श्री Girijatmk Mandir गिरीजात्मक गणपती मंदिर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात लेण्याद्री येथे आहे. हे मंदिर अष्टविनायकापैकी एक असून अष्टविनायकातील सहावा गणपती म्हणून लेण्याद्रीचा Girijatmk Mandir गिरीजात्मक ओळखला जातो.
गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरिजा हिचा पुत्र. जुन्नर मध्ये भारतातील सर्वात मोठा बुद्ध लेणी समूह असून तिथे झालेले कोरीव काम अतिशय सुंदर आहे. यात चैत्यगृह, विहार, लेणी आहेत. यातील प्रमुख बुद्ध लेणी समूह म्हणजे लेण्याद्री बुद्ध लेणी होय. अष्टविनायकापैकी गिरीजात्मक मंदिर लेण्याद्री जवळच्या डोंगरात आहे. लेण्याद्री जवळच्या डोंगरात 30 लेण्या आहेत. त्यातील आठव्या लेणीत Girijatmk Mandir गिरिजात्मकाचे मंदिर आहे. या मंदिरामुळे या गुफांना गणेश लेणी असे सुद्धा म्हटले जाते. हा 30 बौद्ध लेण्यांचा समूह आहे.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे. मंदिरात एकही खांब नाही हे मंदिर या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य आहे. हे ठिकाण डोंगरात खोदून तयार केलेले आहे. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून, याला लेण्याद्री असे नाव पडले. खाल पासून मंदिरापर्यंत जवळपास 400 पायऱ्या आहेत. पाऱ्या चढून वर गेल्यावर प्रथम चैत्यगृहाची लेणी लागते व त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये गणपती मंदिर आहे. हे मंदिर दक्षिणाभिमुख असले तरी गणपतीची मूर्ती पुर्वाभिमुख आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामंदिरामध्ये सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत मूर्ती मंदिरातील मूर्तीवर उजेड पडत असतो.
या मंदिरासंदर्भात एक कथा आहे. पार्वती मातेने इथे श्री गणेशाची मुर्ती बनवली होती आणि त्या गणेशाच्या मूर्तीची पार्वती मातेने गणपती त्यांना पुत्र म्हणून प्राप्त व्हावा म्हणून त्यांनी बारा तपश्चर्या केली. बारा वर्षानंतर श्री गणेश पार्वती मातेच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन, भाद्रपद महिन्यात प्रकट झाले.
गणेशाची मूर्ती लेणीच्या भिंतीत स्वयंभू प्रकट झालेली आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. या मूर्तीची सोंड डावीकडे आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत. मूर्तीची नाभी व कपाळ हिरे जडित आहेत. डोंगरात कोरलेले हे मंदिर अखंड अशा एकाच दगडात कोरलेले आहे. त्यामुळे इथे प्रदक्षिणा करता येत नाहीत. मंदिरासमोर पाण्याची दोन कुंडे आहेत. इथे मुख्य सभामंडप असून त्याला लहान खोल्या आहेत. भाविक इथे बसून ध्यान करू शकतात. मंदिरात जाण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून परवानगी आणि सशुल्क पास उपलब्ध होतो.
या मंदिरात दररोज सकाळी पंचामृत पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी साजरी केली जाते.उत्सवाच्या दरम्यान बैलगाड्यांची शर्यत लावली जाते. हा उत्सव माघ प्रतिपदा त माघ षष्टी पर्यंत साजरा केला जातो. या महिन्यात मंदिरात अखंड हरीनाम साप्ताह आयोजित केला जातो.