Kriyavisheshan avyay-क्रियाविशेषण अव्यय:

क्रिये  विषयी विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय-Kriyavisheshan avyay असे म्हणतात. क्रिया केव्हा, कधी ,कितीवेळा घडली हे सांगणारे अविकारी शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय होय.

उदाहरणार्थ-

कधीकधी, नेहमी, वारंवार, आज ,मागून, भरभर, पटकन, थोडा, सकाळी इत्यादी.

क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार

अ) अर्थावरून पडणारे क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार

१)कालवाचक क्रियाविशेषण अव्यय

 कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय 

एखादे क्रियाविशेषण  एखादी क्रिया कोणत्या वेळी घडली हे दाखवत असेल तर त्याला कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय  असे म्हणतात.

 उदाहरण – 

मी उद्या शाळेत जाईल .

काल रात्री खूप पूस पडला.

वरील उदाहरणामध्ये उद्या,रात्री हि कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय  आहेत.

सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय:

वाक्यातील एखदी क्रिया सतत घडत असल्याचा बोध होत असेल तर त्याला आपण

 सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो.

 उदाहरण – 

काल दिवसभर पाऊस पडत होता.

नेहा हमेशा अभ्यास करते.

वरील उदाहरणामध्ये  दिवसभर ,हमेशा हि  सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय  आहेत.

आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय:

जर एखाद्या वाक्यातील क्रिया पुन्हा पुन्हा घडत असेल असे जो शब्द दाखवतो त्याला  आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.

उदाहरण-

तो वारंवार प्रश्न विचारत होता.

गाय पुन्हा पुन्हा दारात येते.

तो दररोज अभ्यास करतो.

 वरील उदाहरणामध्ये वारंवार,पुन्हा पुन्हा,दररोज  हि  आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत.

२) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय

 एखादा शब्द जर एखादी क्रिया घडण्याची स्थळ किंवा जागा दाखवत असेल तर,त्याला  स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात .

उदाहरण-

तो खाली बसला.

तो रोडच्या पलीकडे उभा आहे.

वरील उदाहरणामध्ये खाली व पलीकडे हि  स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत.

 स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय

जी क्रियाविशेषण अव्यय एखाद्या वाक्यातील क्रियेची स्थिती दाखवतात ,त्यांना आपण  स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो.

उदाहरण-

माझा चेंडू झाडाच्या पलीकडे गेला.

राजा माझ्या मागे उभा राहिला.

 वरील उदाहरणामध्ये   पलीकडे व मागे हि स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत.

 गतीदर्शक क्रियाविशेषण अव्यय

एखद्या वाक्यातील क्रिया गतीने घडण्याचा अर्थबोध झाला तर ,त्याला आपण  गतीदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो.

उदाहरण-

राजा कुत्र्याला पाहून दूर पळाला.

चेंडू तिकडून वेगाने आला.

 वरील उदाहरणामध्ये दूर व तिकडून हि  गतीदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत.

३) रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय

एखाद्या क्रियेची रीत दाखवणाऱ्या क्रियाविशेषण अव्ययाला  रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

 प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय

वाक्यातील क्रिया कशाप्रकारे घडली हे दाखवणाऱ्या  शब्दाला प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदाहरण-

 कासव सावकाश चालते.

हरीण जलद धावते.

वरील उदाहरणामध्ये सावकाश व जलद हि   प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय  आहेत.

अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय 

जर एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या क्रियेचे अनुकरण केले आहे असे दाखवले असेल तर त्याला अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय  असे म्हणतात.

उदाहरण-

नेहा पटपट चालते .

नेहा पटकन उठून गेली .

वरील उदाहरणामध्ये  पटपट , पटकन हे अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय  आहे.

निश्चयदर्शक क्रियाविशेष अव्यय 

जर एखादी क्रिया निश्चितपणे घडते असे सांगितले जाते तेव्हा त्यास निश्चयदर्शक क्रियाविशेष अव्यय  असे म्हणतात.

उदाहरण-

तु उद्या नक्की पास होणार.

वरील उदाहरणामध्ये नक्की हे निश्चयदर्शक क्रियाविशेष अव्यय  आहे.

४)संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्य

एखादी कोणत्या प्रमाणात घडली हे दाखवणाऱ्या शब्दाला संख्यावाचक किंवा परिमाण वाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय

एखद्या वाक्यातील क्रिया जर एखद्या संखेच्या रुपात घडली असे दाखवतात तेव्हा त्याला  संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदाहरण-

तो दोनदा वर्गात गेला.

