Chandra Grahan : चंद्रग्रहण-सृष्टीचा नियम

Chandra Grahan : जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी म्हणजेच तेव्हा पौर्णिमा असते. चंद्रग्रहणावेळी चंद्र, पृथ्वी व सूर्य एका सरळ रेषेत येतात व चंद्र सूर्याच्या मध्ये पृथ्वी असते.

चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी होते पण प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही. वर्षातून कमीत कमी दोन व जास्तीत जास्त तीन चंद्रग्रहण होतात. संपूर्ण रात्र असणाऱ्या गोलार्धात चंद्रग्रहण पहावयास मिळते.

27 जुलै 2018 रोजी 21 व्या शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण झाले. ते 103 मिनिटे टिकले.

चंद्रग्रहणाचे प्रकार-

1) खग्रास चंद्रग्रहण

२) खंडग्रास चंद्रग्रहण

1)खग्रास चंद्रग्रहण

चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीखाली आला तर त्या स्थितीला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. खग्रास चंद्रग्रहणात पृथ्वीच्या सावलीमुळे संपूर्ण चंद्र झाकला जातो. खग्रास स्थितीत काही प्रमाणात सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो त्यामुळे या ग्रहणात चंद्राचा हा भाग थोडा गडद काळसर दिसून येतो याला “ब्लड मुन” असे म्हणतात. खग्रास चंद्रग्रहण जास्तीत जास्त 1 तास 47 मिनिटे (107 मिनिटे) टिकते.

2)खंडग्रास चंद्रग्रहण

चंद्राचा फक्त काही भागच पृथ्वीच्या सावलीखाली आला तर खंडग्रास चंद्रग्रहण होते. ही सावली किती मोठी आहे तितका याचा प्रभाव दिसुन येतो. यावेळी चंद्रावर गडद लालसर थेट चॉकलेटी रंगाच्या छटा दिसून येतात.

Leave a comment