Bharatatil krushi utpadane : भारतातील कृषी उत्पादने – भारतात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भारतीय शेतीतून पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
भारतीय शेती अर्थव्यवस्थेचा कणा असून शेती व उद्योग ही भारतीय अर्थव्यवस्थेची दोन चाकी आहेत.
भारतीय शेतातून भात, गहू, ज्वारी, बाजरी, बार्ली, ऊस, कापूस, चहा, तंबाखू, कॉफी, रबर, ताग, तूर, हरभरा, सोयाबीन, मका, सूर्यफूल, मसाल्याचे पदार्थ व विविध फळांचे उत्पादन होते.
भारतीय कृषी हंगाम
खरीप पिके– खरीप पिके जून-जुलै महिन्यात पेरली जातात. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कापली जातात.
उदाहरण- भात, मका, कापूस, ज्वारी, ऊस, बाजरी, तंबाखू, तुर, सोयाबीन इत्यादी.
रब्बी पिके– रब्बी पिके हे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पेरली जातात व मार्च-एप्रिल महिन्यात पिकांची कापणी केली जाते.
उदाहरण- गहू, हरभरा, मोहरी
पिकांचे वर्गीकरण:
खाद्यान्न पिके- भात, गहू, ज्वारी, मका, बाजरी, बार्ली.
डाळवर्गीय पिके- हरभरा, मुग, मसूर, सोयाबीन, उडीद, तुर, चवळी, तेलबिया पिके- जवस, सोयाबीन, सूर्यफूल, करडई, मोहरी, तीळ.
पेय पिके- चहा, कॉफी.
नगदी पिके- कापूस, ऊस, तूर, तंबाखू इत्यादी
भात (तांदूळ)
भाताचे सर्वाधिक उत्पादन चीन देशात होत असून भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
भात हे देशातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. भात पिकाखाली एकूण शेती योग्य क्षेत्राच्या सर्वाधिक क्षेत्र आहे.
भात पिकाखाली आहे सुमारे 22% क्षेत्र भात पिकाखाली येते. भात हे उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशात घेतले जाणारे पीक आहे.
150 ते 200 cm पावसाच्या प्रदेशात भाताचे पीक घेतले जाते. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश या कमी पावसाच्या राज्यात भाताचे पीक घेतले जाते.
पश्चिम बंगाल हे राज्य सर्वाधिक भाताचे उत्पादन करणारे राज्य आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यात भात पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
तामिळनाडू राज्यात चेन्नईच्या आजूबाजूच्या प्रदेशात भाताचे उत्पादन अधिक प्रमाणात होते.
महाराष्ट्रात कोकण किनाऱ्यालगत व पूर्व विदर्भात, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात भाताचे उत्पादन घेतले जाते.
गहू
गहू हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे. गहू या पिकाखाली 13 टक्के जमीन आहे.
भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे हे पीक आहे.
75 सेंटीमीटर पाऊस व थंड हवामानात वाढणारे पीक आहे. या पिकाचे उत्पादन सर्वाधिक उत्पादन चीन या देशात होते.
गाव्हाखालील क्षेत्र व उत्पादनाचा विचार करता उत्तर प्रदेश राज्याचा देशात प्रथम क्रमांक लागतो.
दर हेक्टरी उत्पादनात पंजाब राज्याचा देशात प्रथम क्रमांक लागतो.
देशात हरियाणा, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, व बिहार राज्यात गव्हाचे उत्पादन होते.
कॉफी
सुरुवातीला कॉफीची लागवड भारतामध्ये बाबाबुदन (कर्नाटक) या टेकड्यावर करण्यात आली.
कर्नाटक राज्यात कॉफीचे सर्वाधिक उत्पादन होते.
कॉफी उत्पादनासाठी 150 सेंटीमीटर पाऊस अधिक तापमान व सेंद्रिय माती च्या प्रदेशात कॉफीचे पीक चांगले येते.
ज्वारी
ज्वारी हे रब्बी व खरीप दोन्ही हंगामात घेतले जाणारे पीक आहे.
संपूर्ण देशातील एकूण शेती योग्य जमिनीपैकी 11% जमीन ज्वारी पिकाखाली आहे.
50 सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशात, उष्ण हवामान, काळ्या मृदेत ज्वारीचे पीक अधिक प्रमाणात चांगले येते.
देशातील एकूण उत्पादनाच्या 50% उत्पादन महाराष्ट्रात होते.
सर्वाधिक उत्पादन उत्पादन व क्षेत्र महाराष्ट्र आहे.
कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यात ज्वारी पिकाचे उत्पादन होते.
कडधान्य पिके
देशातील एकूण शेती योग्य जमिनीपैकी 15% क्षेत्रावर कडधान्याची पिके घेतली जातात.
उदाहरण- तुर,, मूग, उडीद, मसूर, हरभरा, वाटाणा, सोयाबीन इत्यादी कडधान्य पिके ही काही रब्बी तर काही खरीप हंगामात घेतले जातात.
तेलबिया पिके
भारतात विविध प्रकारच्या तेलबियाचे उत्पादन होते.
