महाराष्ट्राचा अतिपूर्वेकडील जिल्हा आहे. Gadchiroli Jilha गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. 26 ऑगस्ट 1982 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनातून Gadchiroli गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. विदर्भातील नागपूर या प्रशासकीय विभागातीळ हा जिल्हा आहे.
मुख्यालय – गडचिरोली
महानगरपालिका – नाही
क्षेत्रफळ – 14,412 चौकीमी.
स्थान व विस्तार – गडचिरोलीच्या पूर्वेस छत्तीसगड, पश्चिमेस चंद्रपूर जिल्हा, दक्षिण व नैऋत्येस तेलंगणा, उत्तरेस भंडारा व गोंदिया जिल्हा.
तालुके(12) – गडचिरोली, धानोरा, कुरखेडा, आरमोरी, अहेरी, एटापल्ली, चामोर्शी, सिरोंचा, मूलचेरा, भामरागड, देसाईगंज, कोर्ची.
नद्या – वैनगंगा ही प्रमुख नदी आहे. गाढवी, इंद्रावती, प्राणहिता, बांडिया.
संगमस्थळ – नरगम (सिरोंचा) (गोदावरी-प्राणहिता), सोमनुर (गोदावरी-इंद्रावती) चपराळा (वर्धा-वैनगंगा), भामरागड त्रिवेणी संगम (इंद्रावती- पामुलगौतम-पर्लकोटा).
धरण – चोविंला धरण, दिना सिंचन प्रकल्प.
नदीकाठावरील ठिकाण – सिरोंचा (गोदावरी-प्राणहिता), अहेरी (प्राणहिता).
जैव संवर्धन क्षेत्र – कोलामार्का 2013.
अभयारण्य – चपराळा (ता.चामोर्शी), भामरागड, सुधागड अभयारण्य.
खनिजसंपत्ती – लोहखानिजाने हा जिल्हा समृद्ध आहे. देऊळगाव व खुरजागड या ठिकाणी लोहखनिज आढळते. अल्लापल्ली येथे क्वार्तझ खाणी आहेत. देवलमारी व काटेपल्ली या ठिकाणी चुनखडी आढळते. आभ्रक चे साठेही गडचिरोली जिल्ह्यात आढळतात
पिके – तांदूळ (भात) हे प्रमुख पीक आहे. जिल्ह्यात शिंगाड्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. गव्हाचे प्रमाण सर्वात कमी आढळते.
डोंगरांगा व टेकड्या – चिरोली, टिपागड, सिरकोंडा, सुरजागड, भामरागड, चिकीयाला.
लेणी – मार्कंडा (ता.चामोर्शी)
गड/किल्ले – वैरागड, सुरजागड.
वने – राज्यात सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा जिल्हा गडचिरोली आहे. येथे आलापल्ली आरण्य आढळतात. या आरण्यातील सर्वात उंच वृक्ष सांग आहे. सागासाठी प्रसिद्ध असणारे आरण्य हे आलापल्ली आरण्य आहे.
मृदा – नदीच्या खोऱ्यात सुपीक मृदा व डोंगराळ भागात मुरमाड मृदा आढळते.
जंगले – महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात व त्या खालोखाल चंद्रपूर जिल्ह्यात आहे.
औद्योगिक – प्रमुख उद्योग नसल्याने या अविकसित जिल्ह्यात शासनाने “उद्योगविरहित जिल्हा” म्हणून घोषित केले आहे. देसाईगंज येथे बांबूपासून कागद निर्मिती केली जाते.
- हेमलकसा येथे बाबा आमटे यांचा कुष्ठ रुग्णांसाठी असलेला आश्रम आहे.
- “लोक बिरादरी” (हेमलकसा) हा बाबा आमटे यांचा आदिवासी विकास प्रकल्प आहे.
- वडधम येथे जीवाश्म पार्क (फॉसिल पार्क) (ता.सिरोंचा) आहे. डायनासोरसचे अवशेष सापडलेला देशातील हा पहिला पार्क आहे.
- छत्तीसगड व आंध्र प्रदेशच्या सीमेलगत वसलेल्या या जिल्ह्यात नक्षलवादी चळवळीने सातत्याने जोर धरलेला आहे.
- शुभकार्यावेळी व पिकांचे उत्पादन झाल्यावर येथील आदिवासी बांधव “रेला” नृत्य करून आनंद व्यक्त करतात.
- मार्कंडेश्वर महादेव मंदिर चामुर्शी तालुक्यात वैनगंगा नदीवर आहे. “मिनी खजुराहो” तथा “विदर्भाचे खजुराहो” अशी ओळख आहे.
- जिल्ह्यात अनुसूचित जमाती लोकसंख्या चे प्रमाण लोकसंख्येचे प्रमाण 38.67% आहे.
- एकूण लोकसंख्येच्या 89% लोक ग्रामीण भागात राहतात.
- गडचिरोली हा जिल्हा सर्वाधिक जंगलांचा जिल्हा आहे.
- गडचिरोली हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा आदिवासींचा जिल्हा आहे.
- मार्कंडा या ठिकाणी हेमाडपंथी मंदिर आहे.
- आरेमोरी या ठिकाणी शंकराचे मंदिर आहे.
- मूलचेरा या ठिकाणी पहिला शतकातील मंदिराचे अवशेष आढळतात.
- झाडापापडा येथे डोंगरातील गुहेत आदिवासींचे देवता आहेत.
- सिरोंचा येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ पर्वणीत यात्रा भरते.
- वैरागड येथे भंडारेश्वर व गोरजाईची हेमाडपंथी मंदिरे आहेत.
- वर्धा व वैनगंगा या नद्या चपराळा अभयारण्यात एकत्र येतात. यांच्या एकत्रित प्रवाह प्रवाहास प्राणहिता नदी म्हणतात.
- महाराष्ट्रात सर्वप्रथम सूर्यकिरणे पडणारा जिल्हा हा गडचिरोली आहे.
- गडचिरोली जिल्ह्यात रजिरप्पी धबधबा आहे.
- गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी हे कोशा कापडासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.
- गडचिरोली जिल्ह्यात लाकूड वाहून नेण्यासाठी इंद्रावती नदीचा वापर करतात.
- गोंडवाना विद्यापीठ (2011)गडचिरोली जिल्ह्यात आहे.
- अहेरी हे आदिवासींचे शिक्षणाचे केंद्र आहे
- गडचिरोली हा आदिवासी जिल्हा व नक्षलवाद्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
- गोंड ही येथील प्रमुख आदिवासी जमात होय.
- या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता व साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे.
- राज्यातील औद्योगिक दृष्ट्या सर्वाधिक मागासलेला जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्हा ओळखले जाते.
- शोधग्राम येथे डॉ. अभय बंग व त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग यांचे आरोग्य केंद्र आहे.