खंडोबा मंदिर जेजुरी

जेजुरीचे Khandoba Mandir खंडोबा मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पैकी एक आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे आहे. हे स्थळ पुरंदर तालुक्यात आहे. या मंदिराला जेजुरी गड, Khandoba Mandir खंडोबाची जेजुरी असे सुद्धा म्हणतात. हे मंदिर खंडोबा ला समर्पित असलेले प्रसिद्ध मंदिर आहे ज्याला मल्हारी मार्तंड किंवा मार्तंड भैरव असेही म्हणतात.

या खंडोबा मंदिरात खंडोबा आणि त्यांची पत्नी म्हाळसा यांची मूर्ती आहे. तसेच खंडोबाची अश्वारूढ मूर्ती आहे. जेजुरी गड हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. लाखो भक्तीचे श्रद्धास्थान आहे. येथे भाविक हळद, नारळ यांचा भंडारा हवेत आणि देवावर उधळतात.

उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु आता जेजुरी या ठिकाणी नव्याने बांधलेले मंदिर आहे. तेही तीन शतकांपूर्वी बांधलेले मंदिर आहे.

पौराणिक कथेनुसार खंडोबा हा भगवान शिवाचा अवतार आहे. ज्याने मणी आणि मल्ल या राक्षसांचा नाश करण्यासाठी हे रूप धारण केले होते. याबाबत अशी कथा आहे की, मणी आणि मल्ल या प्रदेशात दहशत निर्माण करत होते आणि देवतांनी मदतीसाठी भगवान शिवाकडे आराधना केली. भगवान शिवाने खंडोबाला स्वतःच्या उर्जेतून निर्माण केले आणि त्याला दैवी शस्त्रांचा आशीर्वाद दिला. खंडोबा ने राक्षसांशी भयंकर युद्ध केले आणि शेवटी त्यांचा पराभव केला.

जेजुरी मंदिर हे स्थापत्य कलेचा चमत्कार आणि पूजनीय तीर्थक्षेत्र आहे. मूळ मंदिर तेराव्या शतकाच्या सुमारास यादव राजवटीत बांधले गेले असे मानले जाते. मंदिराच्या वास्तूमध्ये गुंतागुंतीचे कोरीवकाम, दगडी शिल्प आणि खंडोबाच्या जीवनातील विविध प्रसंग दर्शवणारी सुंदर चित्रे आहेत.

हे खंडोबाचे मंदिर एका टेकडीवर आहे. सुमारे 200 पायऱ्या चढून वर गेल्यावर मल्हारी मार्तंडाचे म्हणजे खंडोबाचे दर्शन होते. वाटेत जाताना बाणाबाई खंडोबाची दुसरी पत्नी यांचे मंदिर लागते. नऊ लाख पायरीचा डोंगर असेही या देवस्थानाच्या डोंगरास म्हटले जाते. मंदिरासमोर दगडी दीपमाळा आहेत. हे मंदिर अतिशय सुंदर आहे. सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. खंडोबाची मूर्ती येथे घोड्यावरील योद्धा म्हणून दाखवली आहे त्याच्या हातात एक मोठा चाकू आहे तो राक्षसांना मारण्यासाठी तयार आहे. मंदिरात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो. उंच धरून तलवार जास्तीत जास्त वेळ उचललेली ठेवणाऱ्या व्यक्तीला बक्षीस देण्याची पद्धत आहे. दसऱ्याच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. तसेच सोमवती अमावस्येला ही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.

देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच्या वरच देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाच्या आणि पितळी पत्राचे बनवलेले मोठे कासव आहे. यावर भंडारा व खोबरे उधळण्याची प्रथा आहे. “चांगभलं खंडोबाचा येळकोट येळकोट जय मल्हार” असा जयघोष करीत या भंडाऱ्याची उधळण होते. तळी भरणे हा एक विधी असतो. ताटात खोबरे व भंडारा घेऊन पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यावी व मग खोबऱ्याची उधळण करावी. पिवळ्या धमक रंगाने न्हालेली मार्तंडाची जेजुरीला सोन्याची जेजुरी असेही म्हणतात. हे मंदिर काळ्या  दगडापासून बनलेले आहे

खंडोबा हे एक ज्वलंत देवता आहे जिची कठोर नियमानुसार पूजा केली जाते. जेजुरी येथे मल्ल आणि मणी यांच्यावर झालेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी सहा दिवसाची यात्रा भरते. मार्गशीष महिन्यात ही यात्रा भरते. शेवटचा दिवस चंपाषष्ठी म्हणून ओळखला जातो आणि तो उपवासाचा दिवस असतो. रविवार आणि पौर्णिमा हे दिवस खंडोबाच्या उपासनेसाठी चांगले दिवस मानले जातात.

संपूर्ण मंदिरात दगडाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो केलेला आहे. हे मंदिर हेमांडपंथी पद्धतीने उभारण्यात आले आहे. या देवतेला हळद, फळे आणि फुले व्यतिरिक्त बकरीचे मांस अर्पण केले जाते. हे मंदिर दरवर्षी हजारो यात्रेकरूंना आकर्षित करते, जे पराक्रमी खंदोबाचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येतात.

Leave a comment