पंतप्रधानांचे अधिकार व कर्तव्य

पंतप्रधान हे मंत्रिमंडळाचे अध्यक्ष (प्रमुख) असतात. Powers of the Prime Minister

पंतप्रधान हे निती आयोग, राष्ट्रीय विकास परिषद, राष्ट्रीय लोकसंख्या आयोग यांचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

पंतप्रधान हे देशाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रवक्ते मानले जातात.

पंतप्रधान मंत्र्यांमध्ये खाते वाटपाचे कार्य करतात.

पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतात.

पंतप्रधान हा राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांना साधणारा दुवा आहे.

पंतप्रधान मंत्र्यांना बडतर्फ करण्याची शिफारस करतात.

संसदेत सरकारच्या वतीने महत्त्वाच्या घोषणा पंतप्रधान करतात.

पंतप्रधानांचा पदावर असताना आकस्मिक मृत्यू झाल्यास मंत्रिमंडळ बरखास्त होते.

पदव्या देणे– व्यक्तींच्या गुणांची कदर करून त्यांना भारतरत्न, पद्मविभूषण यासारख्या पदव्या देण्याचा अधिकार पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळास आहे.

पंतप्रधानांचा सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणजे ते राष्ट्रपतीस लोकसभेचे विसर्जन करण्यास भाग पाडू शकतात.

पंतप्रधान त्यांच्या मंत्रिमंडळात दुसऱ्या पक्षातील खासदारांची मंत्रीपदी निवड करू शकतात.

उदाहरण- पंडित नेहरू यांनी त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पक्ष-शेड्युल्ड कास्ट फेडरेशन) व डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी (पक्ष-हिंदू महासभा) यांना मंत्रिपदी संधी दिली होती.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा नेता या नात्याने पंतप्रधानांना पुढील अधिकार असतात- Powers of the Prime Minister

केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर मंत्री राष्ट्रपतींकडून पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून नियुक्त केले जातात. राष्ट्रपती केवळ अशाच व्यक्तींची नियुक्ती मंत्री म्हणून करू शकतो. ज्यांच्या नावांची शिफारस पंतप्रधानांनी केलेली असते.

पंतप्रधान मंत्र्यांमध्ये खातेवाटप करतात. तसेच त्यात आवश्यकतेनुसार बदल करतात.

पंतप्रधान एखाद्या मंत्र्याला राजीनामा देण्यास सांगू शकतात व त्याने त्यानुसार राजीनामा न दिल्यास राष्ट्रपतींना त्याला मंत्रिपदावरून दूर करण्याचा सल्ला देऊ शकतात.

राष्ट्रपती संदर्भात-

पंतप्रधान हे राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून कार्य करतात.

महत्त्वाच्या पदांच्या नेमणुकांबाबत पंतप्रधान राष्ट्रपतींना सल्ला देतात. उदाहरणार्थ भारताचा महान्यायप्रतिनिधी, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य, निवडणूक आयुक्त, वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्य वगैरे.

राष्ट्रपती संघराज्याच्या कारभाराचे प्रशासन व विधानाचे प्रस्ताव याबाबतची माहिती मागतील ती पुरवणे.

संसदेच्या संदर्भात-

संसदेचे अधिवेशन भरवणे आणि स्थगित करणे या संदर्भात राष्ट्रपतींना सल्ला देणे.

कोणत्याही क्षणी लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला राष्ट्रपतींना देणे.

सभागृहामध्ये शासनाची धोरणे जाहीर करणे.

इतर अधिकार व कार्य-

पंतप्रधान हे नियोजन आयोग, राष्ट्रीय विकास परिषद ,राष्ट्रीय एकात्मता परिषद, आंतरराष्ट्रीय परिषद, राष्ट्रीय जलसंपदा परिषद या आयोगाचे व परिषदांचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात.

देशाचे स्थानिक तसेच परराष्ट्रीय धोरण आखण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणे.

केंद्र शासनाच्या प्रमुख प्रवक्ता म्हणून कार्य पाहणे.

आणीबाणीच्या काळात राजकीय स्तरावर आपत्ती प्रमुख व्यवस्थापक म्हणून कार्य करणे.

राष्ट्राचा प्रमुख नेता यांना नात्याने विविध स्तरातील लोकांना भेटणे, त्यांच्या समस्या व इतर बाबी संदर्भात त्यांच्याकडून निवेदने स्वीकारणे.

सत्ताधारी पक्षाचा नेता म्हणून कार्य करणे.

सर्व शासकीय सेवांचा राजकीय प्रमुख ही भूमिका पार पडणे.

पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो.

Leave a comment