Sambhajinagar : छ. संभाजी नगर (औरंगाबाद)

छत्रपती Sambhajinagar संभाजीनगर(औरंगाबाद) महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. या प्रशासकीय विभागात आठ जिल्ह्यांचा समावेश होतो.

जिल्ह्याचे व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय – छ.संभाजीनगर

क्षेत्रफळ – 10107 चौकिमी

महानगरपालिका – औरंगाबाद

स्थान व विस्तार – मराठवाडा विभागात औरंगाबाद जिल्ह्याच्या पूर्वेस जालना, पश्चिमेस नाशिक, आग्नेयेस बीड, दक्षिण व नैऋत्येस अहमदनगर, उत्तरेस जळगाव जिल्हा.

तालुके(9) – छ. संभाजीनगर(औरंगाबाद), कन्नड, खुलताबाद, गंगापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर.

नद्या – गोदावरी ही मुख्य नदी. पूर्णा, अंजना, शिवना, खाम, येळगंगा या उपनद्या.

संगम स्थळे – धारेगाव (गोदावरी-शिवना), जोगेश्वरी (खाम-गोदावरी)

नदीकाठावरील ठिकाण – औरंगाबाद(खाम), अजिंठा लेणी (वाघूर), पैठण(गोदावरी)

अभयारण्य – गवताळा औट्रमघाट, जायकवाडी

जलविद्युत केंद्र – पैठण, जायकवाडी.

तलाव – हरसुल, नाथसागर, डॉ. सलीम अली तलाव

धरणे – जायकवाडी (गोदावरी नदीवर), अंबाडी (शिवना नदीवर), गिरजा (गिरजा नदीवर).

डोंगररांगा – अजिंठा, सातमाळा, सुरपालनाथ, वेरूळ

लेणी – पितळखोरा भारतातील सर्वात प्राचीन व हिनयान पंथ बौद्ध लेणी आहे. गलवाडा, गवताळा, घृष्णेश्वर, म्हैसमाळ, दौलताबाद, अजिंठा, वेरूळ.

थंड हवेची ठिकाणे – म्हैसमाळ, शुलीभंजन  

वने – उष्ण कटीबंधीय पानझडी व शुष्क वने आढळतात. औरंगाबाद मध्ये सिद्धार्थ उद्यान व हिमायत बाग वन उद्यान आहेत.

गड/किल्ले – जंजाळ, वेताळवाडी, अंतुर, सुताळा, लहूगड, दौलताबाद.

मृदा – नदीच्या खोऱ्यात सुपीक मृदा आढळते. बहुतांश भागात काळी कसदार मृदा आढळते.

पिके – बाजरी, ज्वारी, ऊस, तेलबिया, भुईमुग, हरभरा, कांदे, सिताफळ.  दौलताबादची सीताफळे प्रसिद्ध आहेत. फुलांब्री येथील आंबे प्रसिद्ध आहेत.

औद्योगिक – वाळूज, चिखलठाणा येथे औद्योगिक संकुले, धूत यांचा व्हिडिओकॉन हा इलेक्ट्रॉनिक उद्योग. पैठणच्या हे पैठणी साडी व छ. संभाजीनगर हे हिमरू शालीसाठी प्रसिद्ध आहे. वाळूज येथे बजाज कंपनीचा रिक्षा निर्मिती प्रकल्प आहे. खुलताबाद तालुक्यात कागजीपुरा येथे हात कागद बनवण्याचा उद्योग आहे.

