Moreswar mandir मोरेश्वर मंदिर हे पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथील गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा Moreswar mandir मयुरेश्वर ओळखला जातो.
येथील मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून ते बहमणी काळात बांधले गेले आहे. गावाच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराला चारही बाजूंनी मनोरे आहेत. देवळाच्या बाजूने 50 फूट उंचीची संरक्षण भिंत आहे, असे मानले जाते की पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पाद माजवला होता. त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयुरावर (मोरावर) आरूढ होऊन येथे सिंधू असूराचा वध केला. त्यामुळे गणपतीला येथे मयुरेश्वर असे नाव पडले. या गावातील मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात. या मंदिरात मयुरेश्वरा बरोबर रिद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात, ब्रह्मदेवाने दोन वेळा या मयुरेश्वराची मूर्ती बनवली आहे पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधू सुराने तोडली म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली ती सध्याची मयुरेश्वराची मूर्ती.
मोरगाव हे कऱ्हा नदीच्या काठावर वसलेले आहे. या मंदिराभोवती उंच तटबंदी असून मंदिर उत्तराभिमुख असून मंदिराला भव्य नगारखाना आहे. अष्टविनायक मंदिरामध्ये हे सर्वात महत्त्वाचे देऊळ असून, याला चार प्रवेशद्वार आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे. हे मंदिर उत्तराभिमुख असून त्यास 50 फूट उंचीचा तटबंदी आहे. मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा असून, भव्य सभामंडप व गाभारा असे दोन भाग आहेत. गाभाऱ्यात गणेशाची शेंदुराची डाव्या सोंडेची मूर्ती आहे. या मंडपावर एक शिलालेख असून तो दुर्लक्षित असून तो झिजला आहे. मंदिराच्या खालच्या दीपमाळे समोर मंडपात पायात लाडू घेऊन भला मोठा सहा फूट उंचीचा उंच दगडी उंदीर आहे. मंदिरात प्रवेश करताच दगडी उंदीर आणि भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते. गणपती समोर त्याचं वाहन उंदीर समोर पाहिजे, पण येथे गणपती समोर नंदी आहे. नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपतीसमोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे. उंदीर आणि नंदी हे मंदिराचे जणू पहारेकरी आहेत. या देवळातील स्वयंभू गणपतीची सोंड ही डावीकडे वळलेली असून गणपतीच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे जडवलेले आहेत. या मूर्तीवर नागाचे संरक्षक छत्र आहे. मंदिरात रिद्धी आणि सिद्धी यांच्या सुद्धा मुर्त्या आहेत.
मोरगावचे श्री मयुरेश्वर मंदिर हे अष्टविनायकापैकी प्रमुख मंदिर आहे. असे म्हटले जाते की मोरगाव हे नाव मोरावर पडल्याची कथा देखील आहे. त्यानुसार, एक काळ होता जेव्हा ही जागा मोरांनी भरलेली होती. गाव पुण्यापासून 80 किलोमीटर अंतरावर कर्हा नदीच्या काठावर आहे.
माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी या दोन दिवशी भक्त मोठ्या प्रमाणावर मयुरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. या दोन्ही दिवशी चिंचवड येथे संत मोरया गोसावी यांनी स्थापलेल्या मंगलमूर्ती मंदिरातून भक्तगण पालखी घेऊन येतात. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दहा दिवसात मयुरेश्वराच्या मंदिरात जत्रा भरते. विजयादशमी आणि सोमवती अमावस्या हे दिवस सुद्धा साजरे केले जातात