Forest Wealth in India : भारतातील वनसंपत्ती

Forest Wealth in India भारत वनसंपत्तीच्या दृष्टिकोनातून एक संपन्न राष्ट्र आहे. भारतामध्ये जवळपास 47000 वनस्पतींच्या प्रजाती आढळतात.

पर्यावरण व वन मंत्रालयाच्या अहवालानुसार देशात  7,76,984 हेक्टर क्षेत्रावर वने आहेत. राष्ट्रीय वन धोरणानुसार कोणत्याही भौगोलिक प्रदेशात पृथ्वीचे तापमान संतुलन राखण्यासाठी वनांचे प्रमाण 33.33% वने असणे आवश्यक असते. भारतात वनांचे प्रमाण 24.62% आहे.

इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट भारतीय वन स्थिती अहवालानुसार भारताचे एकूण वन व वृक्षाच्छादित क्षेत्र ८०.९ दशलक्ष हेक्टर आहे.

भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्राशी वनक्षेत्राचे प्रमाण 24.62% आहे.

2019 ते 2021 या काळात देशाच्या एकूण वन व वृक्षाच्छादित क्षेत्रात झालेली वाढ 2261 चौरस किलोमीटर आहे.

सर्वाधिक वनांचे क्षेत्र असणारे राज्य- मध्य प्रदेश 11.11%, अरुणाचल प्रदेश 9.65%, छत्तीसगड 7.79%, महाराष्ट्र 7.25%, नागालँड 7.22%, कर्नाटक 5.18%.

देशात चंदीगड, पुदुचेरी, पंजाब, हरियाणा, राजस्थान या राज्यात वनक्षेत्राचे प्रमाण कमी आहे.

भारताचे एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौकीमी आहे.

भारतातील एकूण वनांचे क्षेत्र 6,97,894 चौकीमी आहे.

भारतातील घनदाट वनांचे क्षेत्र 83,502 चौकीमी आहे.

भारतातील मध्यमनांचे क्षेत्र तीन 18,745 चौकीमी आहे.

भारतातील विरळ वनांचे क्षेत्र 2,95,651 चौकीमी आहे.

भारतातील वनांचे प्रकार:

एखाद्या प्रदेशात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप न होता नैसर्गिक रित्या वाढलेल्या वनस्पतींना नैसर्गिक वनस्पती असे म्हणतात.

उदाहरणात -मोठी वृक्ष, लहान वृक्ष, झुडपे, गवत, वेली इत्यादी.

भारताचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्याने येथील तापमान स्थितीत मोठ्या प्रमाणात फरक आढळतो. समुद्रसपाटीपासून ते बर्फाच्छादित उंच पर्वतीय प्रदेशापर्यंत देशात भू उंचीनुसार निरनिराळे भूरूपे झाडे आढळतात.

भारताचे पश्चिमेला राजस्थान राज्यात शुष्क वाळवंटी प्रदेश आहे. तर पूर्व भागात मेघालय राज्यात “मौसिनराम” व “चेरापुंजी” हे जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असून दमट हवेचे प्रदेश आहेत. अशा प्रकारे वृष्टी व तापमानाची विविधता तसेच विविध प्रकारची भूरूपे त्यामुळे वनस्पतींमध्ये भिन्नता आढळते.

१)उष्णप्रदेशीय सदाहरित वने:

250 सेंटिमीटर पेक्षा अधिक पावसाच्या प्रदेशात उष्णप्रदेशीय सदाहरित वने आढळतात.

उष्ण व दमट हवामान प्रदेशात पावसाच्या प्रमाणाानुसार आर्द्र सदाहरित निमसदाहरित व शुष्क सदाहरित वनस्पती आढळतात.

सदाहरित वने:

सदाहरित वने ही घनदाट वाढलेली असतात व ती वर्षभर हिरवीगार दिसतात तसेच ही वने उंच वाढलेली असतात. त्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीवर येऊ शकत नाही त्यामुळे दलदलीचा प्रवेश प्रदेश झालेला दिसतो.

हि वने जवळपास 50 ते 60 मीटर उंचीपर्यंत वाढलेली असतात या वनात सर्वाधिक जैवविविधता आढळते.

लाकूड कठीण व टिकाऊ असते.

निम सदाहरित वने:

महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचा पश्चिम किनारा, केरळ, गोवा, आसाम, अंदमान-निकोबार बेट व पूर्व हिमालयाचा उत्तरेकडील भाग या प्रदेशात पावसाचे प्रमाण 200 ते 250 cm असल्यामुळे येथे निमसदाहरित वने आढळतात.

निमसदाहरित वने ही सदाहरित वनांपेक्षा कमी घनतेची असतात.

