Chandrapur Jilha : चंद्रपूर जिल्हा

Chandrapur Jilha चंद्रपूर हा पूर्व विदर्भातील व नागपूर प्रशासकीय विभागातील जिल्हा आहे. Chandrapur Jilha चंद्रपूरची प्राचीन नावे चंदा, लोकापूर, इंदपूर आहेत. झाडी” ही बोलीभाषा चंद्रपूरची राजभाषा होती.  

मुख्यालय – चंद्रपूर

महानगरपालिका – चंद्रपूर (2011)

क्षेत्रफळ – 11443 चौकीमी.

स्थान व विस्तार – चंद्रपूरच्या पूर्वेस गडचिरोली जिल्हा, पश्चिमेस यवतमाळ, दक्षिणेस तेलंगाना (आदिलाबाद जिल्हा),  उत्तरेस भंडारा व नागपूर जिल्हे.

तालुके(15) – चंद्रपूर, चिमूर, भद्रावती, वरोडा, ब्रह्मपुरी, गोंडपिंपरी, नागभीड, राजुरा, मुल, सिंदेवाही, कोरपना, सावली, पोंभूर्णा, बल्लारपूर, जीवती.

नद्या – वर्धा ही येथील प्रमुख नदी आहे. इतर नद्या वैनगंगा, इरई, मुल, अंधारी,पाथरी.

संगमस्थळ – वढा-घुगुस (वर्धा-पैनगंगा)

नदीकाठावरील ठिकाण – चंद्रपूर (इरई), चिमूर (मुल), घुग्गुस (वर्धा), राजुरा (वर्धा).

पिके – जिल्ह्यात खरीप व रब्बी दोन्ही हंगामातील पिके घेतली जातात. काही प्रमाणात फळांचे उत्पादन घेतले जाते. ज्वारीच्या दर हेक्टरी उत्पादनात अग्रेसर असणारा हा चंद्रपूर जिल्हा आहे.

राष्ट्रीय उद्यान – ताडोबा राष्ट्रीय उद्यान (1965) भद्रावती तालुक्यात आहे. महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे.

व्याघ्र प्रकल्प – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

अभयारण्य – अंधारी (ता.भद्रावती 1985)

धरणे – पाथरी नदीवरील असोलमेंढा धरण

लेणी – सोमनाथ, भांडक, भद्रावती, चंद्रपूर.

डोंगररांगा/टेकड्या – पेरजागड, चिमूर, चांदूरगड, मुलटेकड्या.

तलाव – नळेश्वर, कसराला, गडमौसी, मरेगाव, ताडोबा, सिंदेवाही.

खनिजसंपत्ती – घुगुस, वरोडा येथे दगडी कोळशाच्या खाणी व तांब्याच्या खाणी आहेत. चिमूर, ब्रह्मपुरी तालुक्यातील लोहखाणी आहेत.

मृदा – नद्यांच्या खोऱ्यात सुपीक मृदा आढळते. डोंगराळ भागात निकृष्ट दर्जाची मृदा आढळते.

वने – साग, तेंदू, मोह इत्यादी वृक्ष वनात आढळतात.

  • वरोडा तालुक्यात कुष्ठरोगांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले “आनंदवन” आहे.
  • चंद्रपूर इरई नदीकाठी वसलेले आहे.
  • मीडिया गोंड ही आतिमागास जमात चंद्रपूर जिल्ह्यात आढळते.
  • सिंदेवाही येथे राज्य शासनाचे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे. घोडाझरी अभयारण्य आहे
  • मे 2022 मध्ये चंद्रपूर हा राज्यातील दुसरा औद्योगिक प्रदूषित जिल्हा बदला.
  • घुग्गुस हे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.
  • गोंड राज्य व ब्रिटिश राजवटीत तसेच स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्ष हा जिल्हा चांदा नावाने ओळखला जात होता. पुढे त्याचे नाव चंद्रपूर असे झाले.
  • चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक सिमेंट कारखाने असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. चंद्रपूर  येथे राज्यातील पहिला लोह पोलाद प्रकल्प आहे.
  • चंद्रपूर ही गोंड राज्याची राजधानी होती. चंद्रपूर मधील महाकालीचे मंदिर व गौंडकालीन किल्ला प्रेक्षणीय आहे.
  • बल्लारपूर येथे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे व दगडी कोळशाच्या खाणी आहेत.
  • भद्रावती हे युद्ध साहित्य निर्मितीच्या कारखान्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे.
  • भद्रावती येथील विजासन टेकडीवर बौद्धकालीन लेणी आहेत. जवळच ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. भद्रावती येथे पार्श्वनाथ मंदिर आहे.
  • मूल हे धानाच्या किंवा भाताच्या गिरण्यांकरिता प्रसिद्ध आहे.
  • सोमनाथ हे निसर्गरम्य ठिकाण आहे व रोगमुक्त झालेल्या कुष्ठरोग्यांची वसाहत व श्रमसंस्कार शिबिरे यासाठी प्रसिद्ध आहे.
  • राज्यातील 70 टक्के दगडी कोळसा चंद्रपूर जिल्ह्यात आढळतो.
  • चुनखडकाचे सर्वाधिक साठे चंद्रपूर जिल्ह्यात आढळतात.
  • बल्लारपूर येथे राज्यातील सर्वात मोठी कागद गिरणी आहे.
  • चंद्रपूर येथे काच कारखाना आहे.
  • चंद्रपूर येथे महाकाली मंदिर, अचलेश्वर मंदिर, दशावताराचे अवशेष आहेत.
  • चिमूर येथे बालाजी मंदिर आहे.
  • सोमनाथ येथे श्रावणी व शिवरात्री यात्रा भरते.
  • चंद्रपूरला काळ्या सोन्याचे शहर असे म्हणतात.
  • वन महाविद्यालय चंद्रपूर येथे आहे
  • मगर प्रजनन केंद्र ताडोबा राष्ट्रीय उद्यान मध्ये आहे.
  • राज्यातील सर्वाधिक तापमान असणारा असणारे ठिकाण चंद्रपूर आहे.
  • ताडोबा जंगलात “आंबट हिरा” नावाचा पाणवठा आहे.

Leave a comment