Latur Jilha : लातूर जिल्हा

Latur Jilha लातूर जिल्हा हा छ. संभाजीनगर प्रशासकीय विभागात येतो. आग्नेय महाराष्ट्रात मराठवाडा विभागातील हा जिल्हा आहे. 16 ऑगस्ट 1982 ला धाराशिव जिल्ह्याचे विभाजन करून Latur Jilha लातूर हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला.

मुख्यालय – लातूर

महानगरपालिका – लातूर

क्षेत्रफळ – 7157 चौकीमी

स्थान विस्तार – पूर्वेस व अग्नेयस कर्नाटकातील बिदर जिल्हा, ईशान्य व पूर्वेस नांदेड जिल्हा, पश्चिम व दक्षिणेस उस्मानाबाद जिल्हा, उत्तरेस परभणी जिल्हा, वायव्येस बीड जिल्हा.

तालुके(10) – लातूर, अहमदपूर, औसा, उदगीर, चाकूर, निलंगा, रेणापूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ, जळकोट.

नद्या – मांजरा, तेरणा, तावरजा, लेंडी, मन्याड.

धरण – जलसिंचन प्रकल्प मांजरा, मान्याड (ता. अहमदपूर), तेरणा, तावरजा.

नदीकाठावरील ठिकाण – लातूर (मांजरा), उजनी (तेरणा)

तलाव – तावरजा, धरणी

लेणी – खरोसा लेणी (ता.औसा)

खनिजे – बांधकामासाठी लागणारा दगड.

पिके – जिल्ह्यात ऊस, ज्वारी, सोयाबीन, कापूस इत्यादी पिके घेतली जातात.

मृदा – मांजरा नदीच्या खोऱ्यात सुपीक मृदा आढळते.

वने – सर्वात कमी वनक्षेत्र असणारा जिल्हा लातूर आहे.

  • लातूर येथे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे उपकेंद्र आहे.
  • लातूर येथे जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, महानगरपालिका, सूतगिरण्या, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तेलगिरण्या, मराठवाड्याची बाजारपेठ आहे.
  • तेलबिया व सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन घेणारा जिल्हा लातूर आहे.
  • लातूर पॅटर्न शैक्षणिक केंद्र म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. लातूर पॅटर्नमुळे शैक्षणिक क्षेत्रात फार मोठी क्रांती घडून आली आहे.
  • लातूर येथे सिद्धेश्वर मंदिर, रत्नेश्वर मंदिर, केशव बालाजी  मंदिर व जैन मंदिर आहे.
  • तूर या पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र असणारा जिल्हा लातूर आहे.
  • लातूर शहरात गंजगोलाई मध्यवर्ती व्यापारी पेठ आहे. येथे जगदंब माता मंदिर आहे.
  • लातूर येथे सुरत शहावली दर्गा आहे.
  • पुरातन काळात लातूरला सत्यपूर, श्रीपुर, रत्नापुर नावे होती. कालांतराने त्याचा लोप होऊन लातूर हे नाव पडले. पेशवाई मध्ये “लातूरी नाणे” चलनात होते.
  • मांजरा नदी ही लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी आहे.
  • लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे 30 सप्टेंबर 1993 साली भूकंप झाला होता.
  • उदगीर, औसा येथे भुईकोट किल्ला आहे.
  • उदगीरचा तह इतिहास प्रसिद्ध आहे.
  • रेणापूर येथील रेणुकामाता मंदिरातील हलती दीपमाळ प्रसिद्ध आहे.
  • औसा तालुक्यातील खरोसा येथील 12 लेण्या प्रसिद्ध आहेत. खरोसा हे गाव हिंदू व बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे.
  • देवणी येथे जनावरांचा बाजार आहे.
  • लातूर शहरास पाणीपुरवठा करणारी धरणे – धनेगाव धरण, साई व नागझरी बंधारे.
  • 2016 च्या दुष्काळावेळी मिरज येथून “जलविद्युत एक्सप्रेस” या रेल्वेद्वारे लातूर शहरास पाणीपुरवठा करण्यात आला.
  • निलंगा येथे नीलकंठेश्वर मंदिर व स्वयंभू शिवलिंग आहे.
  • उदगीर येथे उदगीर बुवांची समाधी आहे.
  • औसा येथे मल्लिनाथ महाराज मठ आहे. औरंगजेबने बांधलेली मशीद आहे व येथे संत कवी जीवनदास यांचा जन्म झाला होता.
  • उजनी येथे नाथ संप्रदायी गणेशनाथ यांची समाधी आहे.
  • उदगीर तालुक्यात हत्तीबेट येथे प्रसिद्ध दत्त मंदिर आहे.
  • लातूर हे मराठवाड्याचे विद्येचे माहेरघर आहे.
  • लातूर येथे वनस्पती तुपाचा कारखाना आहे.
  • निलंगा येथे दूध शीतकरण केंद्र आहे.
  • देवणी जातीची गाय व वळू लातूर येथे प्रसिद्ध आहे.
  • चाकूर तालुक्यातील वडवळ येथील टेकडीवर औषधी वनस्पती मिळतात म्हणून या टेकडीस “वडवळ बेट” म्हणतात.
  • चाकूर येथे “साई नंदनवन” हे पर्यटन स्थळ आहे.
  • लातूर जिल्ह्यातील दोन पुनरुज्जीवीत नद्या मुदगल व चार्णी या आहेत.
  • लातूर आणि नांदेड मध्ये बोलली जाणारी बोलीभाषा ही “गोल्ला बोली” आहे.
  • सूर्यफुलाच्या उत्पादनात आशिया खंडात लातूर जिल्ह्याचा पहिला क्रमांक आहे.
  • लातूर जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नाही
  • लातूर जिल्ह्यातील देवणी, शिरूर-अनंतपाळ व जळकोट हे 3 तालुके 26 जून 1999 पासून अस्तित्वात आली.
  • खाद्यतेलाच्या बाबतीत भारतामध्ये लातूर जिल्हा आघाडीवर आहे..

Leave a comment