केरळ राज्यात कुसुम, रोजवूड, बुटेल, सेमुल, येन इत्यादी वृक्ष व बांबू आढळतात. तर ईशान्य भारतात चेस्टनट, पांढरा देवदार व आंबा हे प्रमुख वृक्ष आढळतात.

शुष्क सदाहरित वने:

शुष्क सदाहरित वनस्पती तामिळनाडू राज्याच्या किनारी भागात आढळतात. या भागात लहान झुडपे व गवताच्या स्वरूपात वनस्पती आढळतात.

वनांचे प्रदेश- देशात पश्चिम उताराचा प्रदेश, घाटमाथा, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, अंदमान निकोबार, नागालँड, इत्यादी राज्यात सदाहरित वने आढळतात.

उदाहरण- सोनचाफा, एन, पांढरा सीडर, तेलसूर, आंबा, जांभूळ, फणस, बांबू, वेत, देवदार, धूप, मेसा, तून, कोकम, चाप्लास, गुर्जन.शिसव,रोजवूड इत्यादी वनस्पतींच्या प्रजाती आढळतात.

उष्णप्रदेशीय सदाहरित वने वनातील वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार असतात.

वनांचा उपयोग बांबू वृक्षाचा उपयोग कागद निर्मितीसाठी केला जातो. तून वृक्षाचा वापर खेळणी व चहाची खोके तयार करण्यासाठी केला जातो. कागद, आगपेटी व रेल्वे स्लीपर्स तयार करण्यासाठी गुर्जर वृक्षाचा वापर करतात. याशिवाय या प्रदेशातील वनांचा उपयोग इमारती, फर्निचर व जहाज बांधणी साठी केला जातो.

2)उष्णप्रदेशीय पानझडी वने

उष्णप्रदेशीय पानझडी वने सुमारे 200 सेंटीमीटर पाऊस असलेल्या भागात आढळतात. उष्णप्रदेशीय पानझडी वने ही मोसमी वने या नावाने ओळखले जातात.

या प्रदेशातील वनस्पती मान्सुनी वनस्पती म्हणून ओळखल्या जातात. शुष्क उन्हाळ्यात या प्रदेशातील वृक्षांची पाने गळून पडतात म्हणून या वनांना पानझडी वने असे म्हणतात.

कमी पाऊस पडतो त्या भागात शुष्क पानझडी वने आढळतात. या भागात वृक्षांची उंची कमी असते. लहान-लहान झुडपे असतात. गवत वाढलेले असते व उष्ण व कोरड्या ऋतूत या भागात वृक्षाची पाने गळतात.

उष्ण कोरड्या हवेत बाष्पीभवन टाळण्यासाठी ही वृक्ष आपली पाने गळतात.

वनांचे प्रदेश सह्याद्रीच्या पूर्व उतार, छोटा नागपूर पठार, ओडिशा, शिवालिक पर्वतरांग, त्तराईचा प्रदेश, अंदमान बेट, महाराष्ट्रात चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा, बिहार, मध्य प्रदेश.

उदाहरण- साग, चंदन, साल, ऐबनी, अर्जुन, कुसुम, पळस, मलबेरी, महू, धूप, चिंच, अंजन, जांभूळ, खैर, आवळा, बांबू, पिंपळ, किंजल, इत्यादी

वनांचा उपयोग साग, चंदन, शिसव या वनस्पती अत्यंत महत्त्वाच्या आहेत.  पानझडी वनात सर्वात महत्त्वाची वनस्पती साग ही आहे, महाराष्ट्रात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली वनामधील वृक्ष महत्त्वाचे असून ते देशातील प्रसिद्ध वृक्षमध्ये गणना केली जाते.

चंदनापासून सुगंधी तेल, साबण, औषधी, कलाकुसरीची वस्तू तयार केली जातात.

सागवानापासून फर्निचर, इमारत, रेल्वे डबे, जहाज बांधणी साठी वापर केला जातो.

३)उष्णप्रदेशीय काटेरी वने

50 ते 75 सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशात काटेरी वनस्पती आढळतात. उष्णप्रदेशीय काटेरी वनस्पती कमी पर्जन्य असलेल्या अत्यंत विरळ व कमी उंचीचे असतात.

तसेच कमीत कमी पाने, बहुदा पाना ऐवजी काटे,मेणचट पाने, जलधारक देठ व देठावर कुच हे येथील वनस्पतींचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

वनांचे प्रदेश राजस्थानचा वाळवंटी प्रदेश, पंजाब, हरियाणा, माळवा पठार, उत्तर गुजरात, मध्य प्रदेशचा पश्चिम भाग, सातपुडा पर्वतरांगा, तामिळनाडूचा पश्चिम भाग, ओरिसा, आंध्र प्रदेश, विदर्भातील टेकड्यांचा प्रदेश इत्यादी.

