महाराष्ट्र राज्याचा प्रशासकीय कारभार चालवण्यासाठी योग्य कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी घटनात्मक राज्य लोकसेवा आयोगाची Maharashtra public service commission निर्मिती करण्यात आली.

भारतीय संविधानाच्या कलम 315 नुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची MPSC स्थापना करण्यात आली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी इत्यादी वर्ग 1, वर्ग 2 व वर्ग 3 पदे भरली जातात.

1 एप्रिल 1937 मध्ये मुंबई-सिंध प्रांत लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली.

1947 मध्ये मुंबई लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली.

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) स्थापना करण्यात आली.

स्वसुखनीर भिलाष: विध्यते लोकहितो हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे घोषवाक्य आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय मुंबई येथे आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची निवड राज्यपालाद्वारे केली जाते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालाकडे देतात.

अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल सहा वर्षाचा असतो.

अध्यक्ष व सदस्य यांचे निवृत्ती वय 65 वर्ष आहे.

कलम 317 नुसार राज्यपाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांना पदावरून दूर करू शकतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष एस. पी. थोरात होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदांसाठी निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा-

राज्यसेवा परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ‘अ’ परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ‘ब’ परीक्षा, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ सर्व स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा, सहाय्यक अभियंता विद्युत श्रेणी 2, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट ब, पोलीस उपनिरीक्षक परीक्षा, विक्रीकर निरीक्षक परीक्षा, कर सहाय्यक गट ‘क’ परीक्षा, सहाय्यक परीक्षा लिपिक, टंकलेखक परीक्षा इत्यादी.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते. 1. पूर्व परीक्षा 2. मुख्य परीक्षा 3 मुलाखत

पूर्व परीक्षा ही 400 गुणांची असते. यामध्ये 200 गुणांची दोन पेपर असतात. पेपर एक व पेपर दोन मध्ये मिळून पास झाल्यावर मुख्य परीक्षा देता येते.

मुख्य परीक्षा दुसरा टप्पा म्हणजे मुख्य परीक्षा ही परीक्षा 800 गुणांची असते. यामध्ये प्रत्येकी चार पेपर असतात. प्रत्येक पेपर हा 150 गुणांचा असतो. तसेच मराठी व इंग्रजी या भाषा विषयावर प्रत्येकी 100 गुणांचे दोन पेपर असतात.

मुलाखत शेवटचा व तिसरा टप्पा म्हणजे मुलाखत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग उमेदवाराची पात्रता

वयाची 19 वर्षे पूर्ण झालेला कोणताही शाखेचा पदवीधर उमेदवार राज्यसेवा परीक्षा देऊ शकतो.

खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्ष 38 पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव गटातल्या विद्यार्थ्यांना वय वर्ष 43 पर्यंत ही परीक्षा देता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *