व्यक्ती ,स्थळ, वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांना जे नाव दिलेले असते ,त्यांना नाम Naam असे म्हणतात.
शब्दांच्या जातीतील संख्येने सर्वाधिक असणारी शब्द जाती म्हणजे नाम Naam होय.
उदाहरणार्थ.
मोर, गणेश, चेंडू, लाडू, हिमालय ,गंगा, नदी, झाड इ.
नामाचे एकूण तीन प्रकार आहेत.
- सामान्य नाम-Naam
- विशेष नाम
- भाववाचक नाम
अ)सामान्य नाम-Naam
एका जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिलेले असते, त्या नावास सामान्य नाम असे म्हणतात.
सामान्य नामाचे अनेकवचन होते.
सामान्य नाम परंपरेने रुढीने किंवा व्यवहाराने मिळते. कोणत्याही भाषेत सामान्य नामाची संख्या इतर नामापेक्षा जास्त असते.
उदाहरणार्थ
घर ,ग्रह, तारा, माणूस,नदी, शहर, मंदिर, इमारत, झाड, पुस्तक, पेन इत्यादी
- पुस्तक छान आहे .
- मुलगा उभा आहे.
- तारा चमकत आहे.
सामान्य नामाचे एकूण दोन प्रकार पडतात.
- १.पदार्थवाचक नाम
- २.समूहवाचक नाम
पदार्थवाचक नाम
जे घटक शक्यतो लिटर, मीटर, किंवा किलोग्रॅम मध्ये मोजले जातात किंवा संख्येत मोजले जात नाहीत त्या घटकांच्या नावांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात.
उदाहरणार्थ –
तांबे, कापड, पीठ, प्लास्टिक, पाणी, सोने, चांदी ,तेल इत्यादी
- भांड्यात दोन लिटर दुध आहे.
- डब्यात पाच किलो पीठ आहे.
समूहवाचक नाम
समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम असे म्हणतात.
उदाहरणार्थ- जुडी, ढिगारा ,संघ,गट ,कुटुंब ,वर्ग इत्यादी
- मैदानात क्रिकेटचा संघ आहे.
- मातीचा ढिगारा आहे.
ब)विशेष नाम
ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एकाच विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो ,तेव्हा त्याला विशेष नाम असे म्हणतात.
ते फक्त एका घटका पुरते मर्यादित असते .विशेष नाम एक वचनी असते .विशेष नाम हे प्रामुख्याने ठेवलेले नाम असते. विशेष नामे एक तत्व सुचक असून बरेच लेखक त्यांना निरर्थक नामे मानतात कारण दिलेले नाव व व्यक्तीचे गुण यांच्यात बऱ्याचदा तफावत असते.
उदाहरणार्थ- गोदावरी, रमेश, औरंगाबाद, ताजमहल, सूर्य, चंद्र इत्यादी
- गोदावरी नदी आहे.
- औरंगाबाद मोठे शहर आहे.
विशेष नाम व्यक्तिवाचक असते तर सामान्य नाम जातीवाचक असते.
उदाहरणार्थ – निखिल (व्यक्तिवाचक) ,मुलगा (जातिवाचक)
क)भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम
ज्याला स्पर्श करता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुण ,अवस्था व कृती यांच्या नावांना भाववाचक नाम असे म्हणतात .हे घटक वस्तू रुपात दाखवता येत नाहीत .गुणधर्म व भाव दर्शवणाऱ्या शब्दांना भाववाचक नामे किंवा धर्मवाचक नामे म्हणतात. विशेष नावे व सामान्य नावे ही भाव व धर्म धारण करतात म्हणून त्यांना धर्मीवाचक नामे म्हणतात . भाववाचक नामाचे अनेकवचन होत नाही..
उदाहरणार्थ- सौंदर्य, श्रीमंती, गर्व, मनुष्यत्व, चांगुलपणा ,संपन्नता ,माणुसकी, मोठेपणा ,लबाडी इत्यादी.
- राजा एक चांगला खेळाडू आहे.
- स्वराला खूप माणुसकी आहे.
- रामला पैशाचा कसलाही गर्व नाही.
भाववाचक नामांचे तीन प्रकार पडतात.
- स्थितीदर्शक
- गुणदर्शक
- कृतीदर्शक