Rivers in India : भारतातील नद्या व त्यांच्या उपनद्या

Rivers in India भारताच्या प्राकृतिक रचनेत मोठ्या प्रमाणात विविधता असल्यामुळे उगम पावणाऱ्या नद्यांचे प्रमुख दोन भाग पडतात.

1.हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या

2.भारतीय पठारावर उगम पावणाऱ्या नद्या

1.हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या

हिमालयीन नद्या बारमाही नद्या आहेत. यांच्या अपक्षरण कार्यामुळे “V” आकाराची दरी, खोल घळई, धबधबे, द्रुतप्रवाह ही भूरूपे तयार होतात.

भूगर्भ संशोधकांच्या मते हिमालयीन नद्या हिमालयाहूनही जुन्या आहेत.

भारताच्या उत्तरेला असणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या हिमालयीन पर्वतात उगम पावणाऱ्या नद्यांचे दोन भाग पडतात.

    १)अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या 

    २)बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या

अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या (पश्चिम वाहिनी नद्या)-

उदा- सिंधू, सतलज, झेलम, रावी, चिनाब, बियास, झास्कर, गिलगिट.

सिंधू नदी

सिंधू ही भारतीय उपखंडातील प्रमुख नद्या असून ती सर्वाधिक लांबीची आहे.

सिंधू ही आंतरराष्ट्रीय नदी असून ती भारत, पाकिस्तान व तिबेट या तीन देशातून वाहते.

सिंधू नदीचा उगम मानस सरावाराच्या उत्तरेस होतो.

कैलास पर्वतावर सिंधू नदीची एकूण लांबी 2900 किलोमीटर आहे. सिंधू नदीची भारतातील लांबी 800 किलोमीटर आहे.

सिंधू नदीच्या प्रवाहाची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे.

सिंधू नदीच्या उपनद्या- चिनाब, रावी, बियास, सतलज, झेलम, शोक, झास्कर, शिंगार, काबुल, गिलगिट या आहेत.

नंगा पर्वताला वळसा घालून सिंधू नदी जम्मू-काश्मीर राज्यातून पाकिस्तान देशात प्रवेश करते.

सप्टेंबर 1960 च्या सिंधू पाणी वाटप करारानुसार सिंधू खोऱ्यातील फक्त २०% पाणी भारत वापरू शकतो. हे पाणी पंजाब, हरियाणा ही राज्य तसेच दक्षिण व पश्चिम राजस्थानमध्ये सिंचनासाठी वापरली जाते.

सियाचीन, बल्तोरो, हिस्पार या हिमालयाच्या काराकोरम भागातील प्रमुख हीमनद्यांमुळे सिंधू नदीला वर्षभर पाणी असते.

सतलज नदी

सतलज ही सिंधु नदीची प्रमुख उपनदी असून ती हिमालयातील राकस सरोवरात उगम पावते.

सतलज नदी ही हिमाचल प्रदेश व पंजाब या राज्यातून वाहते.

सतलज नदी शिप्किला खिंडीतून भारतात हिमाचल प्रदेशात प्रवेश करते. हिमाचल प्रदेश व पंजाब मधून वाहत पाकिस्तानात सिंधूला मिळते.

सतलज नदीवर “भाक्रा-नानगल” ही देशातील सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना असून भाक्रा (हिमाचल प्रदेश) नानगल (पंजाब).

भाक्रा धरणात साठलेल्या जलाशयास “गोविंद सागर” असे म्हणतात. सतलज नदी चिनाब नदीमध्ये विलीन होते.

झेलम नदी जम्मू-काश्मीर राज्याच्या सीमा भागातून वाहते.

रावी नदी हिमाचल प्रदेश राज्यातून वाहते.

झेलम, रावी, चिनाब, बियास या नद्या हिमालयात उगम पावतात.

झेलम नदी उलर सरोवरातून वाहते.

सिंधू नदी पाकिस्तान देशात कराची शहराजवळ अरबी समुद्रात मिळते.

बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या (पूर्ववाहिनी नद्या):

उदा- गंगा, ब्रह्मपुत्रा, यमुना, कोसी, रामगंगा, घागरा, गोमती, गंडक इत्यादी.

गंगा नदी

गंगा नदी भारतातील सर्वाधिक लांबीची प्रमुख नदी आहे.

गंगा नदीचा उगम पश्चिम हिमालयात गंगोत्री येथे होतो.

गंगा नदीची लांबी 2525 किलोमीटर इतकी आहे. गंगा नदीच्या मैदानी प्रदेशाने भारतातील 23% लोकसंख्या सामावून घेतली आहे.

गंगा नदी आपले नाव देवप्रयाग येथे प्राप्त करते जेथे भागीरथी (उगम- गंगोत्री) व अलकनंदा (उगम-बद्रीनाथ) या दोन नद्यांचा संगम होतो. त्या अगोदर अलकनंदा रुद्रप्रयाग येथे मंदाकिनीला (उगम-केदारनाथ) मिळते.

अलकनंदा व भागीरथी नद्यांच्या एकत्र प्रवासाला गंगा असे म्हणतात.

उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या पाच राज्यातून गंगा नदी वाहते.

दक्षिण पश्चिम दिशेकडून गंगा नदी उत्तराखंड राज्यात हरिद्वार शहराजवळ पर्वतीय प्रदेशातून खाली उतरते.

गंगा ही आंतरराष्ट्रीय नदी असून ती भारत व बांगलादेशातून वाहते.

गंगा नदीच्या उपनद्या रामगंगा, गोमती, घागरा, गंडक, कोसी, महानंदा, यमुना, शोण.

गोमती, घागरा, गंडक, कोसि या उपनद्या गंगा-यमुना संगमाच्या आधी गंगेस मिळतात. यांच्या गाळामुळे पंखाकृती मैदाने तयार होतात,

शोण नदी दक्षिणेकडून वाहत येऊन बिहार राज्यात गंगेस मिळते. बंगालच्या उपसागरास मिळताना गंगेच्या मुखाशी मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण झाला असून असंख्य वितरिकांमध्ये तिचे पाणी विभागले जाते. गंगा खोऱ्याचा विस्तार देशातील 10 राज्यात झालेला आहे.

यमुना ही गंगेची प्रमुख उपनदी असून ती उत्तर प्रदेश राज्यात अलाहाबाद शहराजवळ गंगेला मिळते. तर गांजीपूर शहराजवळ गोमती गंगेला मिळते. पुढे बलिया शहराजवळ घागरा गंगेत विलीन होते तर बिहारमध्ये पटना शहराजवळ शोण गंगेत विलीन होते.

गंगा नदीचे खोरे देशातील प्रथम क्रमांकाचे खोरे असून या खोऱ्याने देशाचा 25% भाग व्यापला आहे.

नदीकाठची शहरे हरिद्वार, कानपूर, अलाहाबाद, पटना, भागलपुर, वाराणसी, कोलकत्ता, बक्सार, मुंगेर, मुर्शिदाबाद इत्यादी.

पश्चिम बंगाल राज्यात गंगा नदीचा एक मुख्य प्रवाह बांगलादेशात प्रवेश करतो. तर गंगेच्या एका प्रवाहास हुगळी असे म्हणतात. हुगळी नदीचा प्रवाह कोलकत्ता शहराजवळ बंगालच्या उपसागरात वितरिकाच्या स्वरूपात बंगालच्या उपसागरात विलीन होतो.

गंगा नदी प्रवाहमुळे पश्चिम बंगाल राज्यात बंगालच्या किनाऱ्यालगत विस्तीर्ण असा सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे.

दामोदर ही हुगळी नदीची उपनदी आहे.

डिसेंबर 2008 मध्ये भारत सरकारने गंगा नदीस राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केले.

यमुना नदी

यमुना ही गंगेची प्रमुख उपनदी असून तिचा उगम हिमालयात यमुनोत्री येथे होतो.

यमुना ही उत्तराखंड व उत्तर प्रदेश राज्यातून वाहते.

यमुना नदीची लांबी 1376 किलोमीटर आहे.

उपनद्या गिरी, असम, चंबळ, बेतवा, सिंद, केन, या नद्या माळवा पठारावर उगम पावतात व पुढे यमुनेस मिळतात.

नदीकाठची शहरे- दिल्ली, मथुरा, आग्रा, हमिरपूर, अलाहाबाद.

यमुना नदी ही गंगेची प्रमुख उपनदी असून ती उत्तर प्रदेश राज्यात अलाहाबाद शहराजवळ गंगेला मिळते. ही राजस्थान व मध्य प्रदेशातून वाहत जाणारी सर्वात मोठी नदी आहे.

ब्रह्मपुत्रा नदी

ब्रह्मपुत्रा नदी भारतातील प्रमुख पूर्ववाहिनी नदी आहे.

ब्रह्मपुत्रा नदीचा उगम हिमालयात मानसरोवर कैलास पर्वतात होतो.

दिबांग व लोहित नद्यांच्या एकत्र प्रवाहास ब्रह्मपुत्रा असे म्हणतात. ब्रह्मपुत्रा ही प्रमुख आंतरराष्ट्रीय नदी असून ती तिबेट भारत व बांगलादेशातून वाहते.

ब्रह्मपुत्रा नदीची एकूण लांबी 2900 किलोमीटर आहे. भारतातील ब्रह्मपुत्रा नदीची लांबी 900 किलोमीटर आहे.

ब्रह्मपुत्रा नदीला तिबेट देशात तर त्संगपो या नावाने ओळखले जाते.

ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेश राज्यात दिहांग नावाने ओळखतात.

आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदीला ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखले जाते.

उपनद्या- जयभोरेली, सुभानशिरी, धानाशिरी, मानस, पिस्ता, भुरी, दिहांग, लुहित, भाद्री, सेसरी, धारला, दिसांग, दिखो, जांझी इत्यादी.

नदीकाठची शहरे- गुवाहाटी, दिब्रुगड(आसाम)

ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात माजुली हे नदी पात्रातील जगातील सर्वात मोठे नदीय बेट आहे.

ब्रह्मपुत्रा नदीला “आसामचे दु:खाश्रू” म्हणतात.

बांगलादेशात ब्रह्मपुत्रा व गंगा नदीचा संगम होतो.

बांगलादेशात ब्रह्मपुत्रा नदीला पद्मा या नावाने ओळखतात.

ब्रह्मपुत्रा ही बांगलादेशात बंगालच्या उपसागरात विलीन होते.

२.भारतीय पठारा वर उगम पावणाऱ्या नद्या

भारतीय पठारी प्रदेशात उगम पावणाऱ्या नद्यांचे चार भाग .

त्यामध्ये पूर्ववाहिनी नद्या, पश्चिम वाहिनी नद्या, दक्षिण वाहिनी नद्या व उत्तर वाहिनी नद्या हे वाहण्याच्या दिशेवरून चार भाग पडतात.

भारतीय पठारी प्रदेशात उगम पावणाऱ्या बहुदा पावसाच्या पाण्यावर आधारित वाहतात म्हणजेच या नद्यांच्या वरच्या भागात बारमाही पाणी आढळत नाही.

या नद्या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या पेक्षा कमी लांबीच्या असून त्या उन्हाळ्यात कोरड्या असतात.

दख्खनच्या पठारात गोदावरीचे खोरे दुसरे सर्वात मोठे खोरे असून या खोऱ्यात भारताचे 10 टक्के क्षेत्र व्यापले आहे.

गोदावरी नंतर कृष्णा नदीचे खोरे सर्वात मोठे खोरे आहे. महानदीचे खोरे पठारावरील तिसरे सर्वात मोठे खोरे आहे. नर्मदा व कावेरी नद्यांची खोरे जवळपास सारखे आहेत.

१.पूर्ववाहिनी नद्या- गोदावरी, महानदी, कृष्णा, कावेरी, पेन्नुर, वैगई इत्यादी.

२.पश्चिम वाहिनी नद्या- तापी, नर्मदा, पेरियार, शरावती, व कोकणातील सर्व नद्या,

३.उत्तर वाहिनी नद्या- चंबळ, बेटवा, केन, सिंध, व शोण

४.दक्षिण वाहिनी नद्या- साबरमती, लुणी, मही, वर्धा, इंद्रावती, प्राणहिता, वैनगंगा.

१.पूर्ववाहिनी नद्या (बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या)-

भारतीय पठारी प्रदेशात उगम पावणाऱ्या नद्या लांब पल्ल्याच्या असून त्या पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात.

उदाहरण- गोदावरी, महानदी, कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा इत्यादी.

गोदावरी नदी भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावरून वाहणारी सर्वाधिक लांबीची नदी आहे.

गोदावरी नदी

भारतीय द्वीपकल्पातील गोदावरी ही सर्वाधिक लांबीची नदी आहे.

गोदावरी नदी खोरे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे नदीखोरे असून या खोऱ्याने देशाचा 10 टक्के भाग व्यापला आहे.

गोदावरी नदीला दक्षिणेतील गंगा असे म्हणतात.

गोदावरी नदीला वृद्धगंगा या नावाने ओळखले जाते.

गोदावरी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात महाराष्ट्र राज्यात नाशिक जिल्ह्यात त्रंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी येथे होतो.

गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यातून महाराष्ट्र पठार, तेलंगणा पठारावरून पोलावरमजवळ पूर्व घाटातून वाहते.

गोदावरी नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे.

गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किलोमीटर आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील नावे 668 किलोमीटर आहे.

महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून गोदावरी नदी वाहते.

गोदावरी नदीच्या उपनद्या- मांजरा, मन्याड, दारणा, मुळा, सिंदफणा, प्राणहिता, कादवा, दुधना, दक्षिणपूर्णा, वैनगंगा, शबरी, इरावती, मानेर, तेरणा, गिरणा, नाल, मूळ इत्यादी.

नदीकाठची शहरे- नाशिक, कोपरगाव, राक्षस भवन, पैठण, गंगाखेड, नांदेड, भद्राचलन, राजमहेंद्री इत्यादी.

गोदावरी नदी नाशिक, अहमदनगर ,संपूर्ण मराठवाडा व दक्षिण विदर्भातून आंध्र प्रदेश राज्यात प्रवेश करते.

गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यात गंगापूर मातीचे धरण व औरंगाबाद जिल्ह्यात जायकवाडी धरण आहे तर नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी धरणबाभळी धरण आहे

जायकवाडी धरणात साठलेल्या जलाशयास “नाथसागर” म्हणतात.

प्राणहिता ही गोदावरीची प्रमुख उपनदी असून गडचिरोली जिल्ह्यात सिरोचा येथे संगम होतो.

गोदावरी नदी खोऱ्यात अनेक रांजणखळगे निर्माण झाली आहेत.

गोदावरी नदी आंध्र प्रदेश राज्यात राजमहेंद्री या शहराजवळ बंगालच्या उपसागरात विलीन होते.

मांजरा नदीवर निजामसागर धरण आहे.

गोदावरी नदीची उपनदी मांजरा नदीवर महाराष्ट्र व तेलंगणा दरम्यान लेंडी प्रकल्प आहे.

कृष्णा नदी

कृष्णा नदी ही भारतीय पठारी प्रदेशातून वाहणारी प्रमुख नदी असून कृष्णा खोरे देशात तिसऱ्या क्रमांकाचे आहे.

कृष्णा नदीचा उगम पश्चिम घाटात सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे होतो.

कृष्णा नदीची एकूण लांबी १४०० किलोमीटर आहे. तिची महाराष्ट्रातील लांबी 282 किलोमीटर आहे.

कृष्णा नदी महाराष्ट्र पठारावरून कर्नाटक राज्यात प्रवेश करते.

कृष्णा नदीच्या उपनद्या- कोयना, वारणा, भीमा, तुंगभद्रा, येरळा, भद्रा, दूधगंगा, पंचगंगा, वेदगंगा, घाटप्रभा, मलप्रभा, मुसी, मुनेरी इत्यादी आहेत.

नदीकाठची शहरे वाई, मिरज, सांगली, कराड, औदुंबर, नरसोबाची वाडी, विजयवाडा.

कृष्णा नदीची प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे.

कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातून वाहते.

कृष्णा नदीवर सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध धोम प्रकल्प आहे. तर तेलंगणा राज्यात नागार्जुन श्रीशैलम प्रकल्प आहे.

कोयना नदीवर कोयना प्रकल्प, वारणा नदीवर चांदोली प्रकल्प, तुंगभद्रा नदीवर तुंगभद्रा प्रकल्प, घटप्रभा नदीवर घटप्रभा प्रकल्प , भीमा नदीवर उजनी प्रकल्प, कृष्णा नदीवर धोम प्रकल्प, कृष्णा नदीवर अलमट्टी धरण आहे.

कृष्णा ही आंध्र प्रदेश राज्यात विजयवाडा शहराजवळ बंगालच्या उपसागरात विलीन होते.

महानदी

भारतीय पठारी प्रदेशातून वाहणारी महानदी ही प्रमुख नदी असून ती ओडिशा राज्यातील प्रमुख नदी आहे.

महानदीचा उगम छत्तीसगड राज्यात रायपुर जिल्ह्यात सिंहावा येथे होतो.

महानदीची लांबी 858 किलोमीटर आहे.

महानदी छत्तीसगड, ओडिसा राज्यातून वाहते.

उपनद्या तेल, शिवनाथ, हासदेव, मांड, इब, ब्राह्मणी, कोयल, सांख, लीलागर, अंमनेर, हिराकुड, मनियारी.

नदीकाठची शहरे कांकेर. संभळपुर, कटक.

ओडीसा राज्यात संभळपूर जिल्ह्यात हिराकुड जगातील सर्वात सर्वाधिक लांबीचे धरण आहे.

महानदीवर हिराकुड, टीकरपाडा, नराज ही प्रसिद्ध धरणे आहेत.

महानदी ओडिशा राज्यात कटक शहराजवळ वितरिकांच्या स्वरूपात बंगालच्या उपसागरात विलीन होते.

कावेरी नदी

कावेरी ही दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे.

कावेरी नदीचा उगम कर्नाटक राज्यात कुर्ग जिल्ह्यात ब्रह्मागिरी येथे होतो.

कावेरी नदीची लांबी 760 किलोमीटर आहे.

नदीचा प्रवास कर्नाटक, तामिळनाडू राज्यातुन प्रवास करते.

कावेरी नदीच्या उपनद्या हेमवती, लोकपावनी, अर्कावती, सुवर्णावती, अमरावती, सिरसा.

नदीकाठची शहरे- श्रीरंगपट्टणम, तिरुचिरापल्ली.

कर्नाटक राज्यात कावेरी नदीवर शिवसमुद्र धबधबा आहे.

कावेरी नदीवर मैसूर पासून 25 किलोमीटर अंतरावर कृष्णराज सागर प्रकल्प आहे. येथेच भारतातील प्रसिद्ध वृंदावन गार्डन विकसित करण्यात आले आहे.

कावेरी नदीवर मेत्तुर प्रकल्प आहे.

तामिळनाडू राज्यात कावेरी नदी कावेरीपट्टणम जवळ बंगालच्या उपसागरात विलीन होते.

शरावती नदीवर कर्नाटक राज्यात “गिरसापा धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.

कावेरी नदीची 90% क्षमता जलसिंचन व विद्युत निर्मितीसाठी वापरली जाते.

पेनुर नदी

पेनुर नदीचा उगम कर्नाटक राज्यात बंगळूर येथे होतो.

पेनुर नदी कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यातून वाहते.

नदीची लांबी 970 किलोमीटर आहे.

उपनद्या जय मांगली, सागिलेरू, कचेरू, पापाग्नी, चित्रावती इत्यादी.

पेनुर आंध्र प्रदेश राज्यात वाहत जाऊन वेदिकोंडा येथे बंगालच्या उपसागरात विलीन होते.

२.पश्चिम वाहिनी नद्या (अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या):

पश्चिम वाहिनी नद्यांना अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या असे म्हणतात.

भारती वेद्वीपकल्पीय पठारी प्रदेशात उगम पावून या नद्या पश्चिमेकडे वाहतात तसेच पश्चिम घाटात उगम पावून पश्चिमेकडे वाहत जाणाऱ्या सर्व नद्या अरबी समुद्रात विलीन होतात.

उदाहरण-  तापी, नर्मदा, पेरियार, शरावती.

नर्मदा नदी

नर्मदा ही भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे.

मायकल टेकड्यात अमरकंटक येथे नर्मदा नदी उगम पावते.

नदीची एकूण लांबी 1290 किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील लांबी 54 किलोमीटर आहे.

नर्मदा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.

नदीकाठची शहरे ओंकारेश्वर, जबलपूर, भडोच.

नर्मदा नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यातून वाहते.

उपनद्या दुधी, तवा, शक्‍कर, बुढनेर, बंजर, शर, कुंडी, हिरण, बरणा, तीनदेशी, अर्रा, हथनी, देव, गोई इत्यादी.

नर्मदा ही उत्तरेला विंध्य पर्वत व दक्षिणेला सातपुडा पर्वता दरम्यान अरुंधतरीतून वाहते.

मध्य प्रदेश राज्यात नर्मदा नदीवर जबलपूर शहराजवळ भेडाघाट येथे धुवांधार धबधबा असून तो संगमर वर खडकातील धबधबा आहे.

याशिवाय माहेश्वर जवळ सहस्त्रधारा धबधबा व मांधार, दारदी हे धबधबे नर्मदा नदीवर आहेत.

नर्मदा नदी महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवरून वाहत जाऊन गुजरात राज्यात प्रवेश करते.

नर्मदा नदीवर माहेश्वर धरण, इंदिरासागर धरण, ओंकारेश्वर धरण, सरदार सरोवर प्रकल्प आहेत.

नर्मदा नदी मध्य प्रदेश राज्यात मांडला, जबलपूर, होशिंगाबाद, खांडवा या जिल्ह्यातून वाहते.

नर्मदा नदी गुजरात राज्यात भडोच शहराजवळ खांबातच्या आखातात विलीन होते.

तापी नदी

तापी नदी भारतीय पठारावरून वाहणारी पश्चिम वाहिनी नदी आहे.

तापी नदी सातपुडा पर्वतरांगात मध्य प्रदेश राज्यात बैतुल जिल्ह्यात मुलताई येथे उगम पावते.

तापी नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील लांबी 208 किलोमीटर आहे.

प्रवाहाची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.

नदीकाठची शहरे भुसावळ, सुरत.

उपनद्या पूर्णा, गिरणा, पांझरा, मोरणा, अंभोर, बोरी, वाघुर, अनेर,  गोमाई, काटेपूर्णा, वाण इत्यादी.

तापी नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात राज्यातून वाहते.

तापी नदीवर गुजरात राज्यात काक्रापाराउकाई प्रसिद्ध धरणे आहेत. तापी नदी गुजरात राज्यात सुरत शहराजवळ खंबातच्या आखातात (अरबी समुद्रात) विलीन होते.

३.उत्तर वाहिनी नद्या

चंबळ, बेटवा, केन, सिंद व शोण उत्तर वाहिनी नद्या आहेत.

मध्यप्रदेश राज्यात विंध्य पर्वताच्या उत्तरेकडे उगम पाहून चंबळ बेटवा केन सिंध या नद्या उत्तरेकडे वाहत जाऊन यमुनेला मिळतात.

शोण ही नदी उत्तरेकडे वाहत जाऊन गंगेला मिळते.

४.दक्षिण वाहिनी नद्या

साबरमती, लोणी, मही, वर्धा, वैनगंगा या दक्षिणवाहिनी नद्या आहेत. साबरमती व लोणी या नद्या राजस्थानात राज्यात अरवली पर्वतात उगम पावून दक्षिणेकडे वाहतात तर मही नदी विंध्य पर्वतात उगम पावते.

वर्धा व वैनगंगा या नद्या दक्षिणेकडे महाराष्ट्र राज्यात वाहतात.

वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्र प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. प्राणहिता ही गोदावरीची प्रमुख उपनदी आहे.

मही नदी- उदयपूर जिल्ह्यात उगम पावते.

साबरमती नदी- राजस्थान मध्ये अरवली पर्वतात उगम पावते.

लुनी नदी- लुनी  नदीला लवणावरी नदी म्हणजेच संस्कृत मध्ये मिठाची नदी असेही म्हणतात.

अरवली पर्वतरांगातील पुष्कर दरीतून ती उगम पावते.

लुनी नदी ही राजस्थानच्या वाळवंटातील एकमेव नदी आहे.

कच्छच्या रणात लुप्त होणारी नदी या नदीचे पाणी खारे आहे

भारतातील हिमनद्या

सियाचीन, हिस्सार, बियाफो, गंगोत्री, ब्लतोरी, फेडचीनको, कांचनगंगा(नेपाल),खटलिंग(उत्तराखंड),जानो,यालुंग,झेमू,बतुरा,कुनयांग इत्यादी भारतातील प्रमुख हिमनद्या आहेत.

सियाचीन ही जम्मू काश्मीर राज्यात वाहणारी सर्वाधिक लांबीची हिमनदी आहे.

Leave a comment