Jagatil Saat Khand : जगातील सात खंड

Jagatil Saat Khand समुद्राने वेढलेल्या विस्तृत भूप्रदेशास खंड असे म्हणतात. जगात एकूण सात खंड आहेत. आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्टिका, युरोप, ऑस्ट्रेलिया.

युरोप व आशिया खंड सोडला तर बाकी सर्व खंडांच्या चारही बाजूने पाणी आहे.

1)आशिया

आशिया खंड हा जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा खंड आहे व आशिया खंड हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला खंड आहे. जगातील 60% लोकसंख्या आशिया खंडात राहते. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 29.8% भाग आशिया खंडाने व्यापला आहे. आशिया खंडाचे क्षेत्रफळ 44,579,000चौकीमी आहे.

आशिया खंडाच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला पॅसिफिक महासागर आहे. बऱ्याच प्राचीन संस्कृती चा उदय आशिया खंडात झाला. हिंदू, बौद्ध, जैन, इस्लाम, ख्रिश्चन, पारसी, सिख इत्यादी धर्मांचा उदय देखील याच खंडात झाला आहे. आशिया खंडात एकूण 50 देशांचा समावेश आहे.

2)आफ्रिका

आफ्रिका खंड हा क्षेत्रफळाने व लोकसंख्येने आशिया यानंतरच्या दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. आफ्रिका खंडाने पृथ्वीचा २०.३ टक्के भाग व्यापला आहे. आफ्रिका खंडाचे एकूण क्षेत्रफळ 32,215,000 चौकिमी आहे.

आफ्रिकेतील हवामान मोठ्या प्रमाणावर उष्णकटिबंधीय आहे. परंतु, दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील भागात समशीतोष्ण हवामान आहे. आफ्रिका हा मानव जातीचा पाळणा मानला जातो कारण आतापर्यंत सापडलेले होमो सेपियन्स चे सर्वात जुने जीवाश्म आफ्रिकन खंडाच्या पूर्वेकडील ठिकाणाहून आलेले आहेत.

आफ्रिकेच्या आग्नेयेला हिंदी महासागर, पश्चिमेला अटलांटिक महासागर, ईशान्येला लाल समुद्र आणि सुएझ कालवा आणि उत्तरेला भूमध्य समुद्र आहे. आफ्रिका खंडात एकूण 56 देशांचा समावेश आहे.

3)उत्तर अमेरिका

उत्तर अमेरिका हा सर्वात मोठा तिसरा खंड आहे. या खंडात सरकार मान्यता प्राप्त स्वतंत्र देशाची संख्या 23 आहे. या खंडाने पृथ्वीचा 16% भाग व्यापलेला आहे. या खंडाचे क्षेत्रफळ 24,710,000 चौकिमी आहे.जगातील सर्वात आर्थिक शक्तिशाली देश या खंडात आहेत.

उत्तर अमेरिकेच्या पूर्वेला अटलांटिक महासागर, उत्तरेला आर्क्टिक महासागर, पश्चिम आणि दक्षिणेला पॅसिफिक महासागर आणि आग्नेयेला कॅरिबियन समुद्र आणि दक्षिण अमेरिका यांनी वेढलेला आहे.

4)दक्षिण अमेरिका

दक्षिण अमेरिका हा सर्वात मोठा चौथा खंड आहे. दक्षिण अमेरिकेचे क्षेत्रफळ 17,840,000 चौकिमी आहे. हा खंड क्षेत्रफळाच्या दृष्टीने चौथा तर लोकसंख्येने पाचव्या क्रमांकावर आहे. या खंडात 15 देशांचा समावेश आहे. 15 देशापैकी 12 देश स्वतंत्र आहेत. या खंडाचा 30% भाग घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. तसेच हा खंड आर्थिक स्थितीतही संपन्न आहे.

दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला पॅसिफिक महासागर, पूर्व आणि उत्तरेला अटलांटिक महासागर आणि उत्तर पश्चिम बाजूला कॅरिबियन समुद्र आणि उत्तर अमेरिका आहे. जगातील सर्वात मोठा धबधबा दक्षिण अमेरिकेत आहे. ॲमेझॉन नदी जी आकारमानाच्या दृष्टीने जगातील सर्वात लांब आणि सर्वात मोठी नदी मानली जाते ती देखील दक्षिण अमेरिका या खंडात आहे.

5) अंटार्क्टिका

हा खंड येथील इतर सर्व खंडांपैकी अधिक थंड कोरडा सर्वात उंच खंड आहे. या खंडात प्रचंड वारे वाहतात. या खंडाचे क्षेत्रफळ 14,425,000 चौकिमी आहे. या खंडाचा 98% पृष्ठभाग हा बर्फाच्छादित आहे. या खंडावर देश नाहीत किंवा कायमस्वरूपी राहणारे व्यक्ती नाहीत. या खंडात अनेक देशांचे संशोधक काही व कालावधीसाठी संशोधनासाठी राहण्यासाठी येतात.या खंडामध्ये भारताने 1989 मध्ये “मैत्री” हे स्थानक बांधले आहे.

6)युरोप

हा जगातील सहाव्या क्रमांकाचा खंड आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने युरोप हा जगातील दुसरा सर्वात लहान तर लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खंड आहे. या खंडाचे क्षेत्रफळ 10,180,000 चौकिमी आहे. या खंडात 51 देशाचा समावेश होतो.

युरोप खंडाच्या दक्षिणेला मध्य समुद्र, पश्चिमेला अटलांटिक महासागर, उत्तरेला आर्क्टिक महासागर आहे. युरोप प्रामुख्याने पाश्चात्त्य संस्कृती, सभ्यता आणि औद्योगिक क्रांतीच्या आगमनाशी जोडलेले आहे. जगाच्या दृष्टीने सर्वात विकसित देश या खंडात आहेत.

7)ऑस्ट्रेलिया किंवा ओशनीया

हा जगातील सातवा आणि सर्वात लहान खंड आहे. याचे क्षेत्रफळ 9,08,458 चौकिमी आहे. जगातील सर्वात कमी लोकसंख्या या खंडात आढळते. या खंडात 14 देशांचा समावेश आहे.

Leave a comment