Akola Jilha : अकोला जिल्हा

Akola Jilha अकोला जिल्हा हा विदर्भातील अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्हा आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 धुळे-कोलकत्ता Akola Jilha अकोला जिल्ह्यातून जातो.

क्षेत्रफळ 5428 चौकिमी

मुख्यालय – अकोला

महानगरपालिका – अकोला (2001)

स्थान व विस्तार – पूर्वेस व उत्तरेस अमरावती जिल्हा, पश्चिमेस बुलढाणा जिल्हा, दक्षिणेस वाशिम जिल्हा.

तालुके(7) – अकोला, बाळापुर, मुर्तीजापुर, पातुर, अकोट, बार्शी-टाकळी, तेल्हारा.

नद्या – पूर्णा ही मुख्य नदी व तिच्या उपनद्या मन, मोरणा, काटेपूर्णा, म्हैस.

संगमस्थळ – सांगवी (पूर्णा-उमा), बाळापुर (मन-म्हैस)

नदीकाठावरील ठिकाण – अकोला (मोरणा), बाळापुर (मन, म्हैस).

धरणे – वान प्रकल्प.

अभयारण्य – नर्नाळा (ता. अकोट).

जलविद्युत केंद्र – वान (ता. तेल्हारा)

औष्णिक वीज केंद्र – पारस (ता.बाळापूर)

तलाव – पोपटखेड, कुंभारी, दगडपारवा, कापसी, पांदुर्णा, पांगरताटी.

डोंगररांगा – अजिंठा, गाविलगड

लेणी – बार्शीटाकळी, पातुर

वने – पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्यात पानझडी व काटेरी वने आढळतात.

पिके – जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामातील पिके घेतली जातात. खरीप ज्वारी, कापूस, तूर, मुग, गहू, हरभरा.

मृदा – जिल्ह्यात काळी व रेगूर मृदा आढळते.

  • तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील आंबे प्रसिद्ध आहेत.
  • आकोट येथे विड्याची पाने प्रसिद्ध आहेत.
  • मोर्णा नदीच्या तीरावर अकोला शहर वसलेले आहे.
  • खरीप ज्वारीच्या उत्पादनात अकोला राज्यात आघाडीवर आहे.
  • मूर्तीजापूर, अकोट परिसरात संत्र्याचे उत्पादन  घेतले जाते.
  • कापसाच्या अधिक उत्पादनामुळे अकोला जिल्ह्यात जिनिंग व प्रेसिंग उद्योग, हातमाग, खादी वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात चालतो.
  • बाळापुर, अकोट येथे सतरंज्या निर्मितीचा व्यवसाय केंद्रित झाला आहे.
  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आहे.
  • अकोला येथे असदगड किल्ला व तेथील आझाद पार्क बगीचा आहे.
  • नर्नाळा येथे  27 दरवाजांचा ऐतिहासिक किल्ला आहे.
  • बाळापुर  येथे बाळापुर देवीचे मंदिर. किल्ला, राजा मिर्झा जयसिंगाची छत्री, मन-म्हैस नद्यांचा संगम  आहे.
  • लाखपुरी (ता.मुर्तीजापुर) येथील “लक्षेश्वर” तीर्थक्षेत्री कावड यात्रा प्रसिद्ध आहे.
  • पातुर येथे वाकाटककालीन लेण्या आहेत व पातुर येथे बौद्ध लेणी आहेत.
  • मुर्तीजापुर हे मुंबई कोलकत्ता रेल्वे महामार्ग रेल्वे मार्गावरील जंक्शन आहे.
  • संत गाडगेबाबांचा आश्रम मुर्तीजापुर येथे आहे.
  • सांगवी येथे पूर्ण-उमा नद्यांचा संगम आहे.
  • 1 जुलै 1998 रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला.
  • अकोला जिल्हा खरीप ज्वारीची कोठार आहे.
  • अकोला येथे राजराजेश्वर मंदिर, जैन मंदिर, राणी सतीमाता मंदिर आहे.
  • अकोट येथे नरसिंह महाराज क्षेत्र आहे.
  • बार्शी टाकळी येथे हेमांडपंथी मंदिर आहे.
  • मूर्तिजापूर येथे संत गाडगे महाराजांचा आश्रम व प्रसिद्ध दत्त मंदिर आहे.
  • महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मुख्यालय अकोला येथे आहे.
  • पशुधन विकास महामंडळ अकोला येथे आहे.
  • रंगीत कापसावर संशोधन करणारे विद्यापीठ हे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे.
  • अकोट तालुक्यात नर्नाळा हे थंड हवेचे ठिकाण आहे.
  • पातुर हे साग व चंदनाच्या लाकडासाठी प्रसिद्ध आहे.
  • रजपूत राजा अकोलसिंह यांनी अकोला हे शहर वसवले आहे.
  • अकोला येथे शंकरपट हि धावणाऱ्या बैलांची जात आढळते.
  • मुर्तीजापुर तालुक्यातील मुरुंब हे शास्त्रज्ञ विजय भटकर यांचे गाव आहे.

Leave a comment