वृक्षांची नावे बाभूळ, बोर, निवडुंग, शमी,सिसवी, चिंच, कोरफड, तरवळ, घायपात, कडूनिंब, केतकी, खैर, नागफणी.

वनांचे उपयोग या प्रदेशातील वनांचा वापर शेतीसाठी नांगर, बैलगाडी दोरखंड तयार करण्यासाठी, कातडी कमावण्यासाठी, इमारतीच्या बांधकामासाठी, जळाऊ लाकूड म्हणून व कोरफड सारख्या वनस्पती औषधी तयार करण्यासाठी वापरतात.

४)उपोष्ण प्रदेशीय वनस्पती

उपोष्ण प्रदेशीय वनस्पती दमा दमट हवा असलेल्या डोंगराळ भागात आढळतात. प्रामुख्याने ओक,बर्च,पाइन, चेस्टनट इत्यादी वनस्पती पूर्व हिमालयीन प्रदेशात आढळतात.

सिल्वर, हेमलॉक, फर ही वृक्ष पूर्व हिमालय प्रदेशात आढळतात. तसेच पश्चिम हिमालयात पाईन व चीर ही महत्त्वाची वृक्ष आढळतात.

)हिमालयातील समशीतोष्ण वनस्पती

कमी पावसाच्या प्रदेशात हिमालयातील समशीतोष्ण वनस्पती आढळतात. हिमालयाच्या विविध भागात आर्द्रतेच्या प्रमाणाानुसार वनस्पती विविधता असल्याचे लक्षात येते.

वनस्पतींची नावे देवदार, सीडर, सायप्रस,ओक,बीच,पइन,चीर,अलीव, इत्यादी प्रमुख वृक्ष हिमालयीन पर्वतीय भागात आढळतात.

या वनस्पतींचा उपयोग टेबल, रेल्वे डबे, खोकी, रेल्वेच्या फळ्या, पेटारे तयार करण्यासाठी केला जातो.

साधारणपणे 1500मी ते 3000 मी उंचावरील पश्चिम हिमालयात देवदार, मॅपल, चेस्टनट,वालनट,स्पृस,बर्च इत्यादी वृक्षांच्या प्रजाती आढळतात.

तर पूर्व हिमालयात 80 ते 2700 मीटर उंचीच्या प्रदेशात पॉप्युलर, ओक,  बर्च ही वृक्ष आढळतात. या भागात अति पाऊस, सौम्य उन्हाळा व कमी बाष्पीभवन होत असल्याने वृक्षाची पाने गळत नाहीत.

दक्षिण भारतातील पर्वतीय प्रदेशात या जातीची वृक्ष आढळतात. मात्र ती कमी उंचीची असतात.

६)ल्पीय वनस्पती

समुद्रसपाटीपासून सुमारे 2700 मीटर उंचीच्या प्रदेशात अल्पाइन वने आढळतात.

पूर्व हिमालय व पश्चिम हिमालयात दाट झुडपांच्या वनस्पती आढळतात. उदाहरण- सिल्वर, फर, पाइन, बर्च, ज्युनीपर इत्यादी जातीचे वृक्ष आढळतात.

७)समुद्र तटीय व दलदल प्रदेश वनस्पती

गंगा, गोदावरी, महानदी, कृष्णा इत्यादी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात खारफुटीच्या वनस्पती आढळतात.

गंगेच्या त्रिभुज प्रदेशात पश्चिम बंगाल राज्यात सुंदरी ही प्रमुख वनस्पती आढळते. त्यावरून त्या प्रदेशात सुंदरबन असे नाव देण्यात आले आहे.

जगातील सर्वात उत्तम प्रजातीच्या मॅंग्रूव्ह वनस्पतीचे भारत हे मूळ स्थान आहे.

अधिक ओलसर व दलदलीच्या प्रदेशात पेटारी, वाळूज, इंगळी इत्यादी वनस्पती आढळतात, तसेच कुमुद, सिंगाळा, नाबळी, कमळ या जल वनस्पती आढळतात. तर गंगेच्या दलदलीच्या प्रदेशात शोला, पानकीळस अशा वनस्पती आढळतात.

भारतातील वन्य प्राणी:

पंजाबचा राज्य पक्षी बाझ (गरुड) आहे.

पंजाबचा राज्य प्राणी काळवीट आहे.

आसामचा राज्यपक्षी पांढऱ्या पंखाचे कश्त बदक आहे.

