Bhandara Jilha : भंडारा जिल्हा

Bhandara Jilha भंडारा जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागात येतो.

मुख्यालय – भंडारा

महानगरपालिका – नाही

क्षेत्रफळ – 3896 चौकीमी

स्थान व विस्तार – भंडाराच्या पूर्वेस गोंदिया पश्चिमेस नागपूर दक्षिणेस चंद्रपूर उत्तरेस मध्य प्रदेश से राज्य आग्नेयस गडचिरोली

तालुका(7) – भंडारा, तुमसर, पवनी, मोहाडी, साकोली, लाखांदूर, लाखनी.

नद्या – वैनगंगा ही प्रमुख नदी आहे. बावनथडी, चुलबंद, मरुसुर या इतर नद्या.

संगमस्थळ – भंडारा (वैनगंगा-सूर)

धरण – गोसीखुर्द (वैनगंगा नदीवर)

नदीकाठावरील ठिकाण – भंडारा(वैनगंगा)

अभयारण्य – कोका (ता.भंडारा 2013)

गरम पाण्याचा झरा – गायमुख (ता.तुमसर)

तलाव – शिवनी, चांदपूर, रावणवाडी, बांदलसागर.

डोंगररांगा – अंबागड, भीमसेन, गायखुरी, चांदपूर, कोका.

लेणी – भंडारा, अड्याळ, पवनी.

पिके – सुगंधित तांदूळ हे प्रमुख पीक आहे. तुमसर येथे तांदळाची बाजारपेठ आहे

वने – जिल्ह्यात उष्णकटिबंधीय पानझडी वने आढळतात.  मृदा – जिल्ह्यात काळी व कसदार मृदा आढळते. काही ठिकाणी तांबडी व पिवळसर मृदा आढळते.

अभयारण्य – कोका अभयारण्य, भंडारा-नागपूर सीमेवर उमरेड- करांडला (गोठणगाव) अभयारण्य आहे.

खनिजसंपत्ती – तुमसर तालुक्यात मॅगनीज साठे आहेत. याशिवाय पवनी येथे क्रोमाइट हे देखील आढळते.

  • भंडारा हे तलावांचे शहर (तलावांचा जिल्हा) आहे. भंडारा जिल्ह्यात 1462 तलाव आहेत.
  • जवाहरनगर येथे संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे.
  • भंडारा येथे तांब्या-पितळेची भांडी बनवण्याचे कारखाने आहेत.
  • तुमसर तालुक्यात मॅगनीज शुद्धीकरण कारखाना व विडी उद्योग आहे.
  • पवनी तालुक्यात अड्याळ येथे हनुमान मंदिर व “घोड्याची यात्रा” प्रसिद्ध आहे.
  • तुमसर येथे तांदळाची मोठी बाजारपेठ आहे.
  • बावनथाडी येथे संवर्धन राखीव क्षेत्र आहे.
  • इंटिग्रेटेड पोलाद निर्मिती प्रकल्प भंडारा येथे आहे.
  • जवाहरनगर येथे बंदुकीच्या गोळीची दारू निर्मिती कारखाना आहे.
  • एकोडी या ठिकाणी रेशीम उद्योग प्रसिद्ध आहे.
  • भंडारा जिल्ह्यात डोंगराळ भागात गोंड व हळवी या जमाती आढळतात.
  • भंडारा येथे बहिरंगेश्वर मंदिर व अलोनी बाबाचे मठ प्रसिद्ध आहे.
  • पवनी येथे मुरलीधर मंदिर व बौद्धकालीन स्तूप आहे.
  • माडगी या ठिकाणचे नरसिंह मंदिर प्रसिद्ध आहे.
  • माडगी येथे वैनगंगा नदीपात्रात बेट निर्माण झाले आहे.  
  • साकोली येथे भात संशोधन केंद्र आहे. भंडारा भागातील खडकाच्या पट्ट्यांना “साकोली माळा” म्हणतात.
  • भंडारा येथील “अंबागड किल्ला” गोंड घराण्यातील व बख्त  बुलंदशाह यांनी बांधला होता.
  • झाडी ही बोलीभाषा भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बोलली जाते.
  • भंडारा रोड येथे मोठा पोलाद प्रकल्प आहे.
  • शेतीच्या लागवडीखाली नसलेल्या सर्वाधिक जमिनीचे क्षेत्र असणारा जिल्हा हा भंडारा आहे.

Leave a comment