Bara Jyotirling भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत. हिंदू धर्मातील पुराणात सांगण्यात आल्यानुसार भगवान शिव जिथे जिथे स्वतः प्रकट झाले त्या स्थानावर ही ज्योतिर्लिंगे स्थापन करण्यात आली.
आता या बारा ज्योतिर्लिंगाना तीर्थस्थान मानले जाते. हि ज्योतिर्लिंग सर्वात पवित्र मानली जातात आणि दरवर्षी हजारो भक्त या ज्योतिर्लिंग भेट देतात.
- सोमनाथ ज्योतिर्लिंग (गुजरात)
- मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग (आंध्र प्रदेश)
- महाकालेश्वर ज्योतिर्लिंग (मध्य प्रदेश)
- ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग (मध्य प्रदेश)
- केदारनाथ ज्योतिर्लिंग (उत्तराखंड)
- भीमाशंकर ज्योतिर्लिंग (महाराष्ट्र)
- काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग (उत्तर प्रदेश)
- त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग (महाराष्ट्र)
- वैद्यनाथ ज्योतिर्लिंग (महाराष्ट्र)
- औंढा नागनाथ (महाराष्ट्र)
- रामेश्वरम तीर्थ(उत्तर प्रदेश)
- घृष्णेश्वर (महाराष्ट्र)
सोमनाथ ज्योतिर्लिंग (गुजरात)
हे देशातील पहिले ज्योतिर्लिंग सौराष्ट्र गुजरात येथे आहे. श्री शंकराचे हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून सोमनाथ यांच्या अग्रस्थानी आहे.
अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ज्योतिर्लिंगाचे नाव सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे. अथांग अरबी समुद्राच्या पार्श्वभूमीवर हे सोमनाथाचे मंदिर अत्यंत आकर्षक दिसते. या ठिकाणी साधारणता 8-9 वाजता संध्याकाळी अप्रतिम लाइटिंग शो करण्यात येतो.
या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात. या मंदिराच्या जवळच त्रिवेणी घाट असून हिरण्या, कपिला आणि सरस्वती या तीनही नद्यांचा संगम या मंदिराजवळ होतो. त्याशिवाय सोमनाथ जवळ पाच पांडवाचे वास्तव्य होते असाही इतिहास आहे.
प्राचीन हिंदू ग्रंथानुसार सोम अर्थात चंद्राने दक्ष राजांच्या 27 कन्यासहविवाह केला पण रोहिणीवरील त्याच्या अधिक प्रेमामुळे इतरांवर अन्याय होत असल्याचे पाहून दक्ष राजाने त्याला शाप दिला. चंद्राने शिव शंकराची भक्ती करून या शापाचे निराकरण करून घेतले आणि म्हणूनच या मंदिराचे नाव सोमनाथ असे पडले अशी आख्यायिका आहे.
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग (आंध्र प्रदेश)
मल्लिकार्जुन दुसरे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या काठी श्रीशैलम पर्वतावर आहे.
आंध्र प्रदेशात असलेल्या ज्योतिर्लिंगाचे नाव मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग असे आहे.
दक्षिणेचा कैलास या नावाने हे स्थळ ओळखण्यात येते. माता पार्वती अर्थात मलिका आणि भगवान शिव अर्थात अर्जुन म्हणून या मंदिराला मलिकार्जुन नाव देण्यात आले आहे.
शिवपार्वती चा पुत्र गणेश हे आपला मोठा भाऊ कार्तिकेयाच्या आधी लग्न करू इच्छित होते, मात्र त्यानंतर शिवपार्वतीने एक युक्ती सुचवली की, जो पृथ्वीप्रदक्षिणा पहिले करून येईल त्याचे लग्न प्रथम करून देण्यात येईल. यानंतर कार्तिकीय आपले वाहन मोरावरून पृथ्वीला प्रदक्षिणा घालू लागला. मात्र गणपती बाप्पा ने माता पार्वती आणि भगवान शिव यांना प्रदक्षिणा घालत तेच आपल्यासाठी पृथ्वी असल्याचे सांगितले. ही हार कार्तिकेला सहन झाली नाही आणि त्यानंतर तो पळून गेला त्याला समजावण्यासाठी पार्वती केली असता तिथून कार्तिकेय निघून गेले. पार्वती हाताश झाली आणि तिथेच शिवशंकर ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले तेच स्थान म्हणजे श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर होय.
