छ. संभाजीनगर(औरंगाबाद) या प्रशासकीय विभागातील Beed Jilha बीड जिल्हा आहे.
मुख्यालय – बीड
महानगरपालिका – नाही
क्षेत्रफळ – 10693 चौकिमी
स्थान व विस्तार – पूर्वेस व आग्नेयस लातूर जिल्हा, दक्षिणेस उस्मानाबाद जिल्हा, नैऋत्य, पश्चिमेस व वायव्येस अहमदनगर जिल्हा, उत्तरेस औरंगाबाद व जालना, ईशान्येस परभणी जिल्हा.
तालुके(11) – बीड, अंबाजोगाई, आष्टी, केज, गेवराई, माजलगाव, परळी, पाटोदा, धारूर, वडवणी, शिरूर-कासार.
नद्या – गोदावरी ही प्रमुख नदी आहे. मांजरा, सिंदफना, सिना, रेना, बिंदुसरा या इतर नद्या. विंचरना ही सेनेची उपनदी आहे.
धरणे – सिंदफणा धरण पाटोदा, माजलगाव धरण(सिंदफणानदीवर), मांजरा प्रकल्प केज (मांजरानदीवर), बिंदुसरा प्रकल्प बीड (बिंदुसरा नदीवर)
संगमस्थळ – मंजरथ (गोदावरी-सिंदफणा)
नदीकाठावरील ठिकाण – बीड (बिंदुसरा), माजलगाव (सिंदफणा)
अभयारण्य – नायगाव-मयुरेश्वर (ता.पाटोदा)
धबधबे – सौताडा (ता.पाटोदा), कपिलधार (मांजरसुंबा)
जलविद्युत केंद्र – माजलगाव
औष्णिक वीज केंद्र – परळी-वैजनाथ
डोंगररांगा – बालाघाट, नेकनूर टेकड्या, ,चिंचोली
लेणी – परळी-वैजनाथ, आंबेजोगाई, पारगाव.
वने – वडवणी तालुक्यात सर्वाधिक वने आहेत. “शांतीवन” हा वनप्रकल्प बिंदुसरा नदीकाठी मंजरी येथे आहे. जिल्ह्यात वने विरळ प्रमाणात आहेत.
मृदा – गोदावरी खोऱ्यात सुपीक मृदा आढळते.
पिके – जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, तूर, उडीद, कापूस, भुईमुग, इत्यादी पिके घेतात.
- बीड येथे कंकालेश्वर जलमंदिर व खंडेश्वरी मंदिर आहे. हजरत शेहेनशहावली दर्गा व मन्सूरशहा दर्गा आहे. शहराजवळ खजाना विहीर प्रसिद्ध असून तिचे पाणी कधी साठत नाही
- बीड शहर बिंदुसरा नदीकाठी वसलेले आहे.
- परळी-वैजनाथ येथे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाचे जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केले.
- परळी येथे राष्ट्रीय औष्णिकविद्युत प्रकल्प आहे .
- आद्यकवी मुकुंदराज व दासोपंत यांची समाधी व योगेश्वरी मंदिर अंबाजोगाई येथे आहे.
- अंबाजोगाई येथे जोगेश्वरी मातेचे मंदिर आहे.
- आष्टी-पाटोदा दरम्यान विंचरणा नदीवर “सौताडा” धबधबा व रामेश्वर मंदिर आहे.
- गेवराई तालुक्यात राक्षसभवन येथे 1773 च्या लढाईत माधवराव पेशव्यांनी निजामास पराभूत केले.
- चिंचोली (ता.पाटोदा) हे थंड हवेचे ठिकाण आहे.
- बीड मधील सिताफळ या फळास नोव्हेंबर 2016 मध्ये GI (जिओग्राफिकल इंडिकेशन) मानांकन मिळाले.
- परळी वैजनाथ येथे रेल्वे जंक्शन आहे.
- बीड ते मांजरसुंभा दरम्यान पालीघाट आहे.
- कपिलधार येथे श्री मन्मथ स्वामींची समाधी आहे.
- नेकनूर येथे बंकट स्वामींची समाधी आहे.
- नवगण राजुरी (त.बीड) येथे गणेश मंदिर आहे.
- राक्षसभवन येथे शनी मंदिर आहे व गेवराई तालुक्यातील राक्षसभवन येथे मराठे व निजाम यांच्यात युद्ध झाले होते.
- बीड जिल्ह्याला जुन्या मराठी कवींचा जिल्हा असे म्हणतात
- बीड जिल्हा देव देवळांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो
- आष्टी येथे हजरत शाहबुखारी यांचा दर्गा आहे.
- बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे.
- नामलगाव येथे गणेशाचे प्राचीन मंदिर आहे.
- बीड शहराचे पूर्वीचे नाव चंपावतीनगर असे होते.
- बीड व उस्मानाबाद बीड उस्मानाबाद लातूर या जिल्ह्यात यांच्यात मांजरा नदी सीमा बनवते.
- भारतातील प्रसिद्ध गणेश गणिततज्ञ भास्कराचार्य हे बीडचे होते.