राजा चारदा झाडावर चढला.

मी राजाच्या दीडपट पेरू खाल्ले .

वरील उदाहरणामध्ये दोनदा ,चारदा ,दीडपट हि संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत.

अधिक्यवाचक क्रियाविशेषण अव्यय

एखद्या वाक्यातील क्रिया अधिक प्रमाणात घडली असे दाखवणाऱ्या शब्दाला अधिक्यवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदाहरण-

मी भरपूर पाणी पिलो.

राजाने पुष्कळ पैसे कमावले.

वरील उदाहरणामध्ये  भरपूर, पुष्कळ हि अधिक्यवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत.

 पर्याप्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय

एखाद्या वाक्यातील क्रिया पर्याप्त आहे अशी जर क्रिया घडली सेल तर त्याला आपण  पर्याप्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदाहरण-

मला हि जागा पुरेसी आहे.

हि चप्पल माझ्या बेताची आहे .

वरील उदाहरणामध्ये  पुरेसी,बेताची  हि  पर्याप्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत.

श्रेणीवाचक क्रियाविशेषण अव्यय

जे क्रियाविशेषणे एखादी श्रेणी दाखवतात त्यांना आपण  श्रेणीवाचक क्रियाविशेषण अव्यय  असे म्हणतो.

उदाहरण-

मी रांगेत क्रमाने पाचवा होतो.

वरील उदाहरणामध्ये  क्रमाने हे श्रेणीवाचक क्रियाविशेषण अव्यय  आहे.

अपकर्षवाचक   क्रियाविशेषण अव्यय

कमीपणा दाखवणाऱ्या शब्दाला  अपकर्षवाचक   क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदाहरण-

तो अत्यंत दु:खी आहे.

राजा बिलकुल खोटे बोलत नाही .

वरील उदाहरणामध्ये अत्यंत,बिलकुल हि अपकर्षवाचक   क्रियाविशेषण अव्यय आहेत.

५) प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय

का,ना,केव्हा,कोठे,कसे

६)निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय

न ,ना

ब) स्वरूपावरून पडणारे क्रीयाविशेषण अव्ययाचे प्रकार

१)साधित सिद्धक्रीयाविशेषण अव्यय

जे  शब्द मुळातच क्रीयाविशेषण असतात त्यांना  सिद्धक्रीयाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदाहरण-

मागे,पुढे ,येथे ,तेथे, आज इत्यादी.

तो कुठे गेला.

तु पुढे चल.

आम्ही येथे थांबतो.

२)साधित क्रीयाविशेषण अव्यय

नाम ,विशेषण ,क्रियापद ,शब्दयोगी अव्यय यांच्यापासून झालेल्या क्रीयाविशेषणांना , साधित क्रीयाविशेषण अव्यय असे म्हणतात.

नामसाधीत: रात्री, सकाळी, व्यक्तिश, वस्तूत:, दिवसा,

सर्वनामसाधीत: त्यामुळे, कित्येकदा, यावरून,

विशेषणसाधीत: मोठयाने, एकदा, इतक्यात, एकत्र.

धातुसाधीत: हसू, हसत, हसतांना, पळतांना, खेळतांना

अव्ययसाधीत: कोठून, इकडून, खालून, वरून.

प्रत्यय सधीत: शास्त्रदृष्ट्या, मन:पूर्वक, कालानुसार.

उदा. 

तो रात्री आला.

सर्वांचे मन:पूर्वक आभार .

तिने सर्व रडून सांगितले.

नेहा  हसतांना छान दिसते.

डोंगरावरून  वरून पाणी पडत  होते.

आम्ही एकत्र अभ्यास करतो.

तो कित्येकदा खोटे बोलतो.

३)सामासिक क्रीयाविशेषण अव्यय

काही जोड शब्द किंवा समाजीज शब्द क्रीयाविशेषण अव्ययाचे काम करतात त्यांना )सामासिक क्रीयाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदाहरण-

 गावोगाव, गैरहजर, गैरकायदा, दररोज, प्रतिदिन, रात्रंदिवस, समोरासमोर, घरोघर, यथाशक्ती, आजन्म, हरघडी इत्यादी.

आज राजा वर्गात गैरहजर आहे.

चोराच्या शोधात पोलिस गोवोगाव फिरले.

मी  दररोज शाळेत जातो .

विधार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात.

Leave a comment