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग (मध्य प्रदेश)
महाकालेश्वर हे तिसऱ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन मध्य प्रदेश येथे आहे. या ज्योतिर्लिंग जवळ क्षिप्रा नदी वाहते.
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. येथे दररोज भस्म आरती होते. ही आरती जगभर प्रसिद्ध आहे.
रुद्रसागर सरोवराच्या किनारी असणारे हे मंदिर अप्रतिम असून भगवान शिव स्वतः लिंगामध्ये स्वयंभू रूपात स्थापित आहेत असा समज आहे. पार्वती, कार्तिके आणि गणेश यांच्या ही प्रतिमा येथे आहेत.
शिवपुराणानुसार एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यामध्ये चर्चा सुरू असताना, शिवाच्या मनात विष्णू आणि ब्रह्मदेवाची परीक्षा घ्यावी असे आले. त्यांनी दोघांनाही प्रकाशाचा अंत कुठे आहे हे शोधण्यास सांगितले. त्यासाठी शिव शंकराने एक मोठा स्तंभ उभारला. दोघांनीही शोध घेतला पण अखेर थकून विष्णूने हार मानली, तर ब्रह्मा ने टोक सापडले असे खोटे सांगितले. या खोटेपणामुळे शिवशंकराने ब्रह्मदेवाला कोणीही कधीच तुम्हाला पूजणार नाही असा शाप दिला. तेव्हा ब्रह्मदेवांनी माफी मागितली आणि शिवाची विनवणी करत त्याच स्तंभात विराजमान व्हायला सांगितले. हाच स्तंभ म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. स्तंभाचे रूपांतर लिंगात झाल्यापासून त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग (मध्य प्रदेश)
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे चौथ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे. मध्य प्रदेश राज्यात दोन ज्योतिर्लिंगे आहेत. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग व ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे माळवा प्रदेशात नर्मदा नदीच्या काठावर डोंगरावर वसलेले आहे.
भाविकांनी इतर तीर्थक्षेत्रातून पाणी आणून ओंकारेश्वर बाबांना अर्पण केल्यास त्यांची सर्व तीर्थ पूर्ण होतात असा समाज आहे.
उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगापासून केवळ 2 ते 3 तासाच्या अंतरावर ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे.
ओंकारेश्वर ला जाताना अनेक लोकांचा भ्रम असतो. की केवळ मंदिराची परिक्रमा करावी लागते. पण तसे नाही संपूर्ण ओंकार पर्वत हा परिक्रमेचा मार्ग आहे आणि ही परिक्रमा तब्बल 7 कि.मी. इतकी आहे.
राजा माधांताने नर्मदा नदीच्या किनारी असणाऱ्या या पर्वतावर घोर तपस्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले आणि भगवान शिवाने इथे राहावे असावा वर मागितला. त्यामुळे या ठिकाणाला ओंकार मधांता असेही नाव प्राप्त झाले.
या मंदिरात शिवभक्त कुबेर ने तपस्या करून शिवलिंगाची स्थापना केली आणि कुबेराच्या स्नानासाठी शिवशंकराने आपल्या जटेतून कावेरी नदी उत्पन्न केली अशी आख्यायिका आहे. यामुळे कुबेर मंदिराच्या बाजूने ही कावेरी नदी वाहते आणि नर्मदा नदीला जाऊन मिळते असे सांगण्यात येते. इथे नर्मदा आणि कावेरी नदीचा संगम पाहायला मिळतो.
ओंकारेश्वर मंदिराचा सर्व भाग ओंकाराच्या आकाराचा असल्याने आज ओंकारेश्वर असे म्हटले जाते
केदारनाथ ज्योतिर्लिंग (उत्तराखंड)
केदारनाथ हे पाचव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे. सर्वात सुंदर आणि अप्रतिम असे ज्योतिर्लिंगाची स्थळ म्हणजे केदारनाथ असे म्हटले जाते.
अत्यंत सुंदर निसर्ग आणि तितकेच सुंदर आणि मनाला शांती देणारे हे मंदिर आहे. केदारनाथ मंदिर उत्तराखंड राज्याच्या रुद्रप्रयाग या जिल्ह्यांमध्ये असून हिमालय पर्वताच्या गडवाल रांगांमध्ये असणाऱ्या मंदाकिनी नदीच्या किनारी बर्फाच्छादित पर्वत शिखरांमध्ये वसलेले आहे.
त्यामुळे इथे गेल्यानंतर अत्यंत प्रसन्न वातावरण पाहायला मिळते.
केदारनाथ ची यात्रा म्हणजे चारधाम ची यात्रा असे आपण नेहमी ऐकतो हे मंदिर चार धामा पैकी एक असून समुद्रसपाटीपासून 3,583 मीटर उंचीवर आहे.
भारतातील सर्वात पवित्र आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मंदिर म्हणून केदारनाथ मंदिराला ओळखण्यात येते.
हे मंदिर अत्यंत दुर्गम ठिकाणी असून भाविक येथे दर्शनाला येतात. केदारनाथ म्हणजेच भगवान शंकर.
कुरुक्षेत्र येथे जेव्हा गौरव आणि पांडव यांच्यामध्ये महायुद्ध झाले आणि त्यात पांडवांचा विजय झाला. त्यावेळी आपल्या भावांचा पराभव केला म्हणून पांडव स्वतःला दोषी मानत होते. या पापातून मुक्त होण्यासाठी भगवान शंकराची तपस्या करणे आवश्यक आहे असे म्हणून सर्व पांडव पहिल्यांदा काशीला गेले, त्यानंतर हिमालय पर्वतावर जाऊन तपश्चर्या केली. भगवान शंकर पांडवांना या पापातून सहजासहजी मुक्त करणार नव्हते. म्हणून त्यांनी एका म्हशीचे रुप घेतले आणि गुप्त काशी येथे पोहोचले. इतर म्हशीपेक्षा वेगळी दिसणारी म्हैस म्हणून भिमाने या म्हशीची शेपटी पकडली. पण भिमाच्या शक्तीमुळे या म्हशीच्या शरीराचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणी पडले. तिच्या पाठीकडचा भाग केदारनाथ येथे पडला आणि केदारनाथ मंदिराचा जन्म झाला असे सांगण्यात येते.
तसेच शरीराचे इतर भाग भद्रा, रुद्रनाथ, कपलेश्वर, महेश्वर या ठिकाणी पडले. या पाचही ठिकाणावर शिवाचा वास असून पंचकेदार या नावाने ही ठिकाणे ओळखली जातात.
या घटनेनंतर भगवान शिवानी पांडवांना पापातून मुक्त केले आणि ज्योतिर्लिंगाच्या रूपाने केदारनाथ धाम येथे निवास करण्याचा निश्चय केला अशी अख्यायिका आहे.
भीमाशंकर ज्योतिर्लिंग (महाराष्ट्र)
भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग सहाव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे.
हे पर्यटन स्थळ म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. सह्याद्री पर्वतात भीमाशंकर ज्योतिर्लिंग स्थित आहे.
पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात भीमाशंकर हे मंदिर असून या ज्योतिर्लिंगामधून महाराष्ट्रातील मुख्य नदीपैकी एक भीमा नदी उगम पावते.
सह्याद्रीच्या प्रमुख रांगेतील हे ठिकाण घनदाट अरण्याने वेढले असून १९८४ मध्ये याची अभयारण्य म्हणून घोषणा करण्यात आली आहे. भीमाशंकर अत्यंत सुंदर ठिकाण असून भीमा नदीचा उगम पाहणे हा अविस्मरणीय आनंद आहे.
पूर्वी कुंभकर्णाच्या पत्नीने कुंभकर्णाचा वध झाल्यानंतर मुलगा भीमाला देव देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. मोठा झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजल्यानंतर देवांचा बदला घ्यायचा असे भिमाने ठरवले आणि ब्रह्मदेवाची कठोर तपस्या केली. त्यांच्याकडून त्यांना त्याने सर्वात बलशाली होण्याचे वरदान घेतले. एकदा असेच जात असताना राजा कामरूपेश्वराला महादेवाची भक्ती करताना पाहून आपली भक्ती करण्यास भीमाने सांगितले. मात्र राजाने नकार दिल्यावर त्याने त्याला बंदिस्त केले. कारागृहात राजाने शिवलिंग तयार करून पूजा करायला सुरुवात केली. भिमाने रागाने हि पूजा तलवारीने तोडण्याचा प्रयत्न केला असता त्यातून महादेव प्रकार झाले. त्यानंतर शिव आणि भीमा मध्ये युद्ध झाले त्यात भिमाचा मृत्यू झाला. त्यानंतर महादेवांना तिथेच वास्तव्य करण्याचे राजांनी विनंती केली. भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाला भीमाशंकर असे नाव पडले.
काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग (उत्तर प्रदेश)
काशी विश्वनाथ हे ज्योतिर्लिंग सातव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी शहरात विश्वनाथ ज्योतिर्लिंग आहे. वाराणसी म्हणजे भारताची धार्मिक राजधानी आहे. विश्वनाथ ज्योतिर्लिंग याला काशी विश्वनाथ या नावाने सुद्धा ओळखले जाते.
कैलासावर भस्म फासून राहणाऱ्या भगवान शंकराची सगळीच टिंगल करत होते. त्यामुळे पार्वतीने मला कोणीही चिडवणार नाही अशा ठिकाणी घेऊन चला अशी विनंती शंकराला केली. त्यामुळे वाराणसीच्या ठिकाणी येऊन शंकर राहू लागले अशी आख्यायिका सांगितली जाते. वाराणसी या शहरात भरपूर मंदिरे आहेत. वाराणसीला मंदिरांचे शहर असे देखील म्हटले जाते. प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचे आहे.
त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग (महाराष्ट्र)
त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे आठव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. ब्रह्मगिरी नावाच्या एका पर्वतावर भगवान शिव त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या नावाने स्थित आहेत. त्र्यंबकेश्वर हे गोदावरी नदीचे उगम उगमस्थान आहे.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग म्हणजे हे तीन छोटे लिंग आहेत. ज्यांना ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे प्रतीक म्हणून जाणले जाते. हे ज्योतिर्लिंग गौतमी नदीच्या तटावर वसलेले आहे.
प्राचीन काळी त्रंबक ऋषींची ही तपोभूमी होती. गहत्या पापातून मुक्ती मिळण्यासाठी गौतम ऋषींनी येथे कठोर तपस्या करून शिव शंकराकडून गंगा नाशिकला आणण्याचे वरदान मागितले. यावरदानामुळे गंगा अर्थात गोदावरीचा येथे उगम होतो असे सांगण्यात येते. गोदावरीच्या उगमासह आपल्या वास्तव्यासाठी ही होकार दिला. त्र्यंबक ऋषींमुळे या मंदिराला त्रंबकेश्वर असे नाव पडले.
वैद्यनाथ ज्योतिर्लिंग (महाराष्ट्र)
वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे नवव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे. वैद्यनाथ म्हणजेच परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे हे स्थान बीड जिल्ह्यातील परळी येथे आहे. परळी येथील हे मंदिर जागृत देवस्थानापैकी एक असल्याचे मानण्यात येते.
या मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंड आहेत. सांगितल्यानुसार या मंदिराच्या स्थापना रावणाद्वारे झाली होती. एकदा रावन भगवान शिव यांचे ज्योतिर्लिंग घेऊन या मार्गाने जात होता त्यावेळी वाटेमध्ये या ठिकाणी त्याला लघुशंका आली यासाठी त्याने शिवलिंग एका गवळीच्या हातात दिले शिवलिंगाचे वजन सामान्य गवळी पेलू शकला नाही म्हणून त्याने ते शिवलिंग जमिनीवर ठेवले. याप्रमाणे भगवान शिव तेथे स्थापित झाले. असे म्हटले जाते की बैजू नावाची एका गवळीची गाय रोज चरायला आली की भगवान शिव यांना आपले दूध समर्पित करायची म्हणून त्या गवळीच्या नावाने या ज्योतिर्लिंगाचे नाव बैजूनाथ धाम असे पडले.
औंढा नागनाथ (महाराष्ट्र)
औंढा नागनाथ हे दहाव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे.
नागनाथ महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यांमध्ये असणारे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे. औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणाला नागेश्वर असे देखील म्हटले जाते.
नागेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग-हिंगोली जिल्ह्यांमध्ये गुजरातच्या द्वारका धामहून 18 किलोमीटर अंतरावर आहे.