उदाहरण- सोयाबीन, मोहरी, सूर्यफूल इत्यादी.
सरकीपासून, खोबऱ्यापासून तेल काढले जाते.
देशात एकूण क्षेत्रापैकी 13%क्षेत्र तेलबियाच्या पिकाखाली आहे.
तेलबिया उत्पादनात गुजरात राज्याचा पहिला क्रमांक लागतो. याशिवाय आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू ही तेलबिया उत्पादन करणारी प्रमुख राज्य आहेत.
भुईमूग
हे देशातील महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. भुईमुगाचे सर्वाधिक उत्पादन गुजरात राज्यात होते.
कापूस
कापसाची लागवड सर्वप्रथम भारत देशात करण्यात आली. एकूण क्षेत्रापैकी 6% क्षेत्र कापूस पिकाखाली आहे.
कापूस पिकासाठी भरपूर सूर्यप्रकाश २२ अंश से. तापमान व 50 ते 80 cm पावसाच्या प्रदेशात काळ्या रेगुर मृदेत कापसाचे पीक अधिक चांगल्या प्रकारे येते.
सर्वाधिक कापसाचे उत्पादन महाराष्ट्र व गुजरात राज्यात होते.
महाराष्ट्रात एकूण कापूस क्षेत्रापैकी 36% क्षेत्र आहे.
महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हरियाणा, राजस्थान, दक्षिण भारत, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यात कापसाचे पीक घेतले जाते.
कापूस या कच्या मालावर आधारित महाराष्ट्र व गुजरात राज्यात कापड उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो.
ऊस
उसाचे मूळस्थान भारतात आहे. उष्ण व उपविष्ण प्रदेशात उसाचे पीक घेतले जाते.
हवामान- अधिक तापमान 100 सेंमी पावसाची आवश्यकता उसाच्या पिकासाठी असते.
कमी पावसाच्या प्रदेशात जलसिंचनाच्या साहाय्याने उसाचे उत्पादन होते.
ऊस या पिकात साखरेचे प्रमाण 10-12% इतके आहे.
बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, हरियाणा, तामिळनाडू, पंजाब इत्यादी राज्यात उसाचे उत्पादन होते.
रबर
रबराचा उपयोग मोटार गाड्या ट्रॅक्टर विमाने इत्यादीसाठी लागणारी टायर व ट्यूब यासारख्या वस्तू तयार करण्यासाठी केला जातो.
सर्वाधिक रबराचे उत्पादन केरळ राज्यात होते.
रबराच्या उत्पादनासाठी 200 cm पावसाची आवश्यकता असते.
एकूण रबर क्षेत्रापैकी 92% क्षेत्र केरळ राज्यात आहे.
उत्पादक राज्य- केरळ, तामिळनाडू, कर्नाटक.
पुढे हे हि वाचा :भारतातील घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश व त्यांची राजधानी
मसाल्याचे पदार्थ
मसाल्याचे पदार्थ प्राचीन काळापासून भारत मसाल्याच्या पदार्थासाठी प्रसिद्ध आहे.
मसाल्याची पिके उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशात चांगली येतात.
उदाहरण- आले, हळद, मिरे, लवंग, जिरे, जायफळ, धने, इत्यादी.
प्रमुख उत्पादक राज्य केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र आहेत.
दक्षिण भारतात महाराष्ट्राचे पदार्थ उत्पादन होत असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. तसेच यापासून देशाला परकीय चलन मिळते.
निकोबारमध्ये नारळ,सुपारी हि नगदी पिके व मिरे, लवंग, जायफळ हि मसाला पिके घेतली जातात.
सिक्कीम, दार्जीलिंग या परिसरातील टेकड्यांवर वेलचीचे पिक घेतले जाते.
वेलची या पिकास मसाल्याची राणी व नंदनवनातील धान्य असे म्हणतात.
चहा
जगात चहा उत्पादनात चीनचा पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
चहाची सर्वप्रथम लागवड देशात आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात करण्यात आली.
एकूण चहा उत्पादनापैकी 50 टक्के चहाचे उत्पादन आसाम राज्यात होते. चहाच्या पिकासाठी हवामान उबदार व दमट असावे लागते. 50 सें.मी. पाऊस असावा लागतो.
पर्वत उतारावर चहाच्या मळ्याची शेती केली जाते. आसाम, केरळ, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यात चहाचे उत्पादन घेतले.
तमिळनाडूतील उदगमंडलम(उटी) व केरळमधील मुन्नार येथे चहाचे मळे आहेत.
ताग
ताग हे प्रमुख तंतू पिक आहे. हे पिक जास्त पावसाच्या प्रदेशात घेतले जाते.
तागाचा उपयोग गोणपाट, गालिचे, दोरखंड बनवण्यासाठी केला जातो.
तागास “Golden Fibre” असे म्हणतात.
तागाचे उत्पादन गंगेच्या त्रिभुज प्रदेशात पश्चिम बंगाल राज्यात सर्वाधिक होते. याशिवाय ओडिशा,त्रिपुरा, उत्तर प्रदेश येथे हे पिक घेतले जाते.