Nagapur Jilha :  नागपूर जिल्हा

Nagapur Jilha नागपूरचे स्थान राज्यात पूर्वेकडे व देशात मध्यवर्ती आहे, म्हणून त्याचा उल्लेख  “झिरो माइल” असा करतात. प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने (रामटेक) पुनीत झालेला Nagapur Jilha नागपूर हा विदर्भातील जिल्हा व प्रमुख प्रशासकीय विभाग आहे.

जिल्हा व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय – नागपूर

क्षेत्रफळ – 9892 चौकिमी.

महानगरपालिका – नागपूर.

स्थान व विस्तार – नागपूरच्या पूर्वेस भंडारा, दक्षिणेस चंद्रपूर, नैऋत्य व पश्चिमेस वर्धा, वायव्यस अमरावती जिल्हा, उत्तरेस मध्य प्रदेशची सीमा (छिंदवाडा, सिवनी जिल्हे) .

तालुके(14) – नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, काटोल, कामठी, कळमेश्वर, कुही, रामटेक, हिंगणा, नरखेड, पारशिवनी, सावनेर, मौदा, उमरेड, भिवापूर.

नद्या – कन्हान ही प्रमुख नदी आहे. इतर नद्या पेंच, कोलार, नाग, सांड, जांब, वर्धा.

संगमस्थळ कामठी (कन्हान – पेंच), कलोल (वर्धा – जांब)

पेन्स पेंच नदीवर तोतलाडोह पेंस नदीवर जलाशय मेघदूत सागर

नदी काठावरील ठिकाण – नागपूर(नाग), कामठी(कन्हान), रामटेक (सुर), सावनेर(कोलार), कळमेश्वर (नाग).

धरणे – पारशिवनी तालुक्यात पेंच नदीवर महाराष्ट्र-मध्य प्रदेश यांचा “पेंच प्रकल्प” आहे. पेंच नदीवर तोतलाडोह धरण  (जलाशय मेघदूतसागर).

अभयारण्य – पेंच राष्ट्रीय अभयारण्य, मानसिंगदेव अभयारण्य.

प्रमुख पिके – कापूस, गहू, ज्वारी, तेलबिया.

फळपीके – नागपूरची संत्री जगप्रसिद्ध आहे.

तलाव – गोरेगाव, मांगेवाडी, तोतलाडोह, पांढरवाडी, अंबाझरी, सनीघाट, खिंडसी, रामसागर, अंबाझरी.

लेणी – मनसर, अडम, अंभोरा, पुल्लर.  

गड किल्ले – भिवगड, रामटेक, सीताबर्डी, नगरधन, अडण.

नगरधन हा भुईकोट किल्ला आहे.

खनिजसंपत्ती – कामठी, उमरेड येथे दगडीकोळशाच्या खाणी आहेत. रामटेक, सावनेर येथे मॅगेनीज साठे तसेच अभ्रक हे खानिज आढळते.

औद्योगिक

  • वाडी व अंबाझरी येथे युद्ध उपयोगी संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना आहे.
  • कन्हान येथे कागद गिरणी कारखाना, कामठी येथे मॅगेनीज शुद्धीकरण कारखाना व  हातमाग व यंत्रमाग उद्दयोग आहे.
  • बुटीबोरी येथे आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे.
  • खापरखेडा व  कोराडी येथे औष्णिक प्रकल्प आहे.
  • उमरेड येथे नियोजित अणुविद्युत प्रकल्प आहे.

शैक्षणिक – संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर (स्थापना 4 ऑगस्ट 1923), महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ नागपूर (स्थापना 3 डिसेंबर 2000).

नागपूर जिल्ह्यातील प्रमुख मानांकित संस्था – महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था.

  • नाग नदीच्या काठी असलेल्या या शहराला नाग नदीवरून नागपूर हे नाव पडले. हे शहर मराठा राजवटीत भोसल्यांच्या राजधानीचे शहर होते.
  • 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार करून दीक्षा घेतली. हे जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे धर्मांतर होय. याच स्थळाला दीक्षाभूमी म्हणून ओळखले जाते.
  • अठराव्या शतकाच्या प्रारंभी गौडराज बख्त बुलंद यांनी नागपूर शहराची स्थापना केली.
  • नागपूर शहर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
  • राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे भरते.
  • नागपूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे.
  • काटोल येथे राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र आहे.
  • नागपूर येथे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय आहे.  
  • मोगरकसा हे  संवर्धन राखीव क्षेत्र  आहे.
  • रामटेक येथे कालिदासांनी “मेघदूत” लिहिले. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ येथे आहे. रामटेक येथे महाकवी कालिदास यांचे स्मारक आहे.
  • नागपूर या शहरात टायगर कॅपिटल ऑफ इंडिया (भारताची व्याघ्र राजधानी) तसेच ऑरेंज सिटी (संत्री नगरी) असे म्हणतात.
  • सप्टेंबर 2016 मध्ये नागपूर हा महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा बनला.
  • नागपूर हे भारताचे दुसरे हरित शहर आहे.
  • नागपूरचा “मारबत महोत्सव” प्रसिद्ध आहे.
  • अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर (लीकार्पण 11 डिसेंबर 2022)
  • 4 फेब्रुवारी 2004 रोजी नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला.
  • नागपूर विद्यापीठाचे नामकरण संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असे करण्यात आले.
  • कामठी येथे सैनिकी शिक्षण देणारे विद्यालय आहे.
  • कामठी येथे ड्रॅगन पॅलेस हे बौद्ध धम्म मंदिराचे अतिशय देखणी वास्तू असणारे मंदिर आहे. हे मंदिर “ड्रॅगन पॅलेस” म्हणून ओळखले जाते.
  • अंभोरा येथील चैतन्येश्वराचे व हरिहर स्वामींचे मंदिर प्रसिद्ध आहे.
  • कळमेश्वर संत्री व मिरचीच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.
  • भिवापूर मिरचीच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.
  • पंडित जवाहरलाल नेहरू (पेंच) राष्ट्रीय उद्यान रामटेक तालुक्यात आहे. 2011 मध्ये याला उत्तम नियोजन पुरस्कार भेटला होता.
  • रामटेक हे थंड हवेचे ठिकाण आहे

Leave a comment