भारतीय संसद
- भारताच्या केंद्रीय कायदेमंडळाला संसद किंवा पार्लमेंट Parlment असे म्हणतात.
- राष्ट्रीय पातळीवरील केंद्रशासन यंत्रणेच्या किंवा संघ शासन व्यवस्थेच्या कायदेमंडळास “संसद” Parlment असे म्हटले जाते.
- संसद हा शब्द फ्रेंच भाषेतून घेतला आहे.
- ब्रिटनला “संसदेची जननी” असे म्हटले जाते.
- संसद ही लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती यांनी मिळून तयार होते.
- भारतीय राज्यघटनेच्या कलम 79 नुसार भारताच्या संघराज्यासाठी एक संसद असून त्यात लोकसभा(कलम 81) व राज्यसभा(कलम 80) या दोन सभागृहांसोबत राष्ट्रपतींचाही (कलम 52) समावेश असतो.
- भारतीय संसदेचे एकूण तीन भाग आहेत.
- लोकसभा(कलम 81)
- राज्यसभा (कलम 80)
- राष्ट्रपती (कलम 52)
- संसदेत दोन सभागृह आहेत. लोकसभा व राज्यसभा.
- राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ अथवा द्वितीय सभागृह आहे.
- लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ अथवा प्रथम सभागृह आहे.
- राष्ट्रपती संस्थेचा अविभाज्य असा घटक आहे मात्र, तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सभासद नसतो.
- राष्ट्रपती हे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य नसतात मात्र, ते लोकसभा विसर्जित करतात व संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर अभिभाषण देतात.
- घटनाकारांनी राज्यसभेला स्वयंसिद्ध दर्जा बहाल केला आहे.
- कलम 99 नुसार संसदेच्या प्रत्येक नवनियुक्त सदस्यास राष्ट्रपतींकडून पदग्रहणाची शपथ दिली जाते.
- भारताने संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केलेला आहे.
- घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार संसदेला आहे.
- लोकलेखा समिती संसदेमार्फत सरकारवर नियंत्रण ठेवते.
- भारतीय संसदेत भाषण केलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष :
- डी. डी. आईजनहावर – 1959
- जिमी कार्टर – 1978
- बिल क्लिंटन – 2000
- बराक ओबामा – 2010
- संसदेचे अधिवेशन :
- अर्थसंकल्पीय अधिवेशन – फेब्रुवारी ते मे
- पावसाळी अधिवेशन – जुलै ते सप्टेंबर
- हिवाळी अधिवेशन – नोव्हेंबर ते डिसेंबर
- संसदेकडून खालील तीन मुख्य कार्य पार पाडले जातात.
- कायदा तयार करणे
- मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवणे
- घटना दुरुस्ती किंवा संविधान दुरुस्ती करणे
Post Comment