शैक्षणिक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (स्थापना 23 ऑगस्ट 1958)

  • 2010 मध्ये औरंगाबाद शहरास महाराष्ट्राची “पर्यटन राजधानी” म्हणून दर्जा देण्यात आला.
  • औरंगाबाद हे 52 दरवाजांचे शहर आहे.
  • छ. संभाजीनगर येथे पाणचक्की, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, दौलताबादचा देवगिरी किल्ला, छत्रपती शिवाजी  महाराज संग्रहालय, हिमायत बाग, सोनेरी महल, बीबी का मकबरा, चिकलठाणा विमानतळ, सिद्धार्थ उद्यान आहे.
  • बिबी का मकबरा हे मुघल सम्राट औरंगजेबची बेगम दिलरास बानू बेगम यांचे स्मृतीस्थळ आहे. याला “दख्खनचा ताजमहल” असे म्हणतात.
  • निजामशाहीतील दिवाण मलिक अंबर यांनी बांधलेली “नहर-ए-अंबरी” हि पाणी व्यवस्था प्रसिद्ध आहे.
  • सिल्लोड तालुक्यातील अजिंठा लेणी जगप्रसिद्ध आहे.
  • छ. संभाजीनगर हे “दरवाजांचे शहर” (City of Doors) म्हणून ओळखले जाते.
  • खुलताबाद तालुक्यात वेरूळ येथे ऐतिहासिक लेणी व गुफा मंदिरे, जगप्रसिद्ध कैलास लेणी, 12 ज्योतिर्लिंगापैकी घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे.
  • पैठण येथे संत एकनाथांची समाधी आहे. पैठण हे संत एकनाथांची कर्मभूमी आहे. पैठणला “दक्षिणकाशी” असे म्हणतात.
  • गोदावरी नदीवरील “जायकवाडी” हा राज्यातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प व त्याअंतर्गत पैठण येथे “नाथसागर जलाशय” आहे.
  • पैठण हि सातवाहनांची राजधानी आहे. येथे नाथसागर जलाशय आहे. पैठण या ठिकाणी ज्ञानेश्वर उद्यान आहे.
  • पैठण तालुक्यात आपेगाव हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव आहे.
  • छ. संभाजीनगर-अहिल्यानगर-बीड सीमेवर जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे.
  • अजिंठा येथे सप्तकुंड धबधबा आहे.
  • छ. संभाजीनगरचे जुने नाव खडकी, फतेहपुर, औरंगाबाद.
  • छ. संभाजीनगर (औरंगाबाद) हे महाराष्ट्राचे मध्यवर्ती शहर आहे.
  • औरंगाबाद (छ. संभाजीनगर) हे मराठवाड्यातील प्रमुख शहर आहे.
  • छ. संभाजीनगर (औरंगाबाद) हे आशिया खंडातील सर्वात वेगाने वाढणारे शहर आहे.
  • चिकलठाणा येथे विमानतळ आहे.
  • 1983 मध्ये अजिंठा व वेरूळ यांचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करण्यात आला आहे.
  • खुलताबाद येथे औरंगजेबची कबर आहे. निद्रा अवस्थेतील मारुतीची मूर्ती आहे, ज्याला “भद्रामारुती” असे म्हणतात.
  • कचनेर या ठिकाणी श्री चिंतामणी पार्श्वनाथ तीर्थस्थान आहे.
  • म्हैसमाळ येथे गिरिजा देवी मंदिर आहे.
  • औरंगाबाद मध्ये भारतमाता मंदिर आहे.
  • पैठण येथे संत विद्यापीठ आहे. औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ 2014 आहे.
  • औरंगाबाद हे गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाचे मुख्यालय आहे.
  • औरंगाबाद मधील खुलताबादचे प्राचीन नाव भद्रावती असे होते.
  • हिमायत बाग येथे फळ संशोधन केंद्र आहे.
  • औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी आहे.
  • औरंगाबाद जिल्ह्याला “लेण्यांचा जिल्हा” म्हणून ओळखले जाते.
  • वैजापूर येथे ऊस संशोधन केंद्र आहे.
  • औरंगाबादला “मराठवाड्याचे हृदय” असे म्हणतात.
  • सर्वाधिक तालुके असणारा प्रशासकीय विभाग हा औरंगाबाद विभाग छ. संभाजीनगर विभाग आहे.
  • औरंगाबाद येथे मौलाना आझाद संशोधन केंद्र आहे.
  • छ. संभाजीनगर, अहमदनगर व बीड यांच्या सीमेवरून वाहणारी नदी गोदावरी आहे.

Leave a comment