Khandeshwari Mandir खंडेश्वरी मंदिर हे बीड जिल्ह्यात आहे. बीड येथील खंडेश्वरी मंदिर हे संपूर्ण बीड वासियांचे ग्रामदैवत आहे. खडकाळ डोंगरावर हे मंदिर आहे. मंदिराचा परिसर जवळपास आठ एकरचा आहे. Khandeshwari Mandir खंडेश्वरी देवीचे दगडी बांधकामाचे आकर्षक मंदिर आहे. नवसाला पावणारी देवी अशी भक्तांची श्रद्धा आहे. मार्गशीर्ष महिना व नवरात्री उत्सवाच्या दरम्यान हा परिसर भक्तांनी गजबजलेला असतो. बीड वासियांचं ग्रामदैवत असणारी Khandeshwari Mandir खंडेश्वरी माता चक्क दगडातून प्रकट झाली.
नवसाला पावणारी देवी म्हणून परिसरात खंडेश्वरी मातेची ख्याती असून येथे नवरात्रात मोठी यात्रा भरते. बीड शहरातील खंडोबा मंदिराच्या टेकडीच्या बाजूला दक्षिणाभिमुख खंडेश्वरी मातेचे प्राचीन मंदिर आहे. मंदिर प्रकारात असून सभामंडप व गर्भग्रह अशी मंदिराची रचना आहे. गर्भग्रहात एका चौथ्यावर खंडेश्वरीचा शेंदूर लावलेला तांदळा आहे.
हे मंदिर काळोजी नावाच्या धनगराने बांधले असे सांगितले जाते. खंडेश्वरी मातेच्या प्राचीन मंदिराचा जिर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला. जागृत देवस्थान असलेल्या खंडेश्वरी देवी संदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात. एका मेंढपाळाने रेणुका मातेची मनोभावे पूजा केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या रेणुका मातेने वर माग म्हणून सांगितले तेव्हा, देवी तू माझ्यासोबत चल असं मेंढपाळ म्हणाला. देवी म्हणाली मी तुझ्यासोबत नाही मात्र, मी तुझ्या पाठीमागे येते. पण तू परत फिरून पाहायचं नाही. ज्या ठिकाणी तू परत फिरून पाहशील त्याच ठिकाणी मी राहील असं मेंढपाळाला रेणुका मातेने सांगितले. मेंढपाळ चालत असताना देवी खरंच आपल्या पाठीमागे आली का? हे पाहण्यासाठी त्याने मागे वळून पाहिले तेव्हा, वचनाचा भंग केला म्हणून देवी बीड शहराच्या उत्तरेस याच ठिकाणी थांबली. वचनभंग झाला आणि सेवेत खंड पडला म्हणून खंडेश्वरी असं या देवीचा नाव आहे.
नवरात्र उत्सवात मोठ्या संख्येने जिल्हाभरातून भाविक खंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येतात. नऊ दिवस मंदिरात विविध कार्यक्रम साजरे होतात.नवरात्र उत्सवात मंदिरात खूप मोठी यात्रा भरते.