प्रशासकीय दृष्ट्या Mumbai Shahar मुंबई शहर हा जिल्हा कोकण विभागात आहे. Mumbai Shahar मुंबई शहर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रगत जिल्हा आहे.
मुंबई शहर हे सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. मुंबई, माझगाव, परळ, वरळी, माहीम, मोठा कुलाबा, धाकटा कुलाबा ही सात बेटे आहेत.
मुख्यालय – मुंबई फोर्ट
क्षेत्रफळ – 157 चौकीमी.
महानगरपालिका – बृहन्मुंबई (1888)
स्थान व विस्तार – मुंबईच्या पूर्वेस, पश्चिमेस व दक्षिणेस अरबी समुद्र आहे. उत्तरेस मुंबई उपनगर आहे.
प्रमुख ठिकाणे – मुंबई विद्यापीठ, राज्याचे उच्च न्यायालय, गेट वे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहारा विमानतळ, फिरोजशहा मेहता उद्यान, तारापोरवाला मत्स्यालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, नेहरू विज्ञान भवन, सिद्धिविनायक मंदिर, जिजामाता उद्यान, भायखळा(राणीचा बाग) इत्यादी ठिकाणी मुंबईत आहेत.
- मुंबई शहर हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे व सर्वाधिक दाट लोकसंख्येचा जिल्हा आहे.
- मुंबई शहर या जिल्ह्यात एकही तालुका नाही.
- 1990 मध्ये बृहन्मुंबई जिल्ह्याच्या विभाजनातून मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती झाली (मुख्यमंत्री शरद पवार).
- मुंबई शहर हे महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक आर्थिक राजधानी आहे.
- मुंबई शहरास दक्षिण मुंबई, जुनी मुंबई, Island City या नावानर ओळखले जाते.
- मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत. या जिल्ह्यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम ही लागू नाही.
- राजाबाई टॉवर मुंबई शहरात आहे.
- मुंबई शहर हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे