Bharatatil khanij sampatti : भारतातील खणिज संपत्ती

Bharatatil khanij sampatti : भारतातील खनिज संपत्ती

भारतात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्तीचे साठे आढळतात. खनिज संपत्तीच्या दृष्टीने भारत एक संपन्न राष्ट्र आहे.

भारतात सापडणारे खनिजे दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, लोहखनिज, मॅगनीज, बॉक्साईट, चुनखडी, अभ्रक, क्रोमाइट, कायनाईट, तांबे, चांदी, सोने, हिरे, शिसे, जास्त, युरेनियम, थोरियम इत्यादी खनिजे विशाल भारत भूमीत मोठ्या प्रमाणात आढळतात.

छोट्या नागपूरच्या पठारावर खनिज संपत्तीचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात.

एकूण राष्ट्रीय उत्पन्नात खनिज संपत्तीचा वाटा अत्यल्प म्हणजे केवळ 1.5% ते 2% इतकाच आहे.

भारतात एकूण 5 खनिज पट्टे आहेत.

१.ईशान्य द्वीपकल्पीय पट्टा- छोटा नागपूर पठार, झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल.

हा पट्टा सर्वाधिक खनिज समृद्ध पट्टा आहे.

प्रमुख खनिजे- कोळसा, लोह, मॅग्नीज, अभ्रक, बॉक्साईट,

२.मध्य पट्टा- छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र.

हा दुसऱ्या क्रमांकाचा खनिज समृद्ध पट्टा आहे.

प्रमुख खनिजे- मॅगनीज, बॉक्साईट, मार्बल, कोळसा.

3.दक्षिण पट्टा- कर्नाटक, तामिळनाडू.

प्रमुख खनिजे- लोह, मॅगनीज, कोळसा,

4.नैऋत्य पट्टा- पश्चिम कर्नाटक, गोवा.

प्रमुख खनिजे- लोह, गार्नेट, चिनीमाती.

5.वायव्य पट्टा- राजस्थान, गुजरात.

प्रमुख खनिजे- तांबे, शिसे, जास्त, पेट्रोलियम.

खनिज संपत्तीचे वर्गीकरण-

धातू खनिजे-(Metallic Minerals) लोहखनिज, बॉक्साईट, मॅगनीज, सोने, तांबे, चांदी, शिसे, जास्त, कथिल, टंगस्टन, निकेल.

अधातू खनिजे-(Non- Metallic Minerals) जिप्सम, अभ्रक, चुनखडी, हिरा, डोलोमाईट, पोटॅशियम, ग्राफाईट, कायनाईट.

ऊर्जा खनिजे(Power Minerals) दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू

1)धातू खनिजे

धातू खनिजे प्रामुख्याने अग्नीजन्य व रूपांतरित खडकात आढळतात.

लोह खनिज

जागतिक लोहखनिज क्षेत्राच्या 20 टक्के लोहखानेच साठा भारतात आहे.

लोहखनिज उत्पादनात भारताचा जगात चौथा क्रमांक, तर निर्यातीत पाचवा क्रमांक लागतो.

जागतिक लोह खनिज उत्पादन 2022 नुसार क्रम: 1)ऑस्ट्रेलिया 2)ब्राझील 3) चीन 4) भारत ५) रशिया

भारतात मॅग्नेटाइट (72%लोह), हेमेटाईट (60 ते 70%लोह), लिमोनाईट (50-60%लोह), सीडेराईट (48%) हे लोह खनिजाचे प्रमुख चार प्रकार आढळतात.

भारतात हेमेटाईटचे साठे (लोह प्रमाण 70%) मोठ्या प्रमाणात असून त्या खालोखाल मॅग्नेटाईटचे साठे आहेत.

लोहाच्या प्रमाणावरून लोहखनिजांचा उच्च प्रतीकडून कमी प्रतिकडे क्रम मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लिमोनाईट, सीडेराई असा आहे.

पश्चिम बंगालमधील दामोदर खोऱ्यात लोहखनिज आढळते. दंडकारण्य पठारावर लोहखनिजाचे साठे आहेत.

याशिवाय गोवा, हरियाणा, राजस्थान, तामिळनाडू, उत्तराखंड, बिहार या राज्यात लोहखनिज सापडते.

मॅग्नीज

मॅग्नीज साठ्याबाबत जगात झिंबाब्वे नंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

लोखंडापासून पोलाद निर्मितीत मॅग्नीजचा वापर करतात.

मॅग्नीज उत्पादनात भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो.

1 टन पोलाद निर्मितीसाठी 6 किलो लागते. मॅग्नीज व लोह खनिजे एकत्र आढळत असल्यामुळे त्यांना फेरो-मॅग्नीज म्हणतात.

मॅग्नीजचे 95 टक्के उत्पादन लोह-पोलाद उद्योगात वापरतात.

लोखंडापासून पोलाद तयार करण्यासाठी मंगल धातूचा उपयोग होतो.

देशात ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यात मंगल(मॅग्नीज)धातूचे साठे आहेत.

महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यात मिळून भारतातील 50% हून अधिक मॅग्नीज उत्पादन होते.

निर्यातीत या खनिजाचा वाटा सुमारे २० टक्के आहे.

प्रमुख खरेदीदार- जपान, यूएसए, युके, जर्मनी, फ्रान्स.

Read-Topic May be useful for you:-Geographical and political history of India : भारताचा भौगोलिक व राजकीय इतिहास

बॉक्साईट

बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम हा धातू मिळतो.

बॉक्साईट हा शब्द “Le Beaux” या शब्दापासून आला आहे. अल्युमिनियम चा उपयोग मोटारीचे सुटे भाग, भांडी, विमाने, जहाजे इत्यादी उद्योगात करतात.

विजेची सुवाहक असल्याने विद्युत उपकरणे बनवण्यासाठी बॉक्साईटचा वापर करतात.

बॉक्साईटची निर्यात 20 टक्क्याहूनही कमी आहे.

प्रमुख खरेदीदार- इटली, युके, जर्मनी, जपान.

बॉक्साईटचे सह्याद्रीतील साठे उच्च दर्जाचे आहेत.

साखर, सिमेंट व लोहपोलाद उत्पादनात बॉक्साइट चा उपयोग केला जातो. देशातील एकूण साठ्याच्या 29% साठे महाराष्ट्र राज्यात आहेत.

बॉक्साईटचे मोठ्या प्रमाणावर साठे जांभा खडकामध्ये आढळतात.

झारखंड मधील मुरी” या ठिकाणी भारतातील पहिला अल्युमिनियम निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

सोने

भारतातील बहुतेक सोने उत्पादन कर्नाटक राज्यातील कोलार खाणीतून उत्पादन केले जाते.

कर्नाटक राज्यात कोलार, रायचूर, धारवाड, तुमकुर, बेळगाव, मैसूर, मंड्या, चिकमंगळूर या जिल्ह्यामध्ये सोन्याच्या खाणी आहेत.

कर्नाटक हे भारतातील मुख्य सोने उत्पादक राज्य आहे.

कर्नाटक राज्यात कोलार खाणीतून मोठ्या प्रमाणात सोने काढले जाते. आंध्र प्रदेश राज्यात रामगिरी क्षेत्रात, अनंतपुर जिल्ह्यात व चित्तूर जिल्ह्यात सोने उत्पादन केले जाते.

याशिवाय झारखंड, केरळ व तामिळनाडू या राज्यात काही प्रमाणात सोने सापडते.

तांबे

तांबे उत्पादनात झारखंड राज्याचा प्रथम क्रमांक लागत असून राजस्थान व झारखंड या दोन्ही राज्यात 90% तांब्याचे उत्पन्न मिळते.

झारखंड राज्यात सिंगभूम येथे सर्वात मोठा तांब्याचा पट्टा आहे.

याशिवाय झारखंड, मध्यप्रदेश,राजस्थान,उत्तराखंड, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र तांबे आढळते.

शिसे व जस्त

शिसे व जस्त यांचे साठे राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार व महाराष्ट्रात आढळतात.

शिसे हे निसर्गात मुक्तपणे न आढळतात ते गॅलेना या सल्फाईड धातूक रूपात आढळते.

