Irrigation projects पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना दिलेल्या पूरक पाण्याला व औद्योगिक क्षेत्रास वापरल्या जाणाऱ्या पाण्याला जलसिंचन असे म्हणतात.

धरणे, तलाव यातून कालव्याद्वारे किंवा अन्य मार्गाने मिळणारे पाणी, नद्यांमधील पाणी, भुगर्भातील पाणी इत्यादी स्त्रोतांमधील पाणी सिंचनासाठी वापरले जाते.

भारतातील 450 जिल्ह्यांपैकी 44 जिल्ह्यात मध्ये बागायती क्षेत्र आहे. या जिल्ह्यांमधून देशाच्या अन्नधान्य उत्पादनापैकी सुमारे 50% उत्पादन होते.

पाण्याच्या वितरण व्यवस्थेनुसार विचार केला तर जगात भारताचा पाचवा क्रमांक लागतो व जलसिंचनाखाली असलेल्या क्षेत्राचा विचार केला तर भारत देशाचा जगात पहिला क्रमांक आहे.

जलसिंचनाचे उद्देश:

१.आपल्याकडील पाऊस हा मोसमी असल्यामुळे इतर ऋतूंमध्ये पिके घ्यायची असेल तर त्यासाठी पाणी उपलब्ध करून देणे.

२.एका वर्षात एकापेक्षा जास्त पिके यशस्वीपणे घेणे.

३.नगदी पिके घेण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करणे.

४.हेक्टरी उत्पादन जास्त मिळण्यासाठी योग्य पद्धतीने जलसिंचन करणे. ५.खात्रीपूर्वक आणि पुरेसे पाणी उपलब्ध करून शेती ,व्यवसाय व उद्द्योगधंदे  करणे.

क्र.जलसिंचन प्रकल्पराज्य
1भाक्रा-नांगल प्रकल्पहिमाचल प्रदेश, पंजाब
2हिराकुड प्रकल्पओडिशा
3उकाई प्रकल्पगुजरात
4नागार्जुन प्रकल्पतेलंगणा
5चंबळ प्रकल्पराजस्थान, मध्यप्रदेश
6तिहरी प्रकल्पउत्तराखंड
7रिहांद प्रकल्पउत्तर प्रदेश
8काक्रापरा प्रकल्पगुजरात
9उजनी प्रकल्पमहाराष्ट्र
10अलमटी प्रकल्पकर्नाटक
11कोयना प्रकल्पमहाराष्ट्र
12मयुराक्षी प्रकल्पपश्चिम बंगाल
13रामगंगा प्रकल्पउत्तराखंड
14दामोदर प्रकल्पझारखंड, पश्चिम बंगाल
15फरक्का प्रकल्पपश्चिम बंगाल
16कोसी प्रकल्पबिहार
17तुंगभद्रा प्रकल्पआंध्र प्रदेश, कर्नाटक
18नर्मदा प्रकल्पमध्य प्रदेश, गुजरात
19जायकवाडीमहाराष्ट्र केरळ
20मुचकुंदी प्रकल्पआंध्र प्रदेश. ओडिशा
21भद्रा प्रकल्पकर्नाटक
22घटप्रभा प्रकल्पकर्नाटक
23तवा प्रकल्पमध्य प्रदेश
24शरावती प्रकल्पकर्नाटक
25कृष्णराज प्रकल्पकर्नाटक
26मलप्रभा प्रकल्पकर्नाटक
27गंडक प्रकल्पभारत, नेपाळ
28धोम प्रकल्पमहाराष्ट्र
29पेरियार प्रकल्पमहाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *