृंगी ही देवीची मुख्य पिठे आणि अनेक उपपिठे असली तरी, आंबाच्या नावाने प्रसिद्ध असलेली अंबाजोगाई हे एकच शक्तीपीठ अस्तित्वात आहे. अंबाजोगाई शहराला आंबेचे शक्तीपीठ असण्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. इतर शक्ती पिठाच्या ठिकाणी असलेल्या कोणत्याही देवीच्या हातात तिच्या भक्तांनी स्वीकार केलेले आयुध पात्र दिसून येत नाही. योगेश्वरी देवीचे हे एक वैशिष्ट्ये उल्लेख करण्यासारखे आहे. योगेश्वरी देवीने आपल्या हातात जी निरनिराळी आयुधे धारण केली आहेत. त्यात तिने एका हातात पत्र (परडी) धारण केल्याचा उल्लेख आहे.

अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे भव्य मंदिर पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. या मंदिराची रचना ही हेमांडपंथी स्थापत्यशैलीची असून मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या चारही दिशेला महाद्वार आहेत. मंदिराचे बांधकाम व त्यावरील शिल्पाकृती पाहून मन थक्क होते. दगडी खांब व खांबावरील वर्तुळांवरील बारीक नक्षीकाम अतिशय रेखीव आहे. उत्तर महाद्वाराच्या बाहेर सर्वेश्वर तीर्थ आहे. मंदिराच्या परिसरात काही सत्पुरुषांच्या समाध्या आहेत. पश्चिम दरवाजाला लागून अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. नवरात्रात येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. मार्गशीर्ष महिन्यातही येथे उत्सव असतो.

सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी योगेश्वरी देवीची स्थापना झाली असावी. पार्वतीच्या शक्ती अंशाने उत्पन्न झाल्यावर जगताला प्रकाश भूत होणाऱ्या आणि ब्रह्मा, विष्णू, महेश आणि देवता यांच्यामध्ये अंतर्भूत असलेल्या लहान मोठ्या पंचभौतिक परमाणु युक्त चैतन्य शक्तीला योगिनी असे म्हणतात. योगिनी मध्ये प्रमुख किंवा  योगिनींच्यावर अधिपत्य करणारी देवता ती योगेश्वरी होय. याप्रमाणे योग साधनेला प्राधान्य देणारी देवी म्हणून योगेश्वरी देवीचे योगेश्वरी नाव प्रचारात आले असावे.

शैक्षणिक व आध्यात्मिक वारसा लाभलेल्या संतांची भूमी म्हणून अंबाजोगाई हे शहर ओळखले जाते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *