Samas v samasache prakar-समास व समासाचे प्रकार


Samas v samasache prakar-भाषेचा उपयोग करत असताना आपण शब्दांची काटकसर करतो म्हणजेच दोन किंवा अधिक शब्दा  ऐवजी आपण एकच शब्दाचा उपयोग करतो.

जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्येय किंवा शब्द यांचा लोप होऊन त्यांचा एक जोडशब्द तयार होतो, तेव्हा त्या शब्दाच्या एकत्रित करणारा समाज असे म्हणतात. आणि तयार झालेल्या जोड शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात.

समासाचे एकूण चार प्रकार पडतात.

1)अव्ययीभाव समास

2)तत्पुरुष समास

3)द्वंद्व समास

4)बहुव्रीही समास

१)अव्ययीभाव समास

जेव्हा समासातील पहिले पद हे अव्यय असून ते प्रधान (मुख्य) असते, त्यातील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो तेव्हा त्या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात.

उदाहरण-

आजन्म – जन्मापासून

आमरण – मरेपर्यंत

महादेव –  महान असा देव

यथाशक्ती – शक्ती प्रमाणे

गावोगाव – प्रत्येक गावी

प्रतिवर्ष – दर वर्षाला

प्रतिक्षण – प्रत्येक क्षणी

2)तत्पुरुष समास

ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेल्या शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो ,त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.

ज्या समासात दुसरा शब्द महत्त्वाचा असतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.

तत्पुरुष समासाचे सात उपप्रकार पडतात

विभक्ती तत्पुरुष समास

कर्मधारय समास

द्विगु समास

मध्यमपद लोपी समास

नत्रतत्पुरुष समास

उपपद तत्पुरुष समास

अलोक तत्पुरुष समास

विभक्ती तत्पुरुष समास:

ज्या समासात कोणत्यातरी विभक्तीचा किंवा शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात.

उदाहरण –

सुखप्राप्त – सुखाला प्राप्त (तृतीया तत्पुरुष समास)

गायरान – गाई साठी रान (चतुर्थी तत्पुरुष समास)

राजवाडा – राजाचा वाडा (षष्ठी तत्पुरुष समास)

तोंडपाठ – तोंडाने पाठ (तृतीया तत्पुरुष समास)

वनभोजन – वनातील भोजन (सप्तमी तत्पुरुष समास)

कर्मधारय समास:

जातात पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथम विभक्तीत असून पहिले पद विशेषण तर दुसरे नाम असते, तसेच या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य स्वरूपाचा असतो त्यास कर्मधारय समाज असे म्हणतात उदाहरण-

विद्याधन – विद्या हेच धन

मुखकमल – मुख हेच कमल

शामसुंदर – सुंदर असा शाम

महाराष्ट्र – महान असे राष्ट्र

हिरवागार – खूप हिरवा

तपोबल – तब हेच बल

नरसिंह – सिंहासारखा नर

लालभडक – खूप लाल

नीलकमल – निळे असे कमल  

चरणकमल – चरण हेच कमल

रक्तचंदन – रक्तासारखे चंदन

द्विगु समास:

ज्या कर्मधारय  समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचवला जातो त्यास द्विगु समास असे म्हणतात.

उदाहरण-

पंचपाळे – पाच पाळ्यांचा समुदाय

सप्ताह – सात दिवसांचा समुदाय

चौघडी – चार घड्यांचा समूह

नवरात्र – नवरात्रीचा समूह

त्रिभुवन – तीन भुवन यांचा समूह

त्रिकोण – तीन कोणाचा समूह

आठवडा – आठ दिवसांचा समूह

मध्यमपद लोपी समास:

ज्या कर्म तारे समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखवणारा शब्द लुप्त असतो व विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते, त्यास मध्यम पद लोकी समाज असे म्हणतात.

उदाहरण-

घोडेस्वार – घोडा असलेला स्वार

पुरणपोळी  -पुरण घालून केलेली पोळी

मावसभाऊ – मावशी चा मुलगा या नात्याने भाऊ

कांदेपोहे –  कांदे घालून केलेले पोहे

साखरभात – साखर घालून केलेला भात

नत्र तत्पुरुष समास:

ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे नकारार्थी असते म्हणजेच नकार दर्शवलेला असतो, त्यास नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात.

या मध्ये सामाजिक शब्दातील पहिली पदे ही अ, अन ,न, ना, बे, नी, गैर यासारखे अभाव किंवा निषेध दर्शवणारी असतात त्यास नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात.

उदाहरण

अयोग्य – योग्य नव्हते

बेसावध – सावध नसलेले

अशक्य – शक्य नसलेले

गैरसोय – सोय नसलेली

नापसंत – पसंत नसलेले

अनुत्तीर्ण –  उत्तीर्ण नसलेले

निर्दोषी – दोषी  नसलेला

बेकायदा – कायदेशीर नसलेले

उपपद तत्पुरुष समास(कृदंत तत्पुरुष समास):

ज्या समासातील दुसरे पद हे प्रदान असून ते कृदंत धातुसाधित असते त्यांचा वाक्यात स्वतंत्र उपयोग करता येत नाही त्यास उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास असे म्हणतात.

उदाहरण-

शेतकरी – शेती करणारा

द्विज – दोनदा जन्मलेला

सुखद – सुख देणारे

ग्रंथकार – ग्रंथ करणारा 

जलद – जल देणारा

अलुक तत्पुरुष समास:

ज्या तत्पुरुष समासात पूर्वपदाच्या सप्तमीच्या ई विभक्ती प्रत्ययाचा लोभ होत नाही, त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात.

अलुक म्हणजेच लोप न पावणारे.

उदाहरण-

कर्मणीप्रयोग (ई)

कर्तरीप्रयोग (ई)

तोंडी लावणे (ए=अ+ई)

अग्रेसर (ए=अ+ई)

3)द्वंद्व समास

ज्या समासातील दोन्ही पदे अर्थ दृष्ट्या समान दर्जाचे असतात, त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. या समासातील पदे आणि अथवा व किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.

द्वंद समासाचे तीन प्रकार पडतात.

इतरेतर द्वंद्व समास

वैकल्पिक द्वंद्व समास

समाहार द्वंद्व समास

इतरेतर द्वंद्व समास:

ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लागतो, त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात.

उदाहरण-

कृष्णाअर्जुन – कृष्णा आणि अर्जुन

दक्षिणोत्तर – दक्षिण आणि उत्तर

रामलक्ष्मण – राम आणि लक्ष्मण

पशुपक्षी – पशु आणि पक्षी

भीमअर्जुन – भीम आणि अर्जुन

स्त्रीपुरुष – स्त्री आणि पुरुष

विटीदांडू – विटी आणि दांडू

शर्टपॅन्ट – शर्ट आणि पॅन्ट

वैकल्पिक द्वंद्व समास:

ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा किंवा व या विकल्प दर्शक उभयान्वयांचा वापर करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात.

उदाहरण-

मागेपुढे – मागे किंवा पुढे

न्यायान्याय – न्याय किंवा अन्याय

छोट्यामोठ्या – छोट्या किंवा मोठ्या

खरेखोटे – खरे किंवा खोटे

पंधरासोळा – पंधरा किंवा सोहळा  

मागेपुढे – मागे किंवा पुढे

समाहार द्वंद्व समास:

ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचा ही समावेश म्हणजेच समहार केलेला असतो ,त्या समासास द्वंद्व समास असे म्हणतात.

उदाहरण-

नदीनाले – नदी, नाले, ओढे व इतर

पानसुपारी – पान, सुपारी व इतर पदार्थ

केरकचरा – केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ

शेतीवाडी – शेतीवाडी व इतर तत्सम मालमत्ता

भाजीपाला – भाजीपाला मिरची, कोथिंबीर यासारख्या इतर वस्तू

चहापाणी – चहापाणी व फराळाचे इतर पदार्थ

मीठभाकर – मोठ,भाकर व साधे खाद्यपदार्थ इत्यादी

4)बहुव्रीही समास

ज्या सामाजिक शब्दाची दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो तसेच हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विश्लेषण असतो त्या सामासिक शब्दाला बहुव्रीही समास असे म्हणतात.

बहुव्रीही समासाचे चार प्रकार पडतात.

विभक्ती बहुव्रीही समास

नत्रबहुव्रीही समास

सह बहुव्रीहि समास

प्रादीबहुव्रीही समास

विभक्ती बहुव्रीही समास:

ज्या समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्या विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदाहरण-

त्रिकोण – तीन आहेत कोण ज्याला तो (चतुर्थी विभक्ती)

गतप्राण – गत आहे प्राण ज्याच्यापासून तो (पंचमी विभक्ती)

जितेंद्रिय – गीत आहे इंद्रिय याची तो (षष्ठी विभक्ती)

प्राप्तधन – प्राप्त आहे धन ज्याला तो (द्वितीय विभक्ती)

पूर्णजल – पूर्ण आहेत जल  असे

नत्रबहुव्रीही समास:

ज्या समासाचे पहिले पद नकार दर्शक असते त्याला नत्रबहुव्रीही समास असे म्हणतात या समासातील पहिल्या पदात अ,न,अन, नि नकार दर्शक शब्दांचा वापर केला जातो.

उदाहरण-

अखंड – नाही खंड ज्याचा ते

अनाथ – ज्याला नात नाही असा तो

निरोगी – नाही रोग झाला तो

अव्यय – नाही व्यय ज्याला असा तो

अनिकेत – नाही अनिकेत ज्याला तो

निर्धन – नाही धन ज्याच्याकडे तो

अनंत – नाही अंत ज्याला तो

अनियमित – नियमित नाही असे ते

सह बहुव्रीहि समास:

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा अशी अव्यय असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य करतो त्यास बहुव्रीहि समास असे म्हणतात.

उदाहरण-

सफल – फलाने सहित असे तो

सवर्ण – वर्णसहित असतो

सहपरिवार – परिवारासहित असा तो

सानंद – आनंदासहित असा तो

सबल – बलासहित आहे असा जो

प्रादीबहुव्रीही समाज:

ज्या बहुव्रीहि समासाचे पहिले पद प्र,परा अप दूर सु वि अशा उपसर्गांनी युक्त असेल तर त्याला प्रादीबहुव्रीही असे म्हणतात.

उदाहरण –

प्रबल – अधिक बलवान असा तो

प्रज्ञावंत – बुद्धी असलेला

दुर्गुण – वाईट गुण असलेली व्यक्ती

विख्यात – विशेष ख्याती असलेला

सुमंगल – पवित्र आहे असे ते

सुनयना – सु-नयन असलेली स्त्री

Leave a comment