Kevalproyogi avyay-केवलप्रयोगी अव्यय:

आपल्या अंतकरणातील भावनांचा अचानक स्फोट होऊन तोंडावाटे काही उद्गार बाहेर पडतात, त्या अविकारी अव्ययांना केवलप्रयोगी अव्यय-Kevalproyogi avyay असे म्हणतात.

केवलप्रयोगी अव्यय नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येतात. ती वाक्याचा भाग नसतात. ते वाक्यातील स्वतंत्र उद्गार असतात.

केवलप्रयोगी अव्ययानंतर नेहमी उद्गारवाचक चिन्हाचा उपयोग केला जातो.

उदाहरण-

वा!, आहाहा!, अरेरे!, हाय!

केवलप्रयोगी अव्ययाचे नऊ प्रकार पडतात.

1)हर्षदर्शक किंवा आनंददर्शक केवलप्रयोगी अव्यय:

आनंद व्यक्त करताना जी केवलप्रयोगी अव्यय आपण वापरतो, त्यांना हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण-

वावा, वा, वाहवा, अहाहा.

वाहवा ! किती सुंदर फुल आहे.

वावा! काय गाणे आहे.

अहाहा! किती छान मंदिर  आहे .

वा! काय स्वदिष्ट जेवण आहे.

अहा ! किती मोठा डोंगर हा !

ओहो ! सगळीकडे पाणीच पाणी आहे.

2)शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय:

दुःख व्यक्त करण्यासाठी जी केवलप्रयोगी अव्यय वापरली जातात, त्यांना शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण-

अरेरे, आईग , हायहाय, देवारे.

अरे अरे ! फार वाईट झाले.

आईग! पायात काटा रुतला.

देवारे! सर्वाना आशीर्वाद दे.

हाय हाय ! काय केलंस तू.

3)आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय:

एखाद्या गोष्टीचे आश्चर्य वाटल्यानंतर आपण जे केवळ प्रयोगी अव्यय वापरतो, त्यांना आपण आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण-

अबब, बापरे, अरेच्चा, आ, ओहो, चकचक.

अबब ! केवढा मोठा समुद्र .

अरेच्चा! तु शर्यतीत जिंकलास .

बापरे ! किती उंच डोंगर आहे.

४)प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय:

कौतुक करण्यासाठी किंवा प्रशंसा करण्यासाठी जे केवलप्रयोगी अव्यय वापरतात, त्यांना प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण-

शाब्बास, छान, ठीक, फक्कड, खास.

वाहवा ! काय मधुर गाणे आहे.

शाब्बास ! तु जिंकलास .

छान! तुझे हस्ताक्षर खूप छान आहे.

५)संमतीदर्शक केवलप्रयोगी अव्यय:

एखाद्या गोष्टीला परवानगी देण्यासाठी जे केवलप्रयोगी अव्यय वापरतो त्याला आपण संमतीदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतो.

उदाहरण-

जी, हा, जिहा, ठीक, अच्छा, बराय,

बराय ! काळजी घे.

ठीक! तु उद्या शाळेत जा.

अच्छा ! तु घरी जा.

६)तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय:

एखाद्या गोष्टीबद्दल तिरस्कार दाखवण्यासाठी आपण जे केवळ प्रयोगी अव्यय वापरतो, त्याला आपण तिरस्कार दर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतो.

उदाहरण-

छी छी, शी:, ऊह, हूड, ईश्य.

शि! काय घाणेरडा वास येत आहे.

हूड ! मी नाही खाणार.

७)संबोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय:

जे केवलप्रयोगी अव्यय कोणालातरी संबोधण्यासाठी किंवा बोलवण्यासाठी वापरतो त्याला संबोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण-

अरे, रे, अहो, अग, ए.

आग ! ऐकलस का.

ब! असे करून कसे चालेल.

ए ! चल लवकर.

८)मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय:

आपल्या मनाची मौन भावना दर्शिवनाऱ्या अविकारी शब्दांना  मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे  म्हणतात.

उदाहरण-

चूप, चीप, चुपचाप, गप, गुपचूप.

गप! थोडाही आवाज करू नको.

चूप ! अभ्यास कर.

चुपचाप! कोणी तरी येत आहे.

९)विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय:

एखाद्या गोष्टीला नकार दर्शवण्यासाठी जे केवलप्रयोगी अव्यय वापरतो त्याला आपण विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात .

उदाहरण-

जे, हट, अह , च, छे.

अह! तु खेळायला जाऊ नको.

छे  ! मला नाही आवडत ते.

Leave a comment