प्राचीन काळात दारूका नावाची एक राक्षस होती. तिने पार्वतीला तप करून प्रसन्न केले व पार्वतीने तिला एक वन दिले. हे वन फार चमत्कारिक होते दारूका जिकडे जाईल तिकडे ते तिच्या मागे जात असे. या वनात दारूका आपला पती दारू सोबत राहत होती. दारूका आणि दारू या दोघांना आपल्या शक्तीचा खूप गर्व होता. हे दोघे सर्व लोकांना अमानुषपणे छळत असे. अनेक ब्राह्मणांना यांनी ठार मारले. काहींना बंदी ठेवले. बंदी केलेल्या ब्राह्मणामधील एक ब्राह्मण शिवभक्त होता. तो शंकराची उपासना करू लागला. जेव्हा ही गोष्ट दारूक राक्षसाला समजली. तेव्हा त्याने ब्राह्मण शिवभक्ताला ठार मारण्याची धमकी दिली. काही काळानंतर ब्राह्मण शिवभक्ताने पुन्हा शिवशंकराची उपासना सुरू केली. दारूकला हे समजताच तो धावत आला त्याने पूजा मोडून टाकली व तो ब्राह्मणांना ठार मारू लागला. त्या क्षणी महादेव आपल्या भक्तांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी दारू व दारुका या राक्षसांचा वध केला. नंतर महादेव ब्राह्मणांना म्हणाले की मी इथेच नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने कायमचे वास्तव्य करेल. तेच ठिकाण आज नागनाथ किंवा नागेश्वर ज्योतिर्लिंग या नावाने प्रसिद्ध आहे. मंदिराच्या भोवतीचे आरण्य आहे त्याला दारूका वन असे म्हणतात.
रामेश्वरम तीर्थ(उत्तर प्रदेश)
चार धामा पैकी एक असणारे रामेश्वर म्हणजे अप्रतिम आणि सौंदर्याची खान असणारे स्थळ आहे. उत्तर प्रदेशात काशीला जी मान्यता आहे तीच मान्यता दक्षिणेतील रामेश्वरमला आहे.
हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरामध्ये घडलेले सुंदर शंकाच्या आकाराचे हे मंदिर सर्वांचेच लक्ष वेधते. स्वतः रामाने शिवलिंगाची या ठिकाणी स्थापना केली आहे असे सांगण्यात येते. श्रीलंकेवर हल्ला करण्यापूर्वी रामाने या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करून पूजा केली असा समाज आहे.
रामायणातील सर्वात प्रसिद्ध युद्ध झाल्यानंतर रावणाचा वध करून पुन्हा एकदा आपल्या पापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी राम याच ठिकाणी परत आले. या ठिकाणाला समाज मान्यता मिळावी म्हणून रामाने हनुमानाला काशीवरून शिवलिंग आणण्यासाठी सांगितले होते व त्यानंतर इथेच शिवलिंगाची स्थापना झाली अशी आख्यायिका आहे. रामाने स्थापित केल्यामुळे याला रामेश्वर असे नाव पडले आहे.
घृष्णेश्वर (महाराष्ट्र)
घृष्णेश्वर हे बाराव्या क्रमांकाचे जोतिर्लिंग आहे.घृष्णेश्वर मंदिर हे प्राचीन शंकराचे मंदिर आहे.
हे मंदिर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात असून दौलताबाद पासून 11 किलोमीटर अंतरावर व वेरूळ लेण्यांच्या जवळ आहे.
या मंदिराचे बांधकाम हे लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. तसेच या मंदिराचे नक्षीकाम वर्णनीय आहे.
या ज्योतिर्लिंगाची कथा सांगितली जाते की, कृष्णा आणि सुदे ह्या अशा दोन बहिणी होत्या या सख्या बहिणी सवती होत्या. दोघींचा एकाच माणसाची विवाह झाला होता. पण दोघींना मूलबाळ नव्हते. घोषणा शिवभक्त होती आणि शंकराची नियमित पूजा उपासना करत होती.
तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन तिला पुत्रप्राप्ती झाली. पण तिच्या बहिणीने द्वेषाने या मुलाला ठार मारले व नदीत फेकले. ही घटना घडली तेव्हा कृष्णा शिव पूजा करत होती. आपल्या मुलाला मारले जात आहे हे ऐकूण ती विचलित झाली नाही आणि तिने पूजा तशीच चालू ठेवली. ज्याने मला पुत्र दिला आहे तोच त्याचे रक्षण करेल असे म्हणत ती पूजा करत राहिली. तिची भक्ती पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि नेचा मुलगा पुन्हा जिवंत होऊन नदीतून बाहेर आला. कृष्णाच्या ज्योती रूपात या स्थानिक कायमचे वास्तव्य करा अशी भगवान शंकराला प्रार्थना केली आणि शंकराने तिची ही प्रार्थना ऐकली. भ्रष्टनेच्या नावामुळे या स्थानाला घृष्णेश्वर असे नाव देण्यात आले.