Palghar Jilha : पालघर जिल्हा

Palghar Jilha पालघर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील एक जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून 1 ऑगस्ट 2014 मध्ये Palghar Jilha पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली व महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा म्हणून निर्माण झाला.

मुख्यालय – पालघर

क्षेत्रफळ – 9344 चौकिमी.

स्थान व विस्तार – कोकण विभागाच्या उत्तर भागास पालघर जिल्हा आहे. पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगा व पश्चिमेकडे अरबी समुद्राच्या किनारपट्टी दरम्यान पालघर जिल्हा पसरला आहे. पूर्व व ईशान्य दिशेस ठाणे व नाशिक जिल्हा, उत्तरेस गुजरात राज्यातील बलसाड जिल्हा व दादरा व नगर हवेली उत्तरेकडील दमन व दीव केंद्रशासित प्रदेश आहेत.

तालुके(8) – जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई-विरार, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा. 

महानगरपालिका(1) – वसई-विरार

नगरपालिका(3) – डहाणू,पालघर,जव्हार

पिके – भात हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे.

नद्या – वैतरणा ही पालघर मधील मुख्य नदी आहे. व पिंजल, सूर्या, दहेर्जा, तानसा नद्या व दक्षिणेस उल्हासनगर नदी खोरे आहेत.

खाड्या – दांतीवरा(वैतरणा), वसई(उल्हास), डहाणू.

पुळन(beach) –डहाणू, उड्डान(ता.पालघर), केळवा(ता.पालघर), शिरगाव, सातपाटी.

पर्यटन स्थळे – जव्हार (पालघरचे महाबळेश्वर), डहाणू येथील महालक्ष्मी मंदिर, शितलादेवी मंदिर, विरारची जीवदानी देवी.

समुद्र किनारे – केळवा बीच, माहीम बीच, डहाणू-बोर्डी बीच, अर्नाळा बीच.

किल्ले – वसई किल्ला, अर्नाळा सागरी किल्ला(ता.वसई), तारापूर किल्ला, केळवा किल्ला, शिरगाव किल्ला.

गरम पाण्याचे झरे – दांतीवरे (ता.पालघर), कोकनेर (ता.पालघर), गणेशपुरी(ता.वसई)

अभयारण्य –  तुंगारेश्वर पक्षी अभयारण्य (ता.वसई 2003), तानसा अभयारण्य (ता.वाडा 1970)

धबधबे – वाघोबा धबधबा व हिरडपाडा धबधबा. वसई येथे चिंचोटी धबधबा, जव्हार येथे लेंडी नदीवरील दाभोसा धबधबा, कासारऱ्याजवळ विहिगाव धबधबा.

धरणे – वांद्री धरण (वांद्री नदीवर), मनोर धरण

खनिजे – तुंगार टेकड्यावर बॉक्साईट सापडतात.

पालघर जिल्ह्यात तारापूर येथे भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे.

तानसा येथे तानसा नदीवर जलसिंचन प्रकल्प(1892) आहे.

पालघर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात सागरी किनारा लाभला असून या भागात मासेमारी केली जाते.

पालघर येथे अभियांत्रिकी व औषधनिर्मिती कारखाना आहे.

सातपाटी येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मासेमारी केंद्र आहे.

वसई, डहाणू, भाईंदर याठिकाणी मिठागरे आहेत. 

पालघर येथे मासेमारीचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे.

डहाणू तालुका चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

पालघर जिल्ह्यातील वारली पेंटींग प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्रातील पालघर हा एकमेव जिल्हा आहे ज्याची सीमा राज्य व केंद्रशासित प्रदेश यांना लागते.

प्रादेशिक गवत संशोधन केंद्र पालघर येथे आहे.

जव्हारला आदिवासींचा गवळीपाडा म्हणतात.

डहाणू येथील गुलाबांच्या बागा प्रसिद्ध आहेत.

नालासोपारा येथे बौद्धस्तुप आहे.

Leave a comment