Ashtvinayak  Mandir : अष्टविनायक गणपती मंदिर

Ashtvinayak  Mandir अष्टविनायक म्हणजेच महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची मंदिरे आहेत ही आठही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी आहेत. या आठ गणपतीच्या तीर्थक्षेत्राचे दर्शन करणे म्हणजे अष्टविनायक यात्रा होय. Ashtvinayak  Mandir अष्टविनायकाची यात्रा खालील पद्धतीने केली जाते.

1. श्री मोरेश्वर मंदिर, मोरगाव

2. श्री सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक

3. श्री बल्लाळेश्वर मंदिर, पाली

4. श्री वरदविनायक मंदिर, महड

5. श्री चिंतामणी मंदिर, थेऊर

6. श्री गिरिजात्मक मंदिर, लेण्याद्री

7. श्री विघ्नेश्वर मंदिर, ओझर

8. श्री महागणपती मंदिर, रांजणगाव

गणपती हे महाराष्ट्राचे प्रिय आराध्य दैवत आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते. कारण विद्येचे दैवत असलेला हा गणपती सर्व विघ्नांना दूर करून समृद्धी प्रदान करतो. अष्टविनायक म्हणजे स्वयंभू गणपतीची आठ मंदिरे होय. आजच्या धावपळीच्या आयुष्यात या आठ गणपतीच्या मंदिरांना भेट दिल्याने मनाला शांती लाभते व प्रसन्न वाटते.

गणपती हा विद्येची देवता असून तो सुखकर्ता, दुखहर्ता आणि रक्षण करत आहे, अशी गणेश भक्तांची भावना आहे. अष्टविनायक हा शब्द अष्ट आणि विनायक या दोन शब्दांना जोडून तयार झालेला आहे. अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे गणपती होय.

हे पण वाचा –

महाराष्ट्रातील वने व त्यांचे उपयोगhttps://mpsc.pro/forests-in-maharashtra/
महाराष्ट्र राष्ट्रीय उद्यानेhttps://mpsc.pro/maharashtra-national-park/
महाराष्ट्रातील अभयारण्य:wild sanctuary in maharashtrahttps://mpsc.pro/wild-sanctuary-in-maharashtra/
महाराष्ट्र-खनिजसंपत्तीhttps://mpsc.pro/mineral-resources-in-maharashtra/
Industries in Maharashtra:महाराष्ट्र उद्योगधंदेhttps://mpsc.pro/industries-in-maharashtra/

अष्टविनायकातील प्रत्येक मंदिरांचा स्वतःचा असा एक स्वतंत्र इतिहास आणि त्यांच्यासोबत जोडलेली स्वतःची आख्यायिका आहे. या मंदिरातील गणपतीच्या मुर्त्या अतिशय विलक्षण आहेत. प्रत्येक मंदिरातील गणेश मूर्तीचे रूप आणि गणपतीच्या सोंडेची ठेवण ही एकमेकांपासून भिन्न आहे. असे म्हटले जाते, की ही यात्रा पूर्णत्वास नेण्याकरता सर्व आठ गणपतीचे दर्शन घेतल्यावर पुन्हा पहिल्या गणपतीचे दर्शन घ्यावे. या प्रत्येक आठही देवळातील प्रत्येक गणपती हा स्वयंभू असून अतिशय जागृत आहे असे मानले जाते. या विविध मंदिरामध्ये मोरेश्वर, महागणपती, चिंतामणी, गिरिजात्मक, विघ्नेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर आणि वरदविनायक अशी गणपतीची वेगवेगळी नावे आहेत. या आठ मंदिरांपैकी सहा मंदिरे ही पुणे जिल्ह्यात आणि दोन मंदिरे रायगड जिल्ह्यात आहेत.

Leave a comment