बिलीगीरी रांग हि मुक्त मैदानी असून भारतातील जंगली हत्तीचे हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे वस्तीस्थान आहे.

पूर्व घाट हे आशियाई हत्तीचे जंगलातील सर्वात मोठे निवासस्थान आहे.

हिमालयात या प्राणी दूध व मांसोउत्पादनासाठी तसेच ओझी वाहण्यासाठी पाळला जातो. याचे दूध गुलाबी रंगाचे असते.

राजस्थान मधील मेंढीच्या जाती- चोकला, मारवाडी, मालपुरी, पुंगल इत्यादी शेळीच्या जाती- लोही.

हिमालयात पूर्वेकडे मॅगपाय व गाणारी कस्तुरी हे प्रमुख पक्षी आढळतात.

चोला या संकरित मेंढी पासून सर्वोत्तम प्रतीची लोकर मिळते.

राजस्थानमधील सुरतगड व बिकानेर येथे मेरिनो या मेंढीची पैदास केंद्रे आहेत.

राजस्थानच्या मैदानातील अन्य पक्षी- खरूची, गिधाड, गरुड, बहिरा ससाणा, मोर.

राजस्थानच्या वाळवंटी मैदानात सुमारे 140 जातीच्या निवासी व स्थलांतरित पक्षांचा अधिवास आहे.

भारतीय रानकोंबडा हा राजस्थान वाळवंटातील निवासी पक्ष असून येथेच त्याची पैदास होते.

राजस्थानच्या वाळवंटातील प्राणी- लाल कोल्हा, जंगली मांजर, उंट,

उंटाच्या जाती बिकानेरी व जैसलमेरी

राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात कांकरेज,नागौरी, थरपारकर, राठी या बैलांच्या उत्तम जाती आढळतात.

गंगेच्या त्रिभुज प्रदेशातील प्राणी जीवन- सुंदरवनात चितळ मोठ्या प्रमाणात आढळतात.

पक्षी- खंड्या, गरुड, सुतार पक्षी.

गंगेच्या त्रिभुज प्रदेशातील मासे- नदीतील डॉल्फिन व समुद्री डॉल्फिन.

भारतीय गेंड्यांसाठी प्रसिद्ध कांजीरंगा या आसाममधील राष्ट्रीय उद्यानात जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.

आसाम खोऱ्यातील प्राणी जीवन- सोनेरी लंगूर, कश्त बदक, बंगाल ताणमोर, पिग्मी हॉंग या धोक्यात असलेल्या प्राणी जातीचे आसाम हे आश्रयस्थान आहे.

जगात सर्वाधिक पानम्हशी आसाम मध्ये आढळतात.

भारतीय पक्षांच्या सर्वाधिक जाती आसाम मध्ये आढळतात.

आसाम मध्ये ऑर्किड पक्षी प्रसिद्ध आहे.

वाघ, हत्ती व गिबण हे आसाममधील अन्य प्राणी आहेत.

वाघ व सिंह हे दोन्ही प्राणी आढळणारा भारत हा एकमेव देश आहे.

द्वीपकल्पातील मध्यवर्ती उच्चभूमीतील प्राणी जीवन

प्राणी- आशियाई हत्ती, चारशिंगी सांबर, रानटी कुत्रा, चिंकारा.

पक्षी- सारंग, धनेश.

दख्खनच्या पठारावरील जंगलातील शेकरू खारीचे अस्तित्व धोक्यात आले असून ती महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे.

लक्षद्वीप किनाऱ्यावरील मासे तुना, शार्क, कोळंबी, कालवे. या माशाचे लोणचे चविष्ट असून त्याची निर्यात केली जाते.

पश्चिम बंगालमधील सुंदरबनात वाघ आढळतात.

लक्षद्वीप हा स्वतंत्र परिस्थितीकी प्रदेश असून तेथे जिवंत प्रवाळे, तलवार मासे, डॉल्फिन मासे आढळतात.

पश्चिम बंगाल व आसाम मध्ये एक शिंगी गेंडा आढळतो.

सौराष्ट्रातील जुनागढ-गिरच्या जंगलात सिंह आढळतात.

उंट हा प्राणी पाण्याच्या दुर्भिक्षाचा काळात स्वतःची सुमारे 27 टक्के वजन कमी करतो आणि पाणी पिल्यानंतर दहा मिनिटात पुन्हा तितकेच वजन वाढू शकतो.

ओडिशा किनाऱ्यावरील गहिरमाथा हे कासवाचे आश्रयस्थान आहे.

तामिळनाडू व केरळ मध्ये निलगिरी ताहर शेळी आढळते.

Leave a comment