शिसे (गॅलेना)व जस्त यांचे साठे एकत्र आढळतात.

टंगस्टन

टंगस्टन चे साठे कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेश व महाराष्ट्र या राज्यात आढळतात.

2)अधातू खनिजे

अभ्रक

अभ्रक हा पारदर्शक, स्फटिकयुक्त, चिवट व कडक असा अधातू पांढरा खनिज पदार्थ आहे.

त्याच्या विद्युतरोधक गुणधर्मामुळे इलेक्ट्रॉनिक आणि वीज उद्योगात त्याचा वापर होतो.

उत्पादनात व निर्यातीत भारत जगात सर्वप्रथम आहे.

अभ्रकाचा उपयोग विद्युत उपकरणांमध्ये विद्युत रोधक म्हणून, आयुर्वेदात औषध म्हणून केला जातो,

अभ्रक हा उष्णतेचा सुवाहक तर विजेचा दुर्वाहक असल्याने त्याचा वापर इस्त्रीमध्ये (गरम करण्यासाठी) केला जातो.

अभ्रकाचे साठे- आंध्र प्रदेश, राजस्थान, ओरिसा, महाराष्ट्र राज्यात आहेत. अभ्रकाचे भारतात मस्कोवाईट(पांढरे शुभ्र) व फ्लोगोपाइट (पिवळसर तपकिरी), बायोटेक हे प्रकार आढळतात.

जिप्सम

स्तरीत खडकात आढळणारे हे खनिज सिमेंट कारखान्यात व रासायनिक खते तयार करण्यासाठी वापरतात.

जिप्सम चे साठे राजस्थान, जम्मू-काश्मीर, तामिळनाडू, गुजरात, हिमाचल प्रदेश मध्ये आढळतात.

भारतातील जिप्सम आणि चिनी मातीचे एकूण  साठ्यापैकी सर्वाधिक साठे राजस्थान मध्ये आढळतात.

देशातील एकूण जिप्सम उत्पादनाच्या 90% उत्पादन राजस्थानतील बिकानेर, जोधपुर, जैसलमेर या क्षेत्रात होते.

जिप्सम चा वापर खत निर्मिती व भांडी उद्योगात केला जातो. सिमेंट व रंग निर्मितीत केला जातो.

सैंधव (नीज मीठ)

खनिज मीठ हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात व राज्यस्थानातील सांर सरोवरात आढळते.

मीठ गुजरात किनारपट्टी, महाराष्ट्र किनारपट्टी, तामिळनाडू,  राजस्थान, कन्याकुमारी या राज्यात आढळते.

चुनखडी

चुनखडी सिमेंट उत्पादनात(75%), लोहखनिज शुद्धीकरणात(16%) व रासायनिक उद्योगात(4%) चुनखडीचा उपयोग करतात.

चुनखडीचे साठे भारतात कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात, मेघालय, या राज्यात आहेत.

हिरे

मध्यप्रदेश राज्यात पन्ना, सतना या खाणीतून हिऱ्याचे उत्पादन केले जाते. उत्तर प्रदेश मध्ये मिर्झापूर येथून हिरे उत्पादन केले जाते.

पन्ना मध्य प्रदेश येथील हिरे प्रसिद्ध आहेत.

सल्फर (पायराईट)

सल्फर चे साठे बिहार व कर्नाटक राज्यात आहेत.

अँस्बेस्टॉस

अँस्बेस्टॉसचे साठे राजस्थान, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यात सापडतात.

लिथियम

जम्मू काश्मीर मध्ये लिथियम साठ्याचा शोध लागला. 10 फेब्रुवारी 2023 च्या घोषणेनुसार जम्मू-काश्मीरमधील सालाल-हैमाना या भागात 5.9 दशलक्ष टन लिथियम साठा आढळला आहे.

लिथियम हा भविष्यातील ऊर्जा स्त्रोत मानला जातो.

लिथियम हा विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या बॅटरी, स्मार्टफोन, लॅपटॉपची बॅटरी यामध्ये महत्त्वाचा घटक आहे.

लिथियमसाठी भारत प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया व अर्जेंटिना या देशावर अवलंबून आहे.

किरणोत्सारी खनिजे

युरेनियम व थेरियम

केरळ व तामिळनाडूच्या किनाऱ्यावर सापडणाऱ्या मोनाझाईट या खनिजात थेरियम हे अणुऊर्जा उत्पादक खनिज आढळते.

झारखंड मधील चौबासा, जादूगोडा येथे व हिमाचल प्रदेशात युरेनियम हे खनिज सापडते.

जर्मन केमिस्ट मार्टिन क्लाप्रो याने पिचब्लेंड मधून युरेनियम चा शोध लावला.

पहिली युरेनियमची खान जादूगोडा येथे आहे.

1 किलो युरेनियम पासून मिळणारी ऊर्जा ही 1,500 टन कोळशापासून मिळणाऱ्या ऊर्जा इतके असते.

जगात युरेनियमचे सर्वाधिक साठे ऑस्ट्रेलिया मध्ये आहेत.

युरेनियम ऑक्साईड हे “yellow cake” या नावाने ओळखले जाते.

३)ऊर्जा खनिजे

दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू ही भारतातील प्रमुख ‘अप्राणीज व पारंपारिक ऊर्जा खनिजे आहेत.

दगडी कोळसा

जमिनीत हजारा वर्षापूर्वी गाडल्या गेलेल्या वनस्पती पासून कोळसा बनतो व पूर्वी या वनस्पती सूर्यप्रकाशात वाढलेल्या असतात. म्हणून कोळसा हा गाडलेला सूर्यप्रकाश म्हणून ओळखला जातो.

उच्च प्रतीचा ऊर्जा स्त्रोत व बहुतांश उद्योगांमध्ये कच्चामाल या उपलब्धतेमुळे कोळशास काळे सोने असे म्हटले जाते.

दगडी कोळशाला औद्योगिक हिरा असे म्हणतात.

दगडी कोळसा उत्पादनात भारत देशाचा दुसरा क्रमांक लागतो.

देशातील सुमारे 67% व्यापारी ऊर्जा दगडी कोळशापासून प्राप्त होते.

दगडी कोळशाचा वापर खाते व रसायन उद्योगात कच्चामाल म्हणून व रेल्वे इंधनात रेल्वे इंधन म्हणून केला जातो.

देशातील कोळशाची पहिली खाण राणीगंज येथे पश्चिम बंगाल येथे आहे. तामिळनाडूतील नेवेली येथे उच्च प्रतीचा लिग्नाइट कोळसा आढळतो.

दामोदर खोरे कोळसा खाणींसाठी प्रसिद्ध असून स्वयंपाकाच्या कोळशाचे ते प्रमुख केंद्र आहे.

दामोदर खोऱ्यातील कोळसा क्षेत्र राणीगंज, झारिया, रामगड, पूर्व पश्चिम बोकारो.

राजस्थानातील बारमेर, बिकानेर, नागौर जिल्ह्यात लिग्नाइट कोळशाचे साठे आढळतात.

कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे चार प्रकार पडतात.

अंतरासाईट 80 ते 90% कार्बन

बिट्युमिनस 75 ते 85 टक्के कार्बन

लीगनाईट 45 ते 55 टक्के कार्बन

पीठ कोळसा 30 ते 45 टक्के कार्बन

दगडी कोळसा उत्पादन करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये कॉल इंडिया लिमिटेड ही सर्वात मोठी कंपनी आहे.

देशातील दगडी कोळसा गोंडवण खडकाच्या थरात आढळत असून त्यात 95 टक्के साठे व 72 टक्के खाणी आहेत.

महाराष्ट्रातील वर्धा नदी खोऱ्यापासून पूर्वेकडे दामोदर नदी खोऱ्यापर्यंत गोंडवन खडकाच्या थरात दगडी कोळसा सापडतो.

जीओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हे दगडी कोळशाचे संशोधन करते.

बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यातून ९० टक्के दगडी कोळशाचे उत्पादन केले जाते.

खनिज तेल (पेट्रोलियम)

खनिज तेल हे जगातील प्रमुख ऊर्जा साधन आहे.

खडकात सापडणाऱ्या नैसर्गिक तेलाला पेट्रोलियम व खनिज तेल असे म्हणतात.

विविध प्रकारच्या कार्बनी व हायड्रोकार्बनी द्रव्याच्या मिश्रणातून खनिज तेलाची निर्मिती होते.

खनिज तेलापासून केरोसीन, मेण, व्हॅसलीन, डिझेल, पेट्रोल, डांबर इत्यादी पदार्थ मिळतात.

खनिज तेल व त्यांची उत्पादन यांना एकत्रितरीत्या काळे सोने म्हणतात.

पेट्रोलियमचे घटक हायड्रोकार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन व सल्फर हे आहेत.

वलुकाश्म व चूनखडक हे खनिज तेलाचे मुख्य उगमस्थान समजले जातात.

मुंबई हाय (बॉम्बे हाय) येथे “सागर सम्राट यांचा यांत्रिक प्लॅटफॉर्मवरून खनिज तेल काढले जाते.

मुंबई हाय तेलक्षेत्रातून नळमार्गाद्वारे कच्चे तेल उरण येथील तेल शुद्धीकरण केंद्रात केले जाते.

अरबी समुद्रात मुंबई हाय च्या दक्षिणेस भसी येथे खनिज तेलाचे साठे सापडले आहेत.

याशिवाय कृष्णा, गोदावरी, कावेरी नद्यांची खोरे आणि अंदमान बेटे ही देखील भारताची खनिज तेल क्षेत्र आहेत.

राजस्थान मधील जैसलमेर व बारमेर जिल्ह्यात पेट्रोलियमचे साठे आढळतात.

खनिज तेलाचा शोध घेण्यासाठी देशात तेल आणि नैसर्गिक वायू मंडळ व ऑइल इंडिया लिमिटेड ची स्थापना करण्यात आली.

भारतातील पहिली तेल विहीर दिग्बो आसाम मध्ये आहे.

राजस्थानात बारमेर येथे खनिज तेल आढळते.

याशिवाय त्रिपुरा, मणिपूर, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, पंजाब, कच्छ प्रदेश, ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक इत्यादी राज्यात खनिज तेलाचे साठे आढळतात.

नैसर्गिक वायू

साधारणतः खनिज तेलाच्या सानिध्यातच नैसर्गिक वायूचे साठे आढळतात.

भुपृष्ठाखाली खनिज तेलाच्या सानिध्यात ज्वालाग्रही वायू असतो त्याला नैसर्गिक वायू असे म्हणतात.

जगात नैसर्गिक वायू उत्पादनात रशियाचा प्रथम क्रमांक लागतो.

भारतातील नैसर्गिक वायूचे साठे बॉम्बे हाय क्षेत्र, राजस्थान मधील नागौर व बारसिंगसौर, गुजरात मधील अंकलेश्वर व खांबाचे आखात, तसेच आसाम व पंजाब मध्येही नैसर्गिक वायूचे साठे आहेत.

नैसर्गिक वायूचा उपयोग घरगुती व औद्योगिक इंधन म्हणून केला जातो. कृत्रिम रबर निर्मिती प्रकल्पातही केला जातो.

भारतात नैसर्गिक वायूचा शोध व उत्पादनाची जबाबदारी ओ.एन.जी.सि. व ओ.आय.एल. या संस्थांकडे आहे.

1984 मध्ये गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (गेल) संस्थेची स्थापना करण्यात आली.

गेल ही संस्था  दिल्ली, मुंबई. हैदराबाद या शहरांमध्ये घरगुती गॅस पुरवठा करते.

देशात गेलने हाजीरा(गुजरात), बिजेपुर(राजस्थान), जगदीशपूर(उत्तर प्रदेश) या शहरातून जाणारी गॅस पाईपलाईन टाकली आहे.

नैसर्गिक वायूचा उपयोग वीज निर्मिती, घरगुती इंधन, सिमेंट उद्योग, पेट्रोलकेमिकल्स इत्यादीसाठी केला जातो